पळवलेले पत्र (संक्षिप्त रूपांतरीत कथा ३२)
Category:
कथा साहित्य - ललितही कथा ही इंग्रजीत रहस्यकथांची सुरूवात करणारी पहिली कथा मानली जाते.
Category:
कथा साहित्य - ललितही कथा ही इंग्रजीत रहस्यकथांची सुरूवात करणारी पहिली कथा मानली जाते.
Category:
साहित्य - ललितखंडाळ्यासारख्या प्रसिद्ध हिलस्टेशनमध्ये एका अत्यंत सुंदर जागी, उंच डोंगरमाथ्यावर, एका बाजूला खोल दरी, दुसऱ्या बाजूस राजमाचीचा उंच डोंगर, समोर हिरवीगार दरी आणि चार-पाच एकरांचा विस्तीर्ण परिसर आणि त्यात एक आलिशान बंगला, अशी ही सगळी मालमत्ता कधी स्वप्नातही माझी होईल असे मला कधी वाटले नाही. कसे वाटणार? हे कसे घडले? त्याचीच तर ही गोष्ट आहे.
मी एक साधा मध्यमवर्गीय निवृत्तीनाथ! म्हणजे एक निवृत्त बँक कर्मचारी, आमच्या बँकेत निवृत्त होणाऱ्यांना निवृत्तीनाथ म्हणावयाची पद्धत. अशा आजपर्यंत निवृत्त झालेल्यात माझा नंबर होता १०८ म्हणून मला सगळे म्हणतात श्री श्री १०८ निवृत्तीनाथ! जसे जैन साधू असतात ना, श्री श्री १००८ स्वामी अमुकतमुक वगैरे, तसे. म्हणजे मी काही तसा कोणी साधू बिधू नाही बरं का.
Category:
साहित्य - ललितउन्हाळी सुट्टीत गावी गेल्यावर पुण्यात यायला जून उजडायचा.. पहिला वळीव पाऊस अनुभवताना, अतोनात आनंद मिळायचा. त्या पावसात गाईचं वासरुं शेपटी वर करुन हुंदडताना पाहिलेलं आठवतंय.. पाऊस उघडल्यावर सवंगड्यांसोबत हनुमान झऱ्यातून खेकडे पकडायला लांबवर गेलेलो आहे.. शेतातून चालताना चिखलाचा थर, जाडजूड चप्पल घातल्यासारखा पावलांना लागायचा…
Category:
कथा साहित्य - ललितवाघाला रक्ताची चटक लागली की जस होत, तस आमच्या परिसरातील लोकाना झाल होत. निम्म्या किमतीत वस्तू मिळतात म्हणजे काय? तीन महिने दुकान सुरु होऊन झाले होते. त्यामुळे निम्म्या किमतीत मिळालेल्या वस्तू लोकांच्या घरोघरी दिसू लागल्या होत्या.
Category:
साहित्य - ललितरामभाऊंच्या आक्रमक आणि तडफदार गायकीला ‘झंझावात’ हाच शब्द योग्य ठरेल. आयुष्याच्या अखेरपर्यंत पांढरी चार आणि प्रसंगी काळी तीन पट्टीमध्ये रात्री 9 ते पहाटे 4 पर्यंत, विलक्षण ताकदीने आणि दमसासाने गायची अद्भुत क्षमता रामभाऊंकडे होती. या सादरीकरणात कधी बालगंधर्व आणि मास्टर कृष्णरावांची लडिवाळ गायकी, कधी नोम तोम युक्त आलापी आणि लयदार तिहाया घेणारी आग्रा गायकी, कधी लयदार आणि बुद्धिनिष्ठ रंजक ग्वाल्हेर गायकी अशी चतुरस्र गायकी रामभाऊ श्रोत्यांपुढे अत्यंत सहज ठेवून थक्क करायचे.
Category:
लेखसंग्रहमोठे शहर असो वा लहान गांव, अस्वच्छतेमुळे डास सर्वत्र आढळतात. डासांपासून संरक्षण करण्यासाठी अनेक प्रकारची उपकरणे बाजारात उपलब्ध आहेत. त्यातून निर्माण होणाऱ्या धुरामुळे किंवा विशिष्ट वायूमुळे डास मारून जातात किंवा खोलीच्या बाहेर जातात. कालांतराने अशा धुराचा/ वायूचा परिणाम आपल्या फुप्फुसांवर होतो. त्यातून पुढे खोकला, दमा, घसा दुखणे असे आजार होऊ शकतात.
Category:
साहित्य - ललितकृष्णा सरीन नावाची एकोणीस वर्षांची लखनौमधील मुलगी, आई-वडील आपल्याला टॅलेंट स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी मुंबईला जाऊ देत नाही म्हणून दिवसभर उपाशी राहिली.. शेवटी तिला परवानगी मिळाली व ती मुंबईला पोहोचली. त्या स्पर्धेत, ती यशस्वी झाली व तिला पहिला चित्रपटही मिळाला.. व त्याचे मानधन हे पारितोषिक स्वरुपात होते, तब्बल २५ हजार रुपये!!!
Category:
कथा साहित्य - ललितओ हेन्रीच्या ह्या कथेची नायिका राजकन्या जोसेफा निर्भय, चतुर शिकारी आहे. गीव्हन्स तिच्यावर छाप पाडण्यासाठी खोटं बोलतोय, हे तिला लगेच लक्षांत आलं. त्याला वाटत असतं की तो सिंह आपला पाळीव प्राणी होता, असं सांगून तो तिला फसवतोय.
Category:
साहित्य - ललितलेण्यांची उंची आणि खोलवर उतरणाऱ्या पायऱ्यांकडे आता कुठे मनोजसरांचे लक्ष गेले आणि त्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला. त्यांची चलबिचल सुरू झाली, ते परतायची घाई करू लागले, म्हणाले, “अरे, तो भत्ता बित्ता राहू द्या आता, आपण आधी खाली उतरू. मग निपट निरंजनच्या मठात हवं तर खाऊ भत्ता, पण आता निघायचं. चला चला!’
Copyright © 2025 | Marathisrushti