तोतयाचे कांड
Category:
कथा साहित्य - ललितमुंबईत डावऱ्यादादा नांवाचा एक गुंड कांही वर्षांपूर्वी खूप गाजला होता. शेवटी पोलिसांनी त्याला एनकाऊंटरमध्ये मारला होता.
Category:
कथा साहित्य - ललितमुंबईत डावऱ्यादादा नांवाचा एक गुंड कांही वर्षांपूर्वी खूप गाजला होता. शेवटी पोलिसांनी त्याला एनकाऊंटरमध्ये मारला होता.
Category:
लेखसंग्रहThere may NOT be NEXT TIME…..कदाचित् परत भेट होणार नाही!
Category:
साहित्य - ललितमहाराज म्हटल्यानंतर मराठी माणसाच्या मनांत आठवतात, ते छत्रपती शिवाजी महाराज. त्यांच्याबद्दल लिहायला सुध्दा पात्रता लागते, ती मी मिळवलेली नाही. पण महाराज हे विशेषण इतरही कांही जणांसाठी वापरलं जात. विशिष्ट प्रकारचा मसाल्याचा चहा आणि बरोबर फाफडा बनवून विकणा-यांनाही महाराज म्हणतात. गुजरात मारवाडमधे स्वयंपाक्यांनाही महाराज म्हणतात.
Category:
साहित्य - ललितदिवाळी जवळ आली होती. शकुंतला हॅास्पिटलमधील नित्याची कामे पटापट करत होती. संवयीने बिनचूक करत होती पण आज तिच्या मनांत मुलाची काळजी होती. मुलगा राजस आता नऊ वर्षांचा झाला होता. घरी एकटाच होता. वर्षांपूर्वी आजी गेली आणि तो खरंच एकटा पडला. आजी गेली तेव्हां बाबा येऊन लगेच परत गेले. जास्त रजा नव्हती त्यांना. आता परत कधी येतील, कुणास ठाऊक? सैनिकाचा काय भरोसा? त्याचे सुखरूप येणे हेच महत्वाचे! यंदा दिवाळीला फक्त दोघंच असणार होती घरी, ती आणि राजस. दिवाळीची कांहीच तयारी तिला करतां आली नव्हती. बऱ्याच सहकारी नर्सेस रजेवर होत्या. तिला रजा तर मिळत नव्हतीच पण अधून मधून डबल ड्यूटी करावी लागत होती. दोन दिवसांवर दिवाळी आली होती. विशेष खरेदी तर सोडाच पण निदान फराळासाठी लागणारं सामान आणि राजस साठी थोडे कपडे घ्यायला हवे होते ना! ह्यांतल कांही तिला करतां येत नव्हतं. तिला मदत करायलाही कुणी नव्हतं. राजस घरी एकटाच असायचा. शेजारी चांगले होते पण ते सतत कसे पहाणार. कितीही चांगल्या ठीकाणी राजस रहायला तयार नव्हता. तो आता पाळणाघरांत रहायला काय लहान होता काय?
Category:
साहित्य - ललितदुपारची वेळ होती. सोसायटीत थोडी सामसूमच होती. सौभाग्यवती स्वयंपाकघरात कामात होती. अमित संगणकावर कांही काम करत होता. मीही पेपर वाचत होतो. माझ्या लाडक्या संपादकाचा अग्रलेख वाचण्यात मग्न होतो. त्यांनी धनदांडग्या उद्योगपतींवर चांगलं झणझणीत लिहिलं होतं.
Category:
लेखसंग्रह विज्ञान / तंत्रज्ञान शैक्षणिकपृथ्वीवर आतापर्यंत अनेकवेळा हिमयुगं येऊन गेली आहेत. या हिमयुगांतलाच, पृथ्वी मोठ्या प्रमाणात बर्फाच्छादित असण्याचा काळ म्हणजे हिमायनाचा काळ. आतापर्यंतच्या संशोधनानुसार, सर्वांत जुनं हिमायन हे सुमारे अडीच अब्ज वर्षांपूर्वी होऊन गेलं आहे.
Category:
साहित्य - ललितझिरमिळ्यांची पगडी घालून शास्त्रीबुवा आणखीच उंच वाटत. पावणे सहा फुट उंच, साठीनंतरही प्रकृती ठणठणीत असणारे, लांब, काळ्या बटणांचा पांढरा डगला घालणारे, कपाळावर गंध लावणारे, काळा चष्मा घातलेले, शास्त्रीबुवा नेहमी धीर गंभीर वाटत.
त्यांचे खरे आडनाव काय होते, ते तिथे कोणालाच ठाऊक नव्हते. लोक त्यांना शास्त्रीबुवा म्हणूनच ओळखत. त्यांचे शिक्षण कुठे झाले होते, शास्त्री हे त्यांचे नाव होते की पदवी होती.
हे कांही कुणाला माहीत नव्हते. वाड्यांतील एका छोट्या खोलीत ते रहात पण नेहमी ते ह्याच वेशांत लोकांना दिसत. शास्त्रीबुवांच्या दरवाजावर “इथे जन्मकुंडली, हस्तरेषा, चेहरा, यांवरून भविष्य सांगितले जाईल.” घरावर अशी छोटी पाटी असली तरी मोठ्या रस्त्यावर एका छानशा दुकानांत शास्त्रीबुवांच ‘ॲाफीस’ होतं.
Copyright © 2025 | Marathisrushti