आज ड्रायफ्रूटची माहिती.

आज ड्रायफ्रूटची माहिती.

खजूर
जायदी खजूर आणि पिड खजूर असे दोन प्रकारचे खजूर बाजारात उपलब्ध असतात. जायदी खजूर हा उत्तम प्रतीचा खजूर असून तो पिवळा-सोनेरी व भरीव असतो, तर पिड खजूर लाल किंवा काळसर लाल अधिक रसदार, चविष्ट आणि गुणांनी अधिक श्रेष्ठ असतो. खजूर वा खारीक दोन्हींमध्ये पौष्टिकमूल्य सारखेच असते. खजुरामध्ये शरीराला पोषक ठरणारी अनेक नसíगक अन्नद्रव्ये आहेत. कॅल्शिअम, लोह, फॉस्फरस व ‘अ’ व ‘क’ जीवनसत्त्व, प्रथिने, खनिजे, तंतूमय पदार्थ आणि पिष्टमय पदार्थ हे सर्वच घटक खजुरामध्ये असतात. खजुराला ‘पूर्ण आहार’ असेही संबोधिले जाते व त्यामुळेच फार पूर्वीपासून सहारा वाळवंटात त्याला रोटीइतकेच महत्त्वाचे मानले जाते. खजुरामध्ये ग्लुकोज व फ्रुक्टोज स्वरूपातील नसíगक साखर असते. ही साखर नैर्सगिक असल्यामुळे शरीराला बाधक नाही. म्हणूनच बाजारातील साखरेऐवजी खजुराचा वापर करावा. खजुरातील साखर रक्तात लगेच शोषली जाऊन शरीराला ऊर्जा मिळते. खजूर नुसता किंवा लोण्याबरोबर खावा. खजुराची नीरा ही फार पौष्टिक असून ती ताजी पिणेच योग्य आहे. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून खजूर हे फळ मधुर पौष्टिक, बलवर्धक, श्रमहारक, तृप्तिदायक, पचनास जड आणि वीर्यवर्धक आहे. अनेक स्त्रियांमध्ये रक्तक्षय (अॅवनिमिया) हा आजार आढळून येतो. या आजारामध्ये मेंदूला रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे विस्मरण, चक्कर येणे, नराश्य येणे ही लक्षणे दिसतात. अशा स्त्रियांनी सहा महिने ते वर्षभर आहारात ७-८ खजूर दररोज सेवन करावे. हमखास गुण येतो. किरकोळ शरीरयष्टीच्या लोकांनी जाडी वाढवण्यासाठी खजुराचे नियमित सेवन करावे. स्थूल लोकांनी खारिक खावी. लहान बालकांच्या सुदृढतेसाठी दररोज एक खजूर दहा ग्रॅम तांदळाच्या धुवणात वाटावा. त्यात थोडे पाणी घालून ते मिश्रण लहान बालकांना दोन-तीन वेळा द्यावे. त्यामुळे बालके धष्टपुष्ट होतात. मलावस्तंभाचा जुनाट त्रास असेल तर ५-६ खजूर रात्री भिजत घालून सकाळी ते पाणी चांगले ढवळावे व खजूर कुस्करून तयार झालेले पाणी प्यावे. खजूर रेचक असल्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते. आतडय़ांच्या विकारामध्ये खजूर अत्यंत गुणकारी आहे. कारण आतडय़ांमध्ये आवश्यक असणाऱ्या विशिष्ट जंतूंची वाढ खजूर सेवनाने होते. त्यामुळे आंत्रव्रण, आम्लपित्त अशा विकारांमध्ये खजूर उपयोगी पडतो. खजुरामुळे शरीराला ऊर्जा मिळते, कारण खजुरात नसíगक साखर पुष्कळ प्रमाणात असते. त्यामुळे शरीराला उष्णता व ऊर्जा देण्याचे कार्य खजूर करते.
नियमितपणे खारीक व गरम दूध घेतल्यास शक्ती वाढते. शरीरात नवीन रक्त निर्माण होते.
अनेक स्त्रियांना कंबरदुखीचा त्रास होत असतो. अशा वेळी चार ते पाच खजूर व अर्धा चमचा मेथी दोन ग्लास पाण्यात उकळावी. हा काढा निम्मा होईपर्यंत उकळावा. नंतर गॅस बंद करून कोमट झाल्यावर तो पिण्यास द्यावा. या काढय़ाने कंबरदुखी थांबते.
पिस्ता
पिस्ता चवीला मधुर, किंचित कडवट, विपाकी, उष्ण वीर्यात्मक असून पित्तकर व कफवातघ्न आहे. ते पचायला जड व धातूंचे पोषण करणारे, रक्तदृष्टी नाहीसे करणारे आहे. पिस्त्यामध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, प्रथिने, खनिजे, तंतुमय व पिष्टमय पदार्थ व जीवनसत्त्व हे सर्व घटक भरपूर प्रमाणात असतात. पिस्त्यामध्ये जीवनसत्त्वातील थायमिन, नायसिन, रिबोफ्लेविन, कॅरोटीन हे घटक असल्यामुळे मज्जा संस्थेच्या कार्यासाठी पिस्ता सेवन उत्तम ठरते. दुधामध्ये पिस्त्याची पूड टाकून प्यायल्यास मेंदूचे कार्य उत्तम प्रकारे चालते. थकवा, नराश्य ही लक्षणे जाणवत नाहीत. स्मृतिभ्रंश, विस्मरण जाणवत असेल तर नियमितपणे ४ ते ५ पिस्ते दुधात टाकून खावेत. चांगले कोलेस्टेरॉल निर्माण होऊन हदयविकार टाळण्यासाठी नियमितपणे पिस्ता सेवन करावे. बदाम, पिस्ता, खडीसाखर दुधात घालून त्याची खीर बनवावी व ही खीर नियमितपणे रोज सकाळी सेवन केल्यास शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राहते. पिस्तामध्ये विपुल प्रमाणात लोह असल्याने त्याच्या सेवनाने रक्त वाढते.
पिस्त्याची फुले ही श्वसननलिकेतील व फुप्फुसातील वाढलेला कफ दूर करतात म्हणून जुनाट खोकला, सर्दी, दमा यावर ही फुले गुणकारी ठरतात. मिठाईच्या शोभेसाठी व चव वाढविण्यासाठी पिस्त्याचा वापर करावा. घरगुती आइस्क्रीम, केक, बिस्कीट करताना सजावटीसाठी पिस्त्याचा वापर करावा.
पिस्त्यामध्ये पौष्टिक घटक भरपूर असल्याने त्याच्या सेवनाने जंतूंविरुद्धची रोग प्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे लहान मुलांना व रुग्णांना नियमितपणे दुधातून पिस्ते द्यावेत.
सहसा पिस्ते खारवून साठवण्याची पद्धत आहे. परंतु असे पिस्ते जास्त प्रमाणात खाणे आरोग्यास घातक आहे. अतिप्रमाणात मिठाचा वापर केल्यामुळे त्यात असणारे पौष्टिक व औषधी घटक काही प्रमाणात नाश पावतात. म्हणून त्याऐवजी न खारवलेले साधे पिस्तेही बाजारात मिळतात. त्यांचा वापर करावा. तेही नुसतेच खाल्ले तरी ते शक्तिदायक, आरोग्यपूर्ण, सकस असतात.
मनुका/ बेदाणे
सुक्या मेव्यातील एक महत्त्वाचा स्वस्त घटक म्हणजे मनुका.
मनुका मधुर रसाच्या असल्याने उत्तम असतातच. त्या पचायला सोप्या असतात. मनुका शीतवीर्य व त्रिदोषशामक असतात. लहानपणी पोट खराब झाले असता पाण्यात मनुका उकळवून ते पाणी प्यायल्याचे व उरलेल्या मनुका चावून चावून खाल्ल्याचे स्मरणात आहे. ताप येणे, हिमोग्लोबिन कमी होणे, ताकद कमी होणे या सर्वांसाठी मनुका उपयोगी असतात. मनुकांमधल्या बिया काढून त्यापासून धात्री रसायनासारखी औषधे आयुर्वेदात बनविली जातात. घरातील प्रत्येकाला बदाम, पिस्ते, काजू असा सुका मेवा हातावर ठेवणे सगळ्यांना परवडते असे नाही, पण लहान मुलांचा अबरचबर देण्याऐवजी त्यांच्या हातावर चार मनुका ठेवल्या जाणे चांगले. शौचाला साफ होत नसेल तर मनुका तुपावर भाजून काळे मीठ लावून खाल्ल्या तर इतर कोणताही त्रास न होता शौचाला साफ होण्यास मदत मिळते. पायाची, शरीराची आग होत असेल तर मनुका व खडीसाखर एकत्र करून खाल्ल्याचा उपयोग होतो. म्हणूनच प्रसादामध्ये मनुका व खडीसाखर यांचा उपयोग केलेला दिसतो. मोठ्या आजारातून उठल्यामुळे अशक्तपपणा जाणवत असल्यास मनुका अवश्यो खाव्यात. जागरण करणाऱ्यांनी मनुका अवश्यू खाव्यात, जेणेकरून डोळ्यांची आग होत नाही. पित्त वाढल्यामुळे उलट्या होत असल्यास मनुका व साळीच्या लाह्या पाण्यात भिजवून कुस्कराव्या व पाणी गाळून घ्यावे. या पाण्यात थोडी खडीसाखर टाकून थोडे थोडे घेतल्यास फायदा होतो. मोठ्या आजारातून उठलेल्याला, वारंवार जागरण होत असणाऱ्यांना, अन्न नीट पचत नसल्यास, अंगात कडकी असल्यास मनुका उत्तम काम करतात. गोवर, कांजिण्या येऊन गेल्यावर अंगात उष्णता राहते, अशा वेळी मनुका-तूप खाण्याने फायदा होतो.
बेदाण्यांचा उपयोग द्राक्षासारखाच होतो. प्रसादाचा शिरा, पुलाव वगैरे पदार्थांमध्ये बेदाणे वापरण्याची पद्धत आहे. कारण ते निर्बीज असल्यामुळे स्वयंपाकात वापरायला बरे पडतात. बेदाण्यांच्या गोडव्यामुळे या पदार्थांची लज्जत आणखीनच वाढते. काविळ झालेल्या लहान मुलांना काळ्या मनुक्याचं पाणी आणि प्रौढ व्यक्तींना पाण्यात भिजवलेले काळे मनुके खाण्यास द्यावेत. बध्दकोष्ठ - रात्री झोपतांना एक कप दुधांत उकळलेले एक अंजीर व बिया काढलेले दोन मनुके चांगले चावून खावे. नंतर ते दुध सुद्धा प्यावे.
सुके अंजीर
सुके अंजीर दररोज खाल्ल्याने हाडं मजबूत होतात. गळ्याला सूज आली असेल तर सुके अंजीर पाण्यात उकळून ते बारीक करून खावेत, फायदा होतो. दोन अंजीर मधोमध कापून ते एक ग्लास पाण्यात रात्रभर ठेवावेत आणि सकाळी उठल्यानंतर हे पाणी प्यायल्याने रक्तसंचार वाढतो.
मधुमेह असणा-यांना अंजीर उपयुक्त आहे. पण सुके अंजीर हे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच खावं.
कमरेचा ज्यांना वारंवार त्रास होतो अशांनी सूंठ, अंजीराची साल आणि कोथिंबीर याचं सारखं प्रमाण घेऊन ते पाण्यात भिजवून ठेवावं. नंतर ते बारीक वाटून घ्यावं. सकाळी हे पाणी गाळून प्यावं. त्याने कमरेचा त्रास कमी होतो. अंजीरमध्ये फायबरचं प्रमाण भरपूर असल्याने त्याचं सेवन नियमित केलं तर वजन कमी होण्यास मदत होते. कर्करोग होऊ नये म्हणून अंजीर खावं.
जर्दाळू
हा सुक्याळ मेव्यातील इतर पदार्थांप्रमाणे एक पौष्टिक मेवा होय. जर्दाळू चवीला गोड, रुचकर असतोच, पण पचायलाही जड नसतो किंवा गरम पडत नाही. जर्दाळूची विशेषता ही की जर्दाळूच्या आत असणाऱ्या बीच्या आत एक छोटा बदाम असतो. जर्दाळू खाऊन झाला की बऱ्याच वेळा आतील बी फेकून दिली जाते; पण हा बदाम अतिशय रुचकर व मज्जापोषक असतो.
वरील सर्व सुक्यामेव्याचे मिश्रण लहान मुले अशक्त असल्यास त्यांना दररोज खायला दिल्याने फायदा होतो. सुक्यामेव्याच्या एकत्र मिश्रणाने शरीराचे सम्यक पोषण होते. सुक्यामेव्याचे दहा ग्रॅम मिश्रण जरी खाल्ले तरी ‘इन्स्टंट एनर्जी’ मिळते. मेंदूला तरतरी मिळते. विशेषत: पोटऱ्यांवर या मिश्रणाच्या सेवनाचा चांगला परिणाम दिसतो. पोटऱ्या आणि पाय दुखणे थांबते. दिवसभराच्या धावपळीचा थकवा आणि कंटाळा जायलाही मदत होते. ५ ते ८ वर्षे या वयोगटातील कृश आणि अशक्त बालकांचे पोषण कमी असते. त्यामुळे ती लगेच दमतात. खाली दिलेल्या सुक्यामेव्याच्या मिश्रणाचा या बालकांना विशेष फायदा होऊ शकतो. हे मिश्रण घरच्या घरी तयार करून ते या मुलांना रोज थोडे- थोडे खायला देता येईल.
साहित्य:- अक्रोड गर (५० ग्रॅम), सुके अंजीर (५० ग्रॅम), काजू (१०० ग्रॅम), खारीक (१०० ग्रॅम), खोबरे (१०० ग्रॅम), जरदाळू (५० ग्रॅम), पिस्ता (५० ग्रॅम), बदाम (५० ग्रॅम), बेदाणा (५० ग्रॅम), मनुका (१०० ग्रॅम), शेंगदाणे भाजून (१०० ग्रॅम).
टीप:- काजू गोमंतक, कोकण किंवा कारवारजवळील असावेत. खारीक किंचित मऊ, साखरी खारीक वापरावी. बदाम अमेरिकन तुलनेने स्वस्त मिळतात. ममरा बदाम खूपच महाग आहेत. काही ठिकाणी गंधकमिश्रित पाण्याचे संस्कार द्राक्षांवर करून मनुका व बेदाणे बनवले जातात. ते वापरू नयेत. दिलेल्या सर्व पदार्थाचे बारीक- बारीक तुकडे करावेत. ते एकत्र करून त्यांत अल्प प्रमाणात रावळगावच्या खडीसाखरेचे छोटे- छोटे खडे मिसळावेत. खडीसाखरेचे खडे साधारणपणे हरभराडाळीएवढे असावेत. त्यांच्या मिश्रणाने सुकामेवा खाताना कोरडे- कोरडे वाटत नाही.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.वैद्य खडीवाले / इंटरनेट

बेदाण्यांचा उपयोग द्राक्षासारखाच होतो. प्रसादाचा शिरा, पुलाव वगैरे पदार्थांमध्ये बेदाणे वापरण्याची पद्धत आहे. कारण ते निर्बीज असल्यामुळे स्वयंपाकात वापरायला बरे पडतात. बेदाण्यांच्या गोडव्यामुळे या पदार्थांची लज्जत आणखीनच वाढते. काविळ झालेल्या लहान मुलांना काळ्या मनुक्याचं पाणी आणि प्रौढ व्यक्तींना पाण्यात भिजवलेले काळे मनुके खाण्यास द्यावेत. बध्दकोष्ठ – रात्री झोपतांना एक कप दुधांत उकळलेले एक अंजीर व बिया काढलेले दोन मनुके चांगले चावून खावे. नंतर ते दुध सुद्धा प्यावे.

Author