चिऊताईचं घर शोधून द्याल का?

जंगले आणि झाडे तोडून सर्वत्र सिमेंटच्या जंगलांचे साम्राज्य पसरत चालले आहे. याचे दुष्परिणाम सर्वच प्रकारच्या प्रदूषणात होऊ घातले आहेत. त्यात काही पक्षी आणि प्राणी लुप्त होऊ लागले आहेत. चिमणी, घुबड, रानपिंगळा, कबुतर असे पक्षी काही दिवसांनी फक्त पुस्तकातून आणि चित्रांतून दिसतील. २० मार्च हा दरवर्षी जागतिक चिमणी दिन पळण्यात येतो या निमित्ताने चिमण्यांची व्यथा कवितेतून मांडली आहे.



|| हरि ॐ ||

भारतात चिऊताई जास्त संख्येने असणारा पक्षी

सर्वांना चिऊताईची ओळख सर्वसाक्षी

नर चिमणीचे कपाळ,

शेपटी पार्श्वभाग राखाडी,

कानाजवळ रंग पांढरा,

चोच कंठ, छाती असे काळी

डोक्यापासून खाली पोटाचा भाग पांढरा

पाठीवरी तपकिरी काळ्या तुटक रेषा!

मादीचा रंग मातकट तपकिरी,

चोच असे फिकट तपकिरी

बाकी वर्णन नरा परी!

माणसांच्या अगदी जवळच राहते,

कीटक, धान्य, कळ्या, मध,

शिजविलेले अन्न खाते

गवत, कापूस, पिसे आणि

मिळतील त्या वस्तू वापरून

घराचे छत, झाडांवर आणि

वळचणीच्या जागी घरटे बांधते!

झाडेही तोडली, मोबाईल टॉवरच्या

त्रासाने चिऊताईही उडाली

चिऊताईंच्या संख्येत

घट होताना दिसली!

पहाटेच्या समयी चिवचिवाटाने

जागही नाही आली!

पहिला जागतिक चिमणी दिवस

२० मार्च २०१० रोजी पाळला गेला,

त्यानंतर जागतिक चिमणी दिन म्हणून

दरवर्षी पाळला गेला!

— जगदीश पटवर्धन

Author