No Picture
लेखसंग्रह

आडनावाचीही पसंती हवी

Category:

 

काही मराठी आडनावे इतकी विचित्र आणि लाजिरवाणी असतात की, ती, त्या कुटुंबांनी का स्वीकारली, कोणत्या कारणामुळे रूढ झाली आणि पिढ्यानपिढ्या कशी वापरात ठेवली हे फार मोठे गूढ आहे. अशी आडनावे धारण करून समाजात वावरणार्‍या मुला-मुलींना विशेषतः विद्यार्थी/विद्यार्थीनींना आणि लेकी-सुनांना टीका, निंदा, हेटाळणी आणि टिंगल यांना सतत तोंड द्यावे लागते, मनस्ताप सहन करावा लागतो अशी अडचणीची आडनावे बदलण्याची आवश्यकता आहे. ती आडनावे बदलून घ्यावीशी वाटण्याची प्रेरणा समाजात रुजली पाहिजे. समाजासाठी आडनाव धारण करून, समाजात वावरावयाचे असल्याने, विक्षिप्त आडनावे हा सामाजिक कलंक आहे असे मी मानतो आणि तो पुसण्यासाठी, धुवून काढण्यासाठी पुरोगामी बदलत्या दृष्टीकोनातून उपाय योजायला हवेत, प्रयत्न करायला हवेत. कायदेशीररित्या नावात/आडनावांत बदल करून घेणे हा प्रमुख आणि प्रभावी उपाय आहे.

No Picture
लेखसंग्रह

आडनावाची गरज : व्यक्तीची अचूक ओळख

Category:

 

समाजात, आडनावामुळे तो विशिष्ट कुटुंबगट ओळखला जातो. आडनावामुळे त्या कुटुंबातील व्यक्तीच्या आनुवंशिक स्वभाववैशिष्ठ्यांची आणि गुणावगुणांचीही ओळख पटते. विवाह जुळवितांना या माहितीचा फार अुपयोग होतो.

No Picture
लेखसंग्रह

मराठी आडनावे कोश : सुरूवात आणि कार्यपध्दती

Category:

 

मराठी ज्यांची मातृभाषा आहे अशा कुटुंबांच्या आडनावांची, अक्षरानुक्रमे यादी, 3 मे 1963 पासून, म्हणजे माझ्या 30 व्या वाढदिवसापासून, एका डायरीत लिहीण्यास सुरूवात केली. हीच मराठी आडनावकोशाची सुरूवात. ऑगस्ट 1970 पर्यंत 6 हजार, नोव्हेंबर 1972 पर्यंत 8 हजार तर 1973 च्या जून महिन्यापर्यंत जवळजवळ 10 हजार आडनावे जमा झाली होती. सध्या हा आकडा 60 हजारापर्यंत पोचला आहे.

No Picture
कथा

कठोर शिक्षा – भाग १

Category:

 

सुविख्यात वकील श्री. नारायण – (ऊर्फ नानू) प्रभु याला अशी सलगी मुळीच आवडली नाहीं. तो कामात गर्क होता. इतर वकीलांबरोबर कोर्टाच्या प्रतीक्षालयात (Common Room मध्ये) बसून आजच्या कामाचा आढावा घेत होता. त्याची पाठ दाराकडे होती म्हणून कोण हांक मारत होतं ते आधी समजलं नाहीं. त्याने पाठ वळवली आणि त्याला ओळख पटली. इतर वकीलही माना वळवून पाहूं लागले. ।।

No Picture
साहित्य - ललित

तबला आणि मी

Category:

 

तबला हे खरेच एक तालेवार प्रकरण असते . हे महाराज कधी खाली भुईवर बसत नाहीत . याना स्वतंत्र बैठक लागते ! तबल्याला आणि डग्ग्याला वेगवेगळी ! गिटारी सारखे हे गळ्यात पडत नाहीत कि लाडे – लाडे त्या गिटारी सारखे खांद्यावर चढत नाहीत , कि ‘माऊथ ऑर्गन ‘सारखा मुका घेत नाहीत ! तबला म्हणजे एकदम खानदानी काम हो !

No Picture
आरोग्य

तुवरक / कडू कवठ

Category:

 

तुवरकाचे उपयुक्तांग आहे बीज व बीज तेल.हे चवीला तुरट,कडू,तिखट असून उष्ण गुणाचे व हल्के स्निग्ध व तीक्ष्ण असते.तुवरक कफनाशक व वातनाशक आहे.

No Picture
आरोग्य

प्रियंगु / गव्हला

Category:

 

ह्याचे उपयुक्तांग पाने व फुले असून हे चवीला कडू,तुरट,गोड असते.तसेच हे थंड गुणाचे व जड व रूक्ष असते.हे त्रिदोष शामक असून वात व पित्तनाशक आहे.