No Picture
लेखसंग्रह

मुंबैच्या टॅक्सीला लागलेल्या हळदीची गोष्ट

Category:

 

मुंबयची काली-पिली म्हंजे, मुंबयची काळी-पिवळी टॅक्सी. मी पाहिली ती देखणी, आटोपशीर, बांधेसूद फ्याट (‘फियाट’) गाडी. ॲंबेसिडर टॅक्सी मुबईत क्वचितच दिसायची आणि तिच्यावर ‘मोठी टॅक्सी’ असं ठसठशीतपणे लिहिलेलं असायचं. टॅक्सी असो कोणतीही, पण त्या काळात ड्रायव्हर असायचा तो सरदारजीच..! त्या काळात टॅक्सी म्हणजे काय तरी अप्रुपच वाटायचं. खाजगी गाड्या तर अगदी दुर्मिळ. टॅक्सीत बसणं म्हणजे स्वर्गप्राप्ती झाल्यासारखंच वाटायचं.

No Picture
लेखसंग्रह

शासकीय भाषा आणि ( अनेकदा गैरही ) अर्थ !

Category:

 

शासन व्यवहारात मराठी भाषेच्या सक्तीच्या वापरासंबंधी मध्यंतरी बातम्या प्रकाशित झाल्या. यात खरं नेमकं काय आहे ? आदेश म्हणजे order , परिपत्रक म्हणजे circular , ताकीद म्हणजे warning , शासन निर्णय म्हणजे Government order ( प्रत्यक्षात तो शब्द हवा Government Resolution किंवा Administrative Order ) …आणि या प्रत्येकाचे अर्थ वेगळे आहेत शिवाय त्या प्रत्येक शब्दाला वैधानिक मूल्य आहे आणि अंमलबजावणीच्या ‘तर्‍हा’ही वेगळ्या आहेत हे माहिती असल्यानं संभ्रमच निर्माण झालं .

No Picture
लेखसंग्रह

होय, मला राज्यकर्त्यांनी फसवलंय

Category:

 

होय, मला सर्व पक्षीय राज्यकर्त्यांनी फसवलंय. मला आय.ए.एस., आय. पी. एस. वा तत्सम पदवीधारक अधिकाऱ्यांनीही फसवलंय. माझा साधं सोपं जीवन जगण्याचा हक्क हिरावून घेऊन यांनी मला मोठी स्वप्न दाखवून फसवलंय. पहिलं गरीबी हटाव आणि नंतर अच्छे दिनचा नारा देऊन मला या सर्वांनी फसवलंय..

No Picture
लेखसंग्रह

माझी मा’लवणी’..

Category:

 

आमची मालवणी फटकळ (सभ्य भाषेत स्पष्टवक्ते) म्हणून प्रसिद्ध. पण एक सागतो, फटकळ माणसाच्या मनात काही नसतं. जे आहे ते बोलून मोकळं होणार, मनात काही ठेवणार नाही. हे या भाषेचं वैशिष्ट्य मालवणील् समुद्राने बहाल केलंय. समुद्र कसा, पोटतला कचरा पुन्हा किनाऱ्यावर आणून टाकतो, अगदी तसंच. इथे ‘मुतण्या’ला ‘मुतणं’च आणि ‘हगण्या’ला ‘हगणं’च म्हणणार.

No Picture
साहित्य - ललित

पिशव्या बघायची खोड

Category:

 

लंडनच्या बीबीसीत नसतील एवढया सनसनाटी बातम्या आडगेवाडीच्या देवानंद हेअर कटींग सलूनमध्ये चर्चेत असायच्या. गावातली कुठलीही खबर या ठिकाणी लागली नाही असे कधीच व्हायचे नाही. बारा तास इथे लोकांचा राबता असायचा. इलेक्शनची सभा, चावडीची मिटींग, बुडीत सोसायटीची चर्चा चार लोकांच्यात इथेच व्हायची. सलूनमध्ये येउुन बसायला कुणालाही मज्जाव नव्हता. उलट कोण आला की नारु हातातल्या धारदार शस्त्रासह नमस्कार घालून त्याचे स्वागतच करायचा.