अगतिक (भयकथा)
Category:
कथा साहित्य - ललितयंदाच्या वर्षी पाऊस पाणी दरसालापेक्षा चांगलं आलेलं. सावित्री आणि तिचा नवरा सुखदेव दोघे आनंदाच्या भरात नेहमीपेक्षा जास्त जोमाने शेतात राबत होते. एक वेगळाच उत्साह तिच्या हालचालीत जाणवत होता कारण सावित्रीच्या घरी यंदा बाळकृष्णाचं आगमन झालेलं. तिच्या दीड च वर्षाच्या कान्होबाला घेऊन ती शेतात जायची. दिवसभर शेतात झाडाला झुला बांधून त्यात त्याला झोपवायची. त्याचवेळी घरची उरलेली कामं देखील तिच्या डोक्यात पिंगा घालत असायची. सुखदेव तर बिचारा भरून पावला होता.