श्री. रामचंद्र शिवाजी कदम उर्फ राम कदम; व्यक्ती नव्हे, प्रवृत्ती..
Category:
लेखसंग्रहश्री. रामचंद्र शिवाजी कदम हे भारदस्त आणि भारतीय समाजाच्या संस्कारांचे पुतळे समजल्या जाणाऱ्या थोरांचं नांव आपल्या नांवात गुंफलेल्या महाशयांना आपण सांप्रत राम कदम या नांवाने ओळखतो. ‘नांवात काय आहे’ असं शेक्सपियर म्हणाला होता, याची या क्षणाला आठवण होते. प्रभु रामचंद्र हे स्वत:चं नांव आणि वडिलांचं नांव छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण करुन देणारं, याचं भान राम कदमांनी सोडलं व नांव काहीही असलं तरी त्यांची मूळ प्रवृत्ती रावण आणि मोगलांचीच आहे, याची त्यांनी पुन्हा एकदा प्रचिती दिली.