डाळींब – एक औषधी फळ

डाळींब या विषयावरील अत्यंत उपयुक्त माहिती



 डाळींबाचा इतिहास :

  • डाळींब फळाचा इतिहास अभ्यासला असता, डाळींबाचे मूळ स्थान इराण समजले जाते.
  • त्याची लागवड स्पेन, इजिप्त, अफगाणिस्तान, पाकिस्तान, ब्रहमदेश, चीन, जपान, अमेरिका व भारत या देशांमध्ये केली जाते.
  • अफगाणिस्तानातील कंदहार हे डाळींबाचे आगार मानले जाते.
  • डाळींब खाण्यासाठी तसेच औषधीसाठीही वापरले जाते.

  • त्याचा रस काढून बाटल्यात भरून अधिक काळ टिकवता येतो.
  • रसात साखरेचे प्रमाण १२ ते १६ टक्के असते.
  • कृष्ठरोगावर डाळींबाचा रस उपयुक्त मानला जातो.
  • फळाची साल अमांश व अतिसार या रोगांवर गुणकारी आहे.डाळींबातील अन्नघटक :
  • डाळींबाच्या प्रत्येक १०० ग्रॅम खाद्य भागात पुढीलप्रमाणे अन्न घटक असतात

  • पाणी ७८ टक्के, प्रथिने १०.६ टक्के, स्निग्ध पदार्थ ४.०१ टक्के, खनिजद्रव्य ०.७ टक्के, तंतुमय पदार्थ ५.१ टक्के, पिष्टमय पदार्थ १४.६ टक्के, कॉल्शियम ०.०१ टक्के, फॉस्फरस ०.०७ टक्के , आयर्न ०.३ टक्के, उष्मांक ६५ कॅलरी, रिबोफ्लेवीन १०० मि.ग्रॅ., जीवनसत्व १६ मि.ग्रॅ हे अन्न घटक समाविष्ठ असतात.
  • डाळेंब हे पिक जरी सर्वसामान्यपणे कोणत्याही हवामानात येऊ शकत असले तरी झाडाची वाढ व उत्पादन क्षमता समशितोष्ण व कोरडया हवामानात उत्तम असते.
  • चांगल्या प्रतीची फळे मिळण्यासाठी फळांची वाढ होत असतांना हवेत आद्रतेचे प्रमाण कमी असणे आवश्यक आहे.
  • दमट हवामानात फळांवर रोग व किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळतो.तसेच फळे तडकण्याचे प्रमाण जास्त असते.
  • डाळींबासाठी मध्यम प्रकारची व उत्तम निचर्‍याची जमीन निवडावी.
  • जमिनीची निवड केल्यावर उन्हाळ्यात तिची चांगली मशागत करावी.
  • २-३ वेळेस उभी आडवी नांगरून कुळवून घ्यावी.
  • हलक्या हलक्या व मध्यम जमिनीत खड्डे तयार करून २० ते २५ किलो शेणखत, १ किलो सुपर फॉस्फेट व चांगल्या मातीच्या मिश्रणाने भरावेत.
  • सर्वसाधारणपणे चौरस पध्दतीने लागवड केल्यास पावसाच्या १-२ सरी पडून गेल्यावर प्रत्येक खडयात एक याप्रमाणे कलमांची लागवड करावी.
  • कलमाभोवतालची माती हलक्या हाताने दाबून घेऊन कलम सरळ व ताठ राहील याची काळजी घ्यावी लागते.<डाळींबाच्या प्रमुख जाती : भारतात डाळींबाचे निरनिराळे प्रकार लागवडीखाली असून त्याच्या फळांचे आकारमान,रंग,गुणवत्ता, बियांचा मऊपणा, चव,दाण्यांचा रंग इत्यादी मध्ये खूपच विविधता आढळते.
  • आळंदी, मस्कलरेड, काबूल, कंधारी, गणेश, १३७, भगवा/शेंद्री, आरक्ता, मृदूला सिडलेस या जाती असून आज महाराष्ट्रात भगवा / शेंद्री या जातीची सर्वाधिक लागवड आढळून येते.
  • त्यापाठोपाठ गणेश, आरक्ता व मृदुला या जातीची लागवड उल्लेखनीय दिसते.
  • डाळींबाच्या झाडाला फुले लागल्यापासून फळ तयार होण्यास साधारण ५ ते ६ महिने लागतात.
  • आंबे बहाराची ही फळे जून ते ऑगस्ट व मृग बहाराची फळे नोव्हेंबर ते जानेवारी महिन्यात तयार होतात.
  • डाळींबावर पडणार्‍या रोगाने आज सर्वच डाळींब उत्पादकांना त्रासून सोडले आहे.
  • हा रोग ‘झान्योमोनस’ या जिवाणू् बॅक्टेरियामुळे होतो.
  • यासाठी स्वच्छता मोहिम, बहार नियोजन, अन्नद्रव्य व्यवस्थापन पीक संरक्षण या ठळक बाबी रोग नियंत्रणासाठी अवलंबविल्या जातात.
  • रोगांच्या बंदोबस्तासाठी एकात्मिक किड नियंत्रण पध्दतीचा अवलंब करावा.
  • कीड रोग येण्याआधीपासून बागेची नियमित स्वच्छता ठेवावी.
  • कल्चरल प्रॅक्टीसेस वापरून कीड रोग नियंत्रणात ठेवावे.
  • जैविक उपायांचा जास्तीत जास्त वापर करावा.
  • झाडांची प्रतिकार क्षमता कशी वाढेल याकडे लक्ष द्यावे.
  • `महान्यूज’ च्या सौजन्याने

    — देवेंद्र पाटील

    Author