बेल्जियम
Category:
शहरे आणि गावेबेल्जियम हा पश्चिम युरोपातील एक देश आहे. बेल्जियमच्या उत्तरेला नेदरलँड्स व उत्तर समुद्र, पूर्वेला जर्मनी, दक्षिणेला लक्झेंबर्ग व फ्रान्स व पश्चिमेला फ्रान्स हे देश आहेत. बेल्जियम हा युरोपियन युनियनचा स्थापनेपासूनचा सदस्य देश आहे व संघाचे मुख्यालय ब्रसेल्स येथे स्थित आहे. तसेच नाटोसकट इतर अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांचा बेल्जियम सदस्य देश आहे.