No Picture
लेखसंग्रह

पहिला भक्षक?

Category:

 

सजीवाच्या शरीराचं स्वरूप, हा प्राणी आजच्या जेलिफिशसारख्या, छत्रीसारखा आकार असणाऱ्या आणि शुंडक धारण करणाऱ्या सागरी प्राण्यांच्या, मेडूसोझोआ या प्रकारचा प्राणी असण्याची शक्यता दिसून आली आहे. याचा शोध लावणाऱ्या संशोधकांनी या सजीवाला ‘ऑरालुमिना अ‍ॅटेनबरोई’ हे जीवशास्त्रीय नाव दिलं आहे. या नावातील पहिला भाग असणारा ‘ऑरालुमिना’ हा लॅटिन शब्द म्हणजे पहाटेची मशाल. जीवसृष्टीच्या उत्क्रांतीच्या पहाटेच्या काळात अस्तित्वात आलेल्या, मशालीसारखा आकार असणाऱ्या या सजीवाला पूरक असं हे नाव आहे. या नावातला ‘अ‍ॅटेनबरोई’ हा दुसरा शब्द प्रख्यात निसर्गअभ्यासक डेव्हिड अ‍ॅटेनबरो यांच्या गौरवार्थ वापरला आहे.

No Picture
साहित्य - ललित

स्मरणशक्ती आणि विस्मरणशक्ती – भाग २ (आठवणींची मिसळ १३)

Category:

 

चिं. वि. जोशींच्या “वायफळाचा मळा” या पुस्तकांत एक लेख आहे. “स्मरणशक्तीचे प्रोफेसर”.लेखकाला गाडीत एक प्रोफेसर भेटतात. प्रोफेसर साहेब लेखकाला स्मरणशक्ती कशी वाढवावी, लहान सहान गोष्टी कशा लक्षात ठेवाव्यात ह्याबद्दल उदाहरणासहीत लेक्चर देतात.

No Picture
साहित्य - ललित

कॅज्यूअल्टी

Category:

 

बंगल्याबाहेर गाडीची चाहूल लागताच चार वर्षांचा समीरने धावत धावत जाऊन त्याच्या पप्पांना गाडीतून बाहेर पडल्या पडल्या पायाला घट्ट मिठी मारली. डॉ. विजय यांनी लाडाने त्यांच्या समीरला उचलून घेतले आणि बंगल्याच्या पायऱ्या चढु लागले. मुलाला बघून त्यांचा दिवसभरातील थकवा आणि ताण तणाव कुठल्या कुठे पळून गेला. समीर सोबत इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्यावर डॉ. आनंद यांनी गरम पाण्याचा शॉवर घेतला , सोफ्यावर बसल्या बसल्या त्यांनी टी पॉय वर पाय ताणले आणि टीव्ही ऑन करून न्युज चॅनल लावला. पण त्यांचे लक्ष टी व्ही कडे नव्हते.हॉस्पिटल मधुन बाहेर पडता पडता त्यांच्या नजरेस पडलेले दृष्य आता निवांत बसल्यावर डोळ्यासमोर तरळू लागले.

No Picture
कथा

एक परीस स्पर्श ( भाग – ४७ )

Category:

 

आज सकाळी विजय त्याच्या कार्यालयात जाण्यासाठी त्याच्या इमारतीतून बाहेर पडला. त्याच्या हातात पाण्याने भरलेल्या दोन बाटल्या होत्या. इमारतीच्या खाली त्याच्या ओळखीचे एक गृहस्थ भेटले त्याच्या हातातील पाण्याच्या बाटल्या पाहून ते म्हणाले, ” ह्या बाटल्यांची हमाली उगाच कशाला करतोस ? त्यावर विजय त्या गृहस्थाला म्हणाला, ” महिनाभर जर मी पाण्याच्या बाटल्या विकत घेऊन पाणी प्यायलो तर १२०० रुपये होतील आपल्या इमारतीचा मेंटेनन्स फक्त ८०० रुपये आहे. विजयचे हे उत्तर ऐकून तो गृहस्थ गप्पच बसला. विजयने जो विचार केला होता तो विचार त्या गृहस्थाने स्वप्नातही केलेला नसेल. विजय नेहमीच इतरांपेक्षा वेगळा विचार करतो म्हणूनच कोणी त्याच्या तोंडाला लागत नाही कारण त्याच्या प्रत्येक कृतीचे त्याच्याकडे कोणालाही पटेल असे स्पष्टीकरण असते.

No Picture
कथा

एक परीस स्पर्श ( भाग – ४६ )

Category:

 

विजय कोठेही असला तरी त्याचे डोळे आणि कान सताड उघडे असतात. लोकांच्यात होणारे संभाषण हे तर त्याच्या कविता, कथा आणि लेखांचे खाद्य असते. लेखक ,कवी असो अथवा पत्रकार त्यांना सतत लोकांच्या भाव – भावनांचा विचार करत राहावे लागते. काही दिवसापूर्वी विजय बसने प्रवास करत होता. प्रवासात दोन स्त्रियांचा संवाद त्याच्या कानावर पडत होता… बायका तश्या बऱ्यापैकी सुशिक्षित दिसत होत्या म्हणजे त्यांच्या बोलण्यात येणाऱ्या सततच्या इंग्रजी शब्दावरून ते लक्षात येत होते. त्या बायका कमीत कमी दहावी – बारावी पर्यत नक्कीच शिकलेल्या असाव्यात. त्यातील एक तर इतकी व्यवस्थित होती कि ती नक्कीच कोणत्यातरी कार्यालयात कामाला असावी अशी वाटावी.

No Picture
लेखसंग्रह

मानवपूर्व अग्नी

Category:

 

सन १९७६-७७मध्ये इस्राएलमधील, भूमध्य सागराजवळच्या एव्हरॉन क्वॉरी या उत्खनन क्षेत्रात सुमारे आठ लाख ते दहा लाख वर्षांपूर्वीच्या अश्मयुगीन वस्तू सापडल्या. या वस्तूंत हरणं, पाणघोडे, गवे, यासारख्या दिसणाऱ्या काही तत्कालीन शाकाहारी प्राण्यांच्या कवटीचे तुकडे, दात, इत्यादी अवशेषांचा समावेश होता. तसंच त्या काळात अस्तित्वात असणाऱ्या एका महाकाय शाकाहारी प्राण्याच्या सुळ्याचे तुकडेही तिथे सापडले. प्राण्यांच्या या अवशेषांबरोबरच तिथे गारगोटीच्या दगडापासून बनवलेल्या विविध साधनांचे तुकडे आढळले. हे तुकडे, दोन सेंटिमीटरपासून ते साडेसहा सेंटिमीटरपर्यंत वेगवेगळ्या लांबीचे होते. हे तुकडे ज्या दगडी साधनांचे होते, त्यातली काही साधनं धारदार होती, तर काही साधनं अणकुचीदार होती.

No Picture
साहित्य - ललित

स्मरणशक्ती आणि विस्मरणशक्ती (आठवणींची मिसळ १२)

Category:

 

“”ज्यात शंभर अब्ज मज्जा पेशी आहेत असा माणसाचा मेंदू म्हणजे जगातले सर्वांत विस्मयकारक, व्यामिश्र (गुंतागुंतीचे), समजण्यास गहनतम असे विद्युत्-रासायनिक यंत्र आहे. शब्द वा ध्वनीसंकेत यातून आपण घरातल्या अजाण बालकाच्या प्राथमिक स्मृती तयार करत असतो. त्याच स्मृतीच्या आधारे बालक आसपासच्या जगाचे अनुभव घेऊ लागते. त्यातुन आपल्या स्वत:च्या स्मृती तयार करून मेंदूला कार्यान्वित करू लागते.

No Picture
साहित्य - ललित

पांढरा शर्ट खाकी पँट

Category:

 

शैक्षणिक मुल्ये, संस्कार, निती , शैक्षणिक क्रांती हे सगळं पांढऱ्या शर्ट आणि खाकी पँट सारखं काळाच्या पडद्या आड जाऊ लागले आहे आणि ह्याला जबाबदार अशा शाळांचे चोचले पुरविणारी पांढरा शर्ट आणि खाकी पँट घालून शिकलेली तुमची आणि आमची पिढीच आहे.

No Picture
कथा

एक परीस स्पर्श ( भाग – ४५ )

Category:

 

विजय आज कोणत्यातरी मालिकेचे प्रमो ! पाहत होता. ज्यात एक नवरा आपल्याला हीच पत्नी सात जन्म मिळावी म्हणून वडाला प्रदक्षिणा घालताना दाखविला होता. तो प्रमो ! पाहून विजयला हसावं की रडावं तेच कळत नव्हतं कारण कालच विजय त्याच्या एका मित्राला त्याच्या कारखान्यात भेटायला ,. गेला होता… तो मित्र विवाहित आहे. त्याला एक मुलगी आणि एक मुलगाही आहे. बायकोही दिसायला खूप सुंदर ! सुंदर म्हणजे इतकी सुंदर की एखाद्या शिल्पातील स्त्री जितकी सुंदर असते तितकी ! तरी तो माणूस बाहेरून येणाऱ्या – जाणाऱ्या मुली डोळे फाडून पाहत असतो…बोलता – बोलता त्याने लग्नानंतरही एक मुलगी कशी त्याच्या गळ्यात पडत होती त्याची रसभरीत कहाणी सांगितली