आजचा विषय आंबा

आजचा विषय आंबा

आंबा पिकतो,
रस गळतो
कोकणचा राजा झिम्मा
खेळतो’
कोकणाचं हे लोकगीत आता तोंडावर आणायला हरकत नाही कारण आंब्यांचा हंगाम जोरात सुरू आहे. बाजारात, रस्त्यावरच्या गल्लोगल्ली आंब्यांची छोटी-मोठी दुकानं थाटलेली दिसत आहेत. ज्या त्या दुकानात गवतात मांडून ठेवलेले पिवळे धम्मक आंबे दिसू लागले आहेत. त्यातून देवगड, रत्नागिरीच्या रसाळ, मधुर हापूस आंब्यांनी इतर सगळ्या फळांना चीतपट करून टाकलं आहे. फळांच्या बाजारावर या राजानं जणू राज्य केलंय असंच दिसून येतंय. कोणत्याही फळाचं इतकं मोठं ब्रँडिंग केलं जात नाही तितकं मोठं ब्रँडिंग या आंब्यांचं होतंय. तसं होणारही म्हणा, कारण शेवटी तो फळांचा राजा आहे. फळांच्या राजाबरोबरच आपलं राष्ट्रीय फळ देखील आहे.
आंब्यात प्रामुख्याने ‘अ’ जीवनसत्त्व असते. डोळ्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी ते चांगले. आंब्यातील ‘ल्यूटिन’ व ‘झियाझँथिन’ ही तत्त्वेदेखील डोळ्यांना अतिनील किरणांपासून संरक्षण मिळण्यात मदत करतात. ‘अ’ जीवनसत्त्व शरीरात साठवून ठेवले जाते व शरीर पुढे बराच काळ ते वापरत असते. आंब्यातील ‘बी ६’ जीवनसत्त्वामुळे शरीरातील ‘होमोसिस्टेन’ची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. होमोसिस्टेन वाढले तर हृदयातील रक्तवाहिन्यांना (कोरोनरी आर्टरीज) त्रासदायक ठरू शकते. ‘पेप्टिन’, रेस्व्हरट्रॉल’ ही दोन्ही तत्त्वेही आंब्यात असतात. शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल (एलडीएल) बाहेर टाकण्यासाठी त्यांची मदत होते. त्यामुळे आंबा योग्य प्रमाणात खाल्ल्यास हृदयाला हितकर. आंबा थोडा सारक गुणधर्माचा असतो. आंब्याची कोय मात्र त्यावर उतारा असतो. आंब्याच्या कोयीतील गर आंब्यामुळे होणाऱ्या जुलाबांवर उतारा म्हणून वापरला जातो. आमरस खाताना त्यात तूप व मिरपूड अवश्य घालावी. आंबा काही प्रमाणात गॅसेस निर्माण करणारा असल्यामुळे तूप-मिरपुडीमुळे तो चांगला पचतो. ‘कॅल्शियम कार्बाइड’ची पावडर लावलेला आंबा टाळावा. गवतात आढी घालून नैसर्गिकरीत्या पिकवलेले आंबे चांगले. खाण्याआधी ते दोन तास पाण्यात भिजवून ठेवावेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
काही आंब्याचे पदार्थ
*आंबा फिरणी *
साहित्य :- १ लीटर फुल क्रीम दूध, ३ चमचे तांदूळ, पाऊण कप साखर, १ कप आमरस, सजावटीकरता ड्राय फ्रूट्स
कृती :- तांदूळ स्वच्छ धुवून, जवळपास १ तास भिजवत ठेवा. नंतर त्यातलं पाणी काढून तांदूळ मिक्सरमध्ये वाटून घ्या. गरज असल्यास अगदी थोडसं पाणी घाला. एक भांड मंद आचेवर ठेऊन त्यात दूध घाला आणि ते दुध चांगलं उकळू द्या. आता त्या दुधात तांदळाची पावडर घाला. हे मिश्रण चांगलंच शिजू द्या. जेव्हा दूध अर्ध्यावर येईल तेव्हा तुम्हाला घट्ट फिरणी मिळेल. एवढ लक्षात ठेवा हे मिश्रण थंड झाल्यावर अजून जाड होतं. आता त्यात साखर घाला. अर्धा तास हे मिश्रण थंड होऊ द्या. आता त्यात आंब्याचा रस घाला आणि तुम्ही या फिरणीचा अस्वाद घेऊ शकता.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

आंब्याचा जाम
साहित्य:- २ किलो हापूस आंबा, २ किलो साखर, १ चहाचा चमचा सायट्रिक अॅसिड
८ वाटी पाणी.
कृती:- सर्वप्रथम आंब्याची साले काढून त्याचा गर काढून घ्या. मिक्सरमधून बारीक करून घ्या. ६ वाटी पाण्यात घालून उकळायला ठेवा. त्यात साखर व सायट्रिक अॅसिड टाका. प्रखर आचेवर उकळवा. तसेच मिश्रण सारखे ढवळत राहा. उलथणे व उचलले असता जिभेसारखा आकार येऊन मिश्रण खाली पडू लागले, की ते झाले समजावे. खाली उतरवा. काचेच्या बरणीत भरा व नंतर पॅरिफिन वॅक्सने सील करा. वर्षभर हा जॅम टिकतो.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
आंब्याची जेली
साहित्य:- हापूस आंबे, साखर, वेलदोडा पूड.
कृती:- हापूस आंबे उत्तम प्रतीचे घेऊन त्याचा रस/गर काढावा व जेवढा गर तेवढी साखर घेऊन मंद आचेवर गॅसवर ढवळत ठेवावे. खाली करपू देऊ नये. शिजवून झाल्यावर वेलदोडा पूड घालावी व फ्रिजमध्ये गार करण्यास ठेवावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
आंब्याच्या कोयीची सुपारी
साहित्य:- अंदाजे २ डझन आंब्यांच्या कोयी, दोन चमचे साजूक तूप, तेवढीच ज्येष्ठमध पावडर, चवीपुरते साधे मीठ व पादेलोण (काळे मीठ.)
कृती :- आंबरस केल्यावर कोयी फेकून न देता चांगल्या धुऊन कडक उन्हात दोन दिवस वाळवाव्यात. नंतर एकेक कोय आडवी पकडून बत्त्याने (किंवा दगडाने) चीर पडेपर्यंत फोडून आतील बी काढावी. शक्यतो कोय फोडताना आतील बीचे तुकडे होऊ देऊ नयेत. प्रेशर कुकरमध्ये बियांच्या अंदाजाने पाणी घेऊन मूठभर साधे मीठ आणि या बिया ४-५ शिटय़ा होईपर्यंत कुकरमध्ये उकडून घ्याव्यात. अध्र्या तासाने सर्व बियांवरील साल काढून दोन-तीन वेळा खळखळ पाण्यात चोळून धुऊन चाळणीत निथळत ठेवावेत. (खळखळ धुतल्याने कोयींचा कडवटपणा व काळे पाणी निघून जाते.) नंतर वेफर्सच्या किसणीने सर्व कोयींचे काप करून थोडे पादेलोण लावून प्लॅस्टिकच्या कागदावर एक दिवस उन्हात कडक वाळवावे. नंतर कढईत वर दिलेल्या प्रमाणात साजूक तूप घालून सर्व कोयी, तसेच पादेलोण व ज्येष्ठमध पावडरही घालावी. ५ मिनिटे मंद गॅसवर सारखे हलवावे. गॅस बंद करावा (ज्येष्ठमध पावडर व पादेलोण आपल्या आवडीप्रमाणे कमी-जास्त असले तरी चालते.) झाली सुपारी तयार. कैरीच्या आतील कोयींचीही अशीच सुपारी तयार करता येते.

Author