घड्याळ (कथा)
Category:
कथा साहित्य - ललितअनघा प्रकाशन आयोजित कथास्पर्धेत सौ प्राची गडकरी यांनी लिहिलेली प्रथम क्रमांक प्राप्त कथा
Category:
कथा साहित्य - ललितअनघा प्रकाशन आयोजित कथास्पर्धेत सौ प्राची गडकरी यांनी लिहिलेली प्रथम क्रमांक प्राप्त कथा
Category:
साहित्य - ललिततालमी सुरु झाल्या पण म्हणावी अशी गती येत नव्हती. जसजसा गणेशोत्सव जवळ येऊ लागला. तसतसे वातावरण तापू लागले. शेवटी परीक्षा जवळ आल्या म्हणजे जसं आखलेलं वेळापत्रक बाजूला पडतं आणि दिवस रात्र अभ्यास चालू होतो तसंच झालं. आजपर्यंत हा नाही आला, तो नाही आला अशी टंगळमंगळ चालू होती. ती जाणवू लागली. ज्यांचे स्वतंत्र कार्यक्रम होते त्यांचा फारसा प्रश्न नव्हता. पण ज्यांचे सहकार्यक्रम होते. त्यांना एकत्र जमणे आवश्यक होते. नाटिका तयार करणाऱ्यांना तर आता एकत्र जमून तालमी करणे गरजेचे होते. आम्हाला आता वेळ कमी पडू लागला. तालमींची वेळ हळूहळू वाढत चालली होती. रात्री सात आठपर्यंत चालणाऱ्या तालमी आता दहा दहा बाराबारा वाजेपर्यंत आटपेनात. आता सगळ्यांनाच एक प्रकारची झिंग चढू लागली होती. अगदी झपाटून गेले होते सगळे.
Category:
साहित्य - ललितसुनीता माझी धाकटी बहीण. माझ्यापेक्षा फक्त दोन वर्षांनी लहान. लहानपणापासून दादा दादा म्हणून सारखी माझ्यामागे असते. आता ती दहावीला आणि मी बारावीला आलो तरी तिला माझ्याशिवाय करमत नाही. भांडेल, रुसेल पण शेवटी सुनीलदादा म्हणून लाडीगोडी करायला येणारच.
माझ्या वडिलांची फिरतीची नोकरी. दर दोन तीन वर्षांनी बदल्या ठरलेल्या. मग नवीन गाव, नवीन शाळा, नवीन मित्र अशी मजा असायची. पण या बदल्यांमुळे आम्हांला मित्र असे फारसे कुणी मिळालेच नाहीत. जरा ओळख होते ना होते तो बाबांची बदली. मग सुनीताला आणि मला आम्हीच एकमेकांना मित्र मैत्रीण, भाऊ-बहीण सगळं शाळेत किंवा घरी, गल्लीत खेळताना तिला कुणी बोललं तर मला खपत नसे. मुळात मी डबल हाडापेराचा. वयाच्या मानानं जरा मोठा दिसणारा. सुनीताची कुणी खोडी काढली तर मी त्याला चांगला बुकलून काढीत असे. सुनीतावर माझे जिवापाड प्रेम आहे.
Category:
लेखसंग्रह विज्ञान / तंत्रज्ञान शैक्षणिकसमुद्रातील लाटांची उंची मोजण्यासाठी वेगवेगळी तंत्रं वापरली जातात. त्यातल्याच एका तंत्रानुसार संवेदक बसवलेल्या बोयऱ्यांचा वापर केला जातो. हा बोयरा म्हणजे पाण्यावर तरंगणारी डब्यासारखी एक वस्तू असते. या बोयऱ्यावरील संवेदक, लाटांमुळे होणाऱ्या बोयऱ्याच्या हालचालींची नोंद करतो. या नोंदींवरून त्या ठिकाणच्या लाटांची उंची कळू शकते. संवेदकानं मिळवलेली माहिती, जागतिक स्थानदर्शक यंत्रणेतील उपग्रहांद्वारे संशोधकांपर्यंत पोचते.
Category:
कथा साहित्य - ललितगुप्तहेर (डीटेक्टीव्ह) ही कल्पना तशी जुनीच. गुप्तहेर हे ही कांही आपल्याला नवीन नाहीत. मध्ययुगापासून ते तहत दोन्ही महायुध्दांपर्यंत गुप्तहेर होतेच. पुराणांमध्येही कचाने देवांतर्फे हेरगिरी केलीच होती. आधुनिक युगांत खाजगी गुप्तहेरांची मराठी लोकांना, विशेषतः मराठी वाचकांना, ओळख करून दिली ती कै. लेखक बाबूराव अर्नाळकर यांनी.
Category:
कथा साहित्य - ललितमुंबईच्या दौऱ्यात एक दिवस रिकामा होता. खूप दिवस झालेत, दिवस काय वर्षं झालीत विठूला भेटलो नव्हतो. ठरवलं, जमलं तर भेटायचं. खूप ऐकलं होतं त्याच्या गरुड भरारीबद्दल. त्यामुळे खूप बोलायचं होतं. बरंच काही जाणून घ्यायचं होतं.
Category:
साहित्य - ललितशामराव तपास आटोपून परत आले. त्यांच्या मनात मात्र हा भोळसट दिसणारा दिनकरच या प्रकरणाच्या मागे असावा असे राहून राहून वाटत होते. बांगड्यांचे तुकडे सापडल्यापासून त्यांच्या मनात एक कल्पना घोळू लागली होती. या पूर्वीच्या अधिकाऱ्यांनी मिसिंग केस संदर्भात या भागातील आणि त्याच्या आसपासच्या भागातील सर्व मिसिंग, मर्डर, अॅक्सिडेंट केसचा धांडोळा घेतला होता पण दिनकर आणि ऐश्वर्या कोकणातल्या ज्या राजापूर भागातून आले होते त्या भागातील त्या तारखेच्या आसपासच्या अशा केसेसच्या धांडोळा घेतला तर कदाचित काही हाती लागू शकेल असे त्यांना राहून राहून वाटत होते. त्यांनी जाधवांना बोलावून राजापूर आणि आसपासच्या परिसरातील पोलीस रेकॉर्डवरच्या अशा सगळ्या केसची तपासणी करायला सांगितले. जाधवांनी बारकाईने तसा तपास केला आणि एका केसवर येताच ते चमकले! त्या केसमधल्या मर्डर झालेल्या बाईचे वर्णन ऐश्वर्याशी जुळत होते. उंची साधारण चार फूट, रंग गोरा, चेहेरा ओळखण्यासारखा नव्हता तरी मयताच्या हातात काचेच्या बांगड्या होत्या आणि त्याचे डिझाईन ‘दबंग’ बँडचेच होते! ते तडक ही सुवार्ता घेऊन शामरावांकडे गेले. लौकिकार्थाने ही कुवार्ता होती पण पोलीस तपासाच्या दृष्टीने ती सुवार्ता होती. एरवी कुवार्ता ऐकून रडे फुटते. इथे मात्र ती कुवार्ता ऐकून शामरावांच्या चेहेऱ्यावर हास्य फुलले! पोलिसांच्या आयुष्यात असेच होते. गुन्ह्याचा शोध घेताना अशा कुवार्ताच त्यांच्या साठी सुवार्ता बनतात.
Category:
साहित्य - ललितवयाच्या साठीनंतर उपभोगलं जाणारं प्रत्येकाचं जीवन, हे ‘बोनस’ लाईफच असतं. बालपण वय वर्षे चौदापर्यंत, भुर्र उडून जातं. गद्धेपंचविशीपर्यंत, शिक्षण पूर्ण झालेलं असतं. नोकरी आणि छोकरी तिशीपर्यंत, जीवनात समाविष्ट होते. पुढील तीस वर्षे पाठीचा कणा तुटेपर्यंत, संसाराचा गाडा हाकावा लागतो. साठीपर्यंत घरातील जबाबदाऱ्या पार पाडून, तृप्त भावनेने, कर्ता करविताचे अस्तित्व अनेक युद्ध गाजवून छातीवर दहावीस मेडल्स मिरविणाऱ्या, निवृत्त कमांडरसारखं झालेलं असतं.
Category:
कथा साहित्य - ललितओढा जिथे चंद्रकोरीसारखा वळला होता, तिथूनच थोड्या अंतरावर खुळीचं खोपट होतं. खुळीचं खोपट आणि ओढा ह्यामध्ये मोठं मोकळं कुरण होतं. जेव्हां ओढा पाणी पुरवत असे तेव्हां कुरणात गुरं चरत. मागची झाडी आणि समोरचा ओढा ह्याभोवती खुळीने मनाने एक वर्तुळ आंखून घेतलं होतं. त्याबाहेर ती जात नसे.
हाच तिचा खुळेपणा होता.
Category:
साहित्य - ललितइन्स्पेक्टर शामराव साळुंकेनी वागळे इस्टेट पोलीस ठाणे, ठाणे याचा नुकताच चार्ज घेतला होता. पोलीस ठाण्याची, गुन्ह्यांची वगैरे जुजबी माहिती त्यांना मिळाली होतीच परंतु तेवढ्याने साळुकेचं समाधान झालं नव्हतं. सर्वसामान्यपणे ठोकपीट मेथडचा अवलंब करून गुन्ह्याची उकल करण्याकडे त्यांचा कल नव्हता. गुन्ह्याचे सूक्ष्म विश्लेषण करुन, बारीक सारीक धागे जुळवून बुध्दी कौशल्याने त्याची उकल करण्यात त्यांना रस होता. फारच क्वचित, ठोकपीट मेथड ते वापरीत. बहुधा नाहीच. आढावा घेता घेता ते दिनकर मोरेच्या केसकडे वळले. त्या दिनकरची बायको गायब झाली अशी त्याने आठवड्यापूर्वी तक्रार नोंदविली होती. पण आजपर्यंत तिचा शोध लागला नव्हता. त्यांनी त्यांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव यांना लगेच बोलावून घेतले.
Copyright © 2025 | Marathisrushti