No Picture
लेखसंग्रह

चंद्रावरचं बर्फ

Category:

 

चंद्रावर पाणी अस्तित्वात असल्याचं पूर्वीच माहीत झालं आहे. यातलं काही पाणी हे विविध खनिजांतील पाण्याच्या रेणूंच्या स्वरूपात अस्तित्वात आहे, तर काही पाणी हे बर्फाच्या स्वरूपात अस्तित्वात आहे. बर्फाच्या स्वरूपात अस्तित्वात असलेलं पाणी हे मुख्यतः, चंद्राच्या ध्रुवीय प्रदेशातील विवरांच्या तळाशी वसलेलं आहे. हे पाणी एकूण किती असावं याची निश्चित माहिती नसली तरी, बर्फाच्या स्वरूपात असलेलं हे पाणी कोट्यवधी टन असावं. चंद्रावरील विवरांच्या तळाशी जमा झालेलं हे पाणी मुख्यतः, धूमकेतू आणि अशनींच्या (लघुग्रह) माऱ्याद्वारे जमा झालं असावं. ध्रुव प्रदेशांजवळील विवरांत सूर्यकिरण अतिशय तिरके पडत असल्यामुळे, यांतील अनेक विवरांच्या तळाशी सूर्यप्रकाश पोचत नाही. त्यामुळे हे तळ पूर्ण वेळ अंधारात असतात व इथलं तापमान हे नेहमीच शून्याखाली दीडशे अंशांपेक्षा कमी असतं.

No Picture
साहित्य - ललित

फेका’डे भाऊजी

Category:

 

मल्टी लेव्हल मार्केटिंग’ म्हणजेच ‘मला लोंबकळलेली माणसं’.. अशा स्किममध्ये आपल्याला अडकवणारे, नंबर एकचे ‘फेकाडे’ असतात.. माझा इयत्ता पहिलीतला मित्र, माझ्या पन्नाशीत मला भेटला. त्यानं जनरल चौकशीनंतर, विषयाला हात घातला. तो म्हणाला, ‘आतापर्यंत खरं तर तू, तुझ्या कारमधून फिरायला हवा होतास.. अजूनही वेळ गेलेली नाही.. तू माझ्या स्किममध्ये सहभागी हो.. काही महिन्यांतच कारमधून फिरशील..’ मला ओशाळल्यासारखे झाले.. एवढं कळकळीनं सांगतोय, तर प्रयत्न करुन बघू.. म्हणून मी सहभागी झालो.. आठवड्यातून तीन वेळा सेमिनारला जाऊ लागलो. कळसूत्री बाहुलीप्रमाणे, लेक्चर देणाऱ्याच्या इशाऱ्यावर टाळ्या वाजवू लागलो.. दरवेळी एखाद्या नवीन मित्राला, ‘बकरा’ करुन घेऊन जाऊ लागलो.. महिन्याभरातच, माझ्याखाली कुणालाही जोडू न शकल्याने स्किममधील पैसे वाया गेले आणि मी नैराश्यात गेलो..

No Picture
कथा

उल्लू टिल्लू बेडूक (संक्षिप्त रूपांतरीत कथा २२)

Category:

 

ह्या राजा जेवढा विनोदप्रिय होता, तेवढी विनोदप्रियता असलेल्या दुस-या कुणा व्यक्तीबद्दल मी कधी ऐकलं नव्हतं. त्याचे जगणंच विनोदासाठी होतं असावं. त्याची मर्जी कमवायची असेल तर विनोदी गोष्ट त्याला ऐकवायची. त्यामुळे त्याचे जे सात मंत्री होते ते सगळे उत्तम विदूषक होते.

No Picture
कथा

ऋणानुबंध (कथा)

Category:

 

आधीच रविवारचा सुटीचा दिवस. त्यातही अमर पार्टी हॉल निमंत्रकांनी भरलेला होता. राजू-राणीचे मित्रमैत्रिणी डॉ. शरदचे हॉस्पिटलमधील कर्मचारी, आदी संबंधितांनी बाळ संदेशच्या वाढदिवसाला फार शोभा आणली होती. राणी त्याच हॉस्पिटलमध्ये बरीच वर्षे परिचारिकेचे काम करीत होती. साहाजिकच साऱ्यांची ती लाडकी होती. राजेंद्र म्हणजे राजू हा तर डॉ. शरद यांचा अगदी जवळचा, मग काय विचारता? परकेपणा कुठेच नव्हता. कडक, शिस्तीची पण प्रेमळ व कामसू राणीने साऱ्यांचीच मने जिंकली होती. राजू-राणीच्या बाळाचा वाढदिवस म्हणजे जणू घरचाच कार्यक्रम.

No Picture
साहित्य - ललित

आयुष्याची माती

Category:

 

१९२३ साली गिरगाव चौपाटीवर उभ्या राहिलेल्या लोकमान्यांच्या पुतळ्याला, पुढच्या वर्षी शंभर वर्षे पूर्ण होत आहेत.. मुंबईत, या नव्याण्णव वर्षात आमूलाग्र बदल झाला. तरीही बदलला नाही, तो ताठ मानेनं उभा असलेला लोकमान्य टिळकांचा पुतळा.. शतकानुशतके तो सांगत राहिल… गाथा, एका ‘आयुष्याच्या मातीची’….

No Picture
साहित्य - ललित

अंबाक्का

Category:

 

या चित्रपटाचं यश जातं, पटकथा-संवाद लिहिणाऱ्या अण्णा देऊळगावकरांना.. कथानक जरी उत्तम असलं तरी ते चुरचुरीत संवादांनी फुलवणं, हे काम अण्णांनी लीलया केलं. प्रेमा किरणचा हा पहिलाच चित्रपट होता.. तिला त्यांनी ‘अंबाक्का’ हे टिपिकल गावठी नाव दिलं.. तिच्या पहिल्याच एंट्रीला ‘काॅटन स्मिता’ असा लक्ष्याच्या तोंडी संवाद दिला.. सिल्क स्मिता ही दक्षिणेकडील हाॅट नायिका होती, ही महाराष्ट्रातील.. म्हणून ‘काॅटन स्मिता’! पहिल्याच चित्रपटात तिची व लक्ष्याची केमिस्ट्री जुळली व नंतर दोघांनी अनेक चित्रपटांतून धमाल कारकिर्द केली..

No Picture
लेखसंग्रह

आवडणारे गंध

Category:

 

स्वीडनमधील कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूटमधील आर्तिन अर्शामिआन आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी या प्रश्नांचं उत्तर शोधण्याचा यशस्वी प्रयत्न आपल्या संशोधनाद्वारे केला आहे. गंधांवरचं हे संशोधन ‘करंट बायोलॉजी’ या शोधपत्रिकेत अलीकडेच प्रसिद्ध झालं आहे. संख्याशास्त्राचा आधार घेणाऱ्या या संशोधनातून निघालेले निष्कर्ष लक्षवेधी ठरले आहेत.

No Picture
साहित्य - ललित

गजरेवाला

Category:

 

पूर्वी ‘ती फुलराणी’ सारख्या नाटकांच्या प्रयोगाला प्रेक्षागृहात, मोगऱ्याचा दरवळ सुटायचा. आता तशी नाटकंही नाहीत आणि प्रेक्षकही.. काही समारंभाना, सोहळ्यांना आयोजकच प्रेक्षकांना दरवाजाशीच गजरे देत असत. सहाजिकच तेथील वातावरण सुगंधित होत असे..

No Picture
साहित्य - ललित

कात्रीची करामत

Category:

 

वामन भोसले यांनी उत्कृष्ट संकलन केलेल्या.. दो रास्ते, मेरा गाव मेरा देश, दोस्ताना, गुलाम, अग्निपथ, परिचय, आँधी, कर्ज, कालिचरण, साहेब, रामलखन, खलनायक, इत्यादी सुपरहिट चित्रपटांना चित्ररसिक कधीही विसरू शकणार नाहीत…