लेखसंग्रह

देवगड हापूस 

Category:

 

मूळ देवगड हापूस आंबा, हे प्रकरण काय आहे, हे ज्याने तो एकदा खाल्लाय त्यालाच कळू शकतं. पुलंनी उगाच नाही त्याला “सगळ्यांचो बापुस” असं म्हटलंय. एकदा का देवगड हापूस मुखात गेला, की इतर सगळे आंबे त्याच्यापुढे अगदी फिके वाटू लागतात. त्याचं रूप, त्याची कांती अगदी वेगळी असते. सुरकुतलेला , थकलेला, मरगळलेला देवगड हापूस असूच शकत नाही.

  August 19, 2022


साहित्य - ललित

रंग अवकाशाचा मुक्तयात्री – अशोक साठे

Category:

 

आमच्या मेंदूच्या एका कप्यात चक्रावर्तासारखा तू का भिरभिरत असतोस? काही निमित्तांनी (आता नाट्यसंमेलन) अंधारानंतर सायक्लोरामावर पडलेल्या लख्ख पहाट प्रकाशासारखा का आठवत राहतोस? जसाच्या तसा! तुझ्याबरोबर घालवलेला प्रत्यक्ष क्षण तळहातावर स्वातीच्या थेंबाचा मोती ठेवावा, तसा मनचक्षूसमोर सजीव होऊन उलगडत राहतोस (हे जरा शब्दबंबाळ वाटतंय ना?) नाटकाची संहिता वाचताना हळूहळू अस्पष्ट, पण मग साकार दिसणाऱ्या पात्रासारखा, प्रसंगासारखा (हे तुला जवळचं वाटेल).

  August 19, 2022


लेखसंग्रह

गढवालमधील पंचप्रयाग

Category:

 

भारतात नद्यांविषयी पावित्र्याची व आदराची भावना आहे. नद्यांमुळे आपले जीवन समृद्ध होते व म्हणून आपण त्यांना आई मानतो, त्यांना देवस्थानी बसवतो.

  August 19, 2022


साहित्य - ललित

भारतमातेच्या वीरांगना – ५७ – मीरा बहन

Category:

 

७ नोव्हेम्बर १९२५ साली त्या भारतात आल्या, त्यांना घ्यायला सरदार वल्लभाई पटेल, महादेव देसाई आणि स्वामी आनंद गेले होते. इथे आल्यावर त्या हिंदी भाषा शिकल्या, भगवद्गीता शिकल्या, आणि गांधीजींच्या आश्रमाची पूर्ण कार्यपद्धती स्वीकारली, मैडलीन च्या मीरा बहन झाल्या, स्वाभाविकच आहे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाचासुद्धा त्या हिस्सा बनल्या. तत्पूर्वी १९३१ साली लंडन ला झालेल्या गोलमेज परिषदेच्या त्या हिस्सा बनल्या. १९३१ साली असहकार आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला परिणामी दोन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा झाली. त्यातून बाहेर आल्यावर त्यांनी भारताची बाजू इतर देशांसमोर मांडायला सुरवात केली.

  August 19, 2022


लेखसंग्रह

डोळ्यासमोर आई वडिलांची हत्या पाहणारा गीतकार -गुलशन बावरा

Category:

 

गुलशन बावरा यांनी कायम हसती खेळती गाणी लिहिली. पण बालपणाच्या प्रसंगाची व्यथा त्यांना कुठे तरी सलत होती म्हणूनच त्यांनी जंजीर मधले “ बनाके क्यू बिगाडा , बिगाडा रे नासिबा उपरवाले “ हे गाणे लिहिले. त्यांनी अनेक संगीतकाराबरोबर काम केले. पण त्यांचे जास्त  सूर जुळले ते कल्याणजी आनंदजी व आर.डी बर्मन यांच्या बरोबर. त्यांनी जवळ जवळ २४० गाणी लिहिली. त्यांनी हौस म्हणून जवळ जवळ १५ चित्रपटात काम केले.(जंजीर चित्रपटाच्या “दिवाने है दिवानोको न घर चाहिये “ या गाण्यात रस्त्यावर पेटी वाजवताना दिसतात.)

  August 19, 2022


लेखसंग्रह

ओळख महाराष्ट्रातील जंगलांची : भाग ५ – सदाहरित जंगलातील धन्वंतरी – अर्जुन वृक्ष

Category:

 

हा वृक्ष २५ ते ३० फुट वाढणारा असून तो आकाराने मोठा आहे. उभ्या व लांबट अशा त्याच्या खपल्या पडतात. त्याची पाने ही ऋतूपर्णी, चामड्यासारखी १३ ते २० से.मी. वाटूळकी व देठाकडे निमुळती होणारी असतात. शेंडे पिवळसर असतात. त्याची फळे ही २.५० ते ५ से.मी. लांब चामड्या सारखी जाड पंख, निमुळती व त्यावर आडव्या रेषा व त्याला पंचाकृती आवरण असते.

  August 19, 2022


लेखसंग्रह

स्वातंत्र्यदिन आणि मोरु

Category:

 

१५ ऑगस्टला सकाळी मोरुचा बाप मोरुला उठवायला आला. “अरे मोरु ऊठ, आज स्वातंत्र्यदिन. बघ सगळीकडे कशी देशभक्तीपर गाणी लागली आहेत. चल लवकर आटपून झेंडावंदनाला जा. स्वातंत्र्यदिन आपण उत्साहाने साजरा करायला हवा.”

  August 19, 2022