No Picture
साहित्य - ललित

आभाळाचे खांब : १

Category:

 

अन्यथा जात, पात, धर्म, पंथ, राजकारण आणि स्वार्थ यात गुंतून गेल्यानं नव्या पिढीच्या डोक्यावरचं आभाळ हरवून जायला वेळ लागणार नाही आणि मग काळ कुणालाही क्षमा करणार नाही!

No Picture
साहित्य - ललित

उगवतीच्या कळा : ६

Category:

 

एखाद्या संहितेचं भागधेय असतं. प्रत्येक वेळी यश लाभतं असं नाही. पण मी नाराज नाही. कारण माझी संहिता दमदार आहे. कथानक वेगळं आणि हसताहसता विचार करायला लावणारं आहे. दिग्दर्शक आणि कलाकार यांना रंगमंचावर मनसोक्त धुमाकूळ घालायला संधी मिळणार आहे आणि … आणि बरंच काही आहे त्या संहितेत.

No Picture
साहित्य - ललित

उगवतीच्या कळा : ५

Category:

 

त्यानंतर राजाभाऊंनी माझ्या अनेक कथा , कादंबऱ्या प्रसिद्ध केल्या आणि मला स्वतःची अशी ओळख दिली. त्यावेळी महाराष्ट्रभर जाणाऱ्या माहेर , मेनका या लोकप्रिय मासिकांमधून आणि रविवारची जत्रा या लोकप्रिय साप्ताहिकामधून त्यांनी मला प्रचंड प्रसिद्धी दिली ,जी रत्नागिरीसारख्या ठिकाणी असणाऱ्या मला दुर्मिळ होती. यथावकाश अन्य पुस्तकं प्रसिद्ध झाली. मानसन्मान , पुरस्कार लाभले. पण त्या पहिल्या पुस्तकाच्या आठवणी काही औरच!

No Picture
साहित्य - ललित

उगवतीच्या कळा : ४

Category:

 

तात्या म्हणजे त्यावेळचे काँग्रेसचे खासदार मोरोपंत जोशी. नवकोकण या नावाच्या साप्ताहिकाचे ते मालक , मुद्रक , संपादक होते. तेव्हा आम्ही टिळक आळीत रहात होतो. नवकोकण चा छापखाना आणि कार्यालय टिळक आळीत होते. तात्यासुद्धा टिळक आळीत राहायचे. ते वृद्ध होते , राज्यसभेचे खासदार होते. त्यांच्याबद्दल सर्वाना आदर होता. मी त्यांच्याकडे गेलो तेव्हा ते काहीतरी लिहीत होते . मी त्यांना हाक मारली . तेव्हा चष्मा थोडा पुढे ओढून त्यांनी माझ्याकडे पाहिले .

No Picture
साहित्य - ललित

उगवतीच्या कळा : ३

Category:

 

आकाशवाणीनं आयोजित केलेल्या अखिल भारतीय नभोनाट्य लेखन स्पर्धेत मला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालं होतं. माझ्या डेथ ऑफ कॉमनसेन्स या नभोनट्याला अखिल भारतीय स्तरावरचा प्रथम क्रमांक मिळाला होता , त्याचे चौदा भारतीय भाषांत भाषांतर झाले होते. ते पारितोषिक दिल्लीत स्वीकारताना असाच टाळ्यांचा गजर झाला होता. यशाची सुरुवात गोगटे महाविद्यालयात झाली होती आणि केंद्र शासनाच्या पुरस्काराने त्या यशाला झळाळी लाभली होती .

No Picture
लेखसंग्रह

गोर्‍हे

Category:

 

महात्मा ज्योतीराव फुले म्हणजे ज्योतीराव गोविंदराव गोर्‍हे. गावात कुलकर्ण्याच्या वादामुळे गोर्‍हे कुटुंबीय सातारा जिल्ह्यातील कटगूण गाव सोडून पुण्यात धनकवडीला स्थायिक झाली. ते पुण्यात फुलांचा व्यवसाय करू लागले. त्यावरून त्यांचे आडनाव फुले असे रूढ झाले असावे.

No Picture
साहित्य - ललित

उगवतीच्या कळा : २

Category:

 

लेखक म्हणून मी जेव्हा लिहायला लागलो तेव्हा कथानकं , मांडणी , शैली , पात्रं , प्रसंग , संवाद यांचं महत्व काय आणि कसं असतं , त्यात शब्दांचा वापर किती जपून करावा लागतो हे अर्थातच आपोआप मनावर ठसलं गेलं होतं. वादविवाद स्पर्धा , वक्तृत्व स्पर्धा आणि परीक्षेच्या काळातही गुरुवर्य बाबीराव गोडबोले सरांच्या घरातील ज्ञानभांडाराचा मला खूप उपयोग झाला. – उगवतीच्या काळातील ह्या कळा विसरता येत नाहीत .

आश्विन शुद्ध पक्षी अंबा बैसली सिंहासनी हो…
लेखसंग्रह

आश्विन शुद्ध पक्षी अंबा बैसली सिंहासनी हो…

Category:

 

आश्विन शुक्ल  प्रतिपदेला होणारी घटस्थापना ह एक काम्य व्रत आहे. काळाच्या ओघात या व्रताला अनेक कुटुंबात कुलाचाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. देवीचे नवरात्र हे वसंत(चैत्र) आणि शरद(आश्विन) या दोन ऋतूमध्ये साजरे केले जाते. त्यापैकी शारदीय नवरात्री याविषयी हा संक्षिप्त परिचय

No Picture
साहित्य - ललित

उगवतीच्या कळा : १

Category:

 

परिस्थितीचा रेटा असायला हवा. त्यात गरिबी हवी. आत खोलवर जाऊन पोहोचलेली स्वाभिमानाची जाणीव हवी. स्वतःच्या पायावर उभं राहण्याची ईर्ष्या हवी. अडथळ्यांना न जुमानता वाट शोधण्याची दृष्टी हवी. त्यासाठी सभोवतालचा अंदाज घेत कल्पकतेनं उडी मारण्याची आणि उभारी घेण्याची मनाची तयारी हवीच हवी. मग काय होतं?

No Picture
साहित्य - ललित

अनपेक्षित (कथा – सांगोपांग : २)

Category:

 

जी कथा लिहिताना , लिहिल्यानंतर आणि आजही वाचताना मी खूप अस्वस्थ होतो ती कथा म्हणजे अनपेक्षित. समाजातील अशा प्रकारच्या वृत्ती असणाऱ्यांच्या भविष्यकाळाच्या जाणिवेनं मन सुन्न होतं. आणि ते स्वाभाविकच आहे , नाही का ? तुम्हाला काय वाटत ? कळवा मला.