लिश्टनस्टाइन
Category:
शहरे आणि गावेलिश्टनस्टाइन हा पश्चिम युरोपातील स्वित्झर्लंड व ऑस्ट्रिया ह्या देशांच्या मधे वसलेला एक छोटा भूपरिवेष्ठित देश आहे. लिश्टनस्टाइन जगातील सहावा सर्वात लहान देश आहे. ह्या देशाचा बराचसा भाग डोंगराळ आहे.
Category:
शहरे आणि गावेलिश्टनस्टाइन हा पश्चिम युरोपातील स्वित्झर्लंड व ऑस्ट्रिया ह्या देशांच्या मधे वसलेला एक छोटा भूपरिवेष्ठित देश आहे. लिश्टनस्टाइन जगातील सहावा सर्वात लहान देश आहे. ह्या देशाचा बराचसा भाग डोंगराळ आहे.
Category:
लेखसंग्रहसत्तावीस नक्षत्रांच्या मालिकेत पाचव्या क्रमांकावर हे नक्षत्र येते. राशींचा विचार केल्यास वृषभ आणि मिथुन राशींच्या व्यक्तींचा जन्माच्या वेळी, पहिल्या २ चरणासाठीवृषभ आणि नंतरच्या दोन चरणांसाठी मिथुन राशी आहे. कष्ट आणि शृंगार वा मौजमजा करणाऱ्या अशा दोन स्वभावाचे व्यक्तींचा राशींसाठी मृग नक्षत्राची योजना आहे. शीतरंग म्हणजे निळा, जांभळा, हिरवा, हिरवट जांभळा, पिवळट हिरवा, पोपटी या रंगांचा सकारात्मक प्रभाव या नक्षत्रावर पडतो. या नक्षत्रावरच पावसाचा जोर अधिक असतो. त्यामुळे या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींच्या प्रकृतीवर जलतत्वाचाच प्रभाव अधिक असतो.
Category:
साहित्य - ललितडोंबिवलीत घडलेल्या एका खंडणीप्रकरणाची चौकशी आणि तपासकथा….. एका सत्य घटनेवर आधारित….
Category:
साहित्य - ललितरात्रभर ड्रायव्हिंग करून थकलेल्या रहिमने आपली टॅक्सी नेहमीच्या जागी पार्क केली. तिच्या महा.xx/०७८६ या नंबर प्लेटच्या खाली बारीक अक्षरातीत ‘फरिश्ता’ या शब्दा कडे पाहून तो समाधानाने हसला. आता रात्री नउ साडेनऊ पर्यंत निवांत होते. रहिम रात्रीच टॅक्सी चालवत असें.
Category:
साहित्य - ललितएका दागिने व्यापार्याच्या घरी झालेल्या चोरीच्या सत्य घटनेवर आधारित ही पोलीस तपासकथा.
Category:
साहित्य - ललितरात्रीचे किती वाजलेत माहित नाही. पण सर्वत्र निजानीज झाली होती. रात्रीची भयाण शांतता आणि गारवा जाणवत होता. मी अंधारातच अंथरुणावर पडल्या पडल्या डोळे किलकिले करून पहिले आणि कोनोसा घेतला. मधेच जाग कशाने आली? लक्षात येत नव्हते. कसलीतरी खाडखूड ऐकू आली. बहुदा अशाच आवाजाने झोपमोड झाली असावी. पुन्हा तोच खड्खुडीचा आवाज.
Category:
कथा साहित्य - ललित“आहो ताई,आमच्या समद्या झोपडपट्टीत हेच हाय, येथे आम्ही घरोघरी रोजच्या वीसतीस रुपयांसाठी भांडी घासतो,कामं करतो ते काही उगीच नाही.सर्वांचे नवरे खूप कमाई करत्यात दिवसभर, आणि रात्री पुरी दारूत घालवत्या. पुन्हा काही बी बोलायचे नाही आम्ही.बोललो तर भांडण, शिव्या आणि मारामारी. जरा जास्त काही बोलायला गेलो तर हे, आज घडले तसे चालू असते चार आठ दिवसांला”.
“नवरे कशे हे असे? हे तर बुजगावणे आहेत आपले. यांचा एकही पैसा लागत नाही कधी संसारासाठी, घरासाठी. पण आमची कमाई मात्र सलते यांच्या डोल्यात. संसार हाकायला एकाची तरी कमाई नको का?”
Category:
शहरे आणि गावेटोंगा हा ओशनिया खंडाच्या पॉलिनेशिया भागातील एक छोटा द्वीपसमूह-देश आहे. टोंगा दक्षिण प्रशांत महासागरामधील १७६ लहान बेटांवर वसला आहे. यांपैकी ५२ बेटांवर वस्ती नाही. ही बेटे अंदाजे ७,००,००० किमी२ भागात पसरलेली आहेत.
Category:
शहरे आणि गावेमार्च महिन्यात इतरत्र अभावानेच आढळणारी पांढरट पिवळी टपोरी तोरणीची फळे बाजारात येतात. अलिकडे या फळांचे प्रमाण कमी झाले आहे. आंबट-गोड चवीची ही फळे इथल्या विविधतेची ओळख करून देतात.
Category:
लेखसंग्रहमाझा जन्म नागपूर मधील १९४२ च्या प्रचंड उन्हाळयातला. मी बहुदा पाणी पाणी म्हणून पहिले रडणे सुरू केले असावे. जन्मत: दुधापेक्षा मला पाणी जास्त प्रिय आणि यामुळेच पाण्याने सतत माझा पिच्छा पुरवला आहे.
माझे बालपण चाळीतून चालू झाले, घरात दोन नळ होते पण त्यातून पाणी आल्याचे मी कधी पाहिले नव्हते. पुस्तकातल्या चित्रात केवढा पाण्याचा झोत दाखवीत. सार्वजनिक मोरीतील नळाला रात्री २ तास करंगळीच्या धारे इतके पाणी येत असे. तेथील झुंबड व बाचाबाची नित्याची होती. पाणी भरणे व ते विविध भांडयात साठविणे हा आमच्या प्रत्येकाच्या जीवनाचा महत्वाचा घटक म्हणजे बालपणापासून हेच पहिले संस्कार होते.
Copyright © 2025 | Marathisrushti