साहित्य : अर्धा किलो मैदा, पाऊण वाटी तुपाचे गरम मोहन, तळणीसाठी तूप किंवा रिफाइण्ड तेल, तीन वाट्या साखर, अर्धा चमचा वेलदोडा पावडर.
कृती : मैद्यात गरम तुपाचं मोहन घालून मैदा आणि मोहन एकत्र कालवावे. नंतर थोडेथोडे पाणी घालून पुरीच्या कणके इतपत घट्ट भिजवावे. पीठ अर्धा तास झाकून ठेवावे. नंतर पीठ मळून त्याच्या जाडसर पोळ्या लाटाव्या. बोटाइतक्या लांब-रुंद पोळीच्या पट्ट्या कापाव्या. मध्यम गॅसवर तुपात तळाव्यात. फार तळून कुरकुरीत करू नये. नॉनस्टिक पॅनमध्ये साखर घेऊन बुडेपर्यंत पाणी घालावे. पक्का पाक झाल्यावर त्यात वेलदोड्याची पावडर आणि तळलेल्या पारी घालाव्या. ताटाला तुपाचा हात लावून पारी ताटात काढाव्या.
संजीव वेलणकर पुणे. ९४२२३०१७३३