No Picture
साहित्य - ललित

स्वर्गाचे सरकार

Category:

 

जगातल्या सर्वच देशांमध्ये अनेक सरकारे आली आणि गेलीही. मात्र अनंत काळापासून सकल ब्रम्हांडावर राज्य करणारे, संपूर्ण बहुमत असलेले, अलौकिक, एकमेवाद्वितीय अढळ व स्थिर सरकार म्हणजेच “स्वर्गाचे सरकार”. या सरकारमधील मंत्रीमंडळाचे खातेवाटप एकदाच झालेय. त्यात पुन्हापुन्हा बदल होत नाही. कोणताही मंत्री दुसर्‍या मंत्र्याच्या कामात ढवळाढवळ करत नाही. सगळेच मंत्री कार्यक्षम असल्यामुळे एकमेकांच्या तक्रारीसुद्धा करत नाहीत.

No Picture
लेखसंग्रह

महाराष्ट्राचे “आपले सरकार”

Category:

 

महाराष्ट्रात ‘राईट टू सर्व्हिस अॅक्ट’ म्हणजेच सेवा हमी कायदा लागू झालाय. यामुळे, आता तुम्हाला जन्म दाखला, लग्नाचा दाखला, लायसन्स अशा सेवा मिळवण्यासाठी सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची गरज लागणार नाही. सरकारी सेवा तुम्हाला आता घरबसल्या एका क्लिकवर मिळू शकणार आहेत. यासाठी तुम्हाला सरकारी वेबसाईटवर अप्लाय करावा लागेल… आणि ठराविक कालावधीत तुम्हाला हवे असलेल्या सेवा मिळू शकतील.

No Picture
व्यक्ती-परिचय

मराठी चित्रपटसृष्टीतील महान दिग्दर्शक अनंत माने

Category:

 

अनंत माने हे पाच तपांहुन अधिक काळ चित्रपटसृष्टीसाठी व्यतीत करणारे व मराठी चित्रपटसृष्टीवर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे दिग्दर्शक. वयाच्या ऎंशी वर्षापर्यंत तब्बल साठ चित्रपट दिग्दर्शन करणारे अनंत माने हे एकमेव दिग्दर्शक आहेत. अवघ्या ६० हजारांत चित्रपट निर्माण करून अनंत मानेंनी मराठी चित्रपट जगवला. याचे श्रेय त्यांच्या ‘सांगते ऐका’ या तमाशापटाला द्यावे लागेल. तमाशापट हा मराठी चित्रपटांचा नवा चेहरा होता. तो मानेंनी मराठी चित्रपटांना दिला.

No Picture
व्यक्ती-परिचय

स्मरणीय भूमिका करणार्‍या दुर्गा खोटे

Category:

 

चित्रपट कलाकारांकडे पाहण्याचा दृष्टोकोन दूषीत होता त्या काळात दुर्गा खोटे यांना चित्रपटात येणे भाग पडले. मुलीने चित्रपटात काम करणे घरच्या लोकांना पसंत नव्हते. दुर्गा खोटे यांनी चित्रपटात अशा भूमिका केल्या की चित्रपटातील महिलांकडे पाहण्याचा दृष्टीकोनच बदलून टाकला. चांगल्या घरातील महिलाही अभिनय क्षेत्रात येऊ शकतात असा एकप्रकारे संदेशच त्यांनी दिला.

No Picture
व्यक्ती-परिचय

मराठीतले प्रथम भावगीत गायक जी.एन.जोशी

Category:

 

मराठीतले प्रथम भावगीत गायक जी.एन.जोशी यांनी गायलेले रानारानात गेली बाई शीळ हे त्यांचे भावगीत हे मराठीतले पहिले भावगीत समजले जाते. १९३५ साली मराठीतल्या या पहिल्या भावगीताची ध्वनिमुद्रिका निघाली आणि महाराष्ट्राच्या घरांघरांत पोहोचली. तुफान खप असलेल्या या तबकडीमुळे एचएमव्हीचा मोठा आर्थिक फायदा झाला आणि जी.एन. जोशी यांचा एचएमव्हीत प्रवेश झाला.

No Picture
व्यक्ती-परिचय

संगीतकार व गायक जितेंद्र अभिषेकी

Category:

 

अभिषेकींनी मराठी रंगभूमीसाठी खूप मोठं योगदान दिलेले आहे. प्रयोगशीलता हा त्यांच्या संगीत दिग्दर्शनातला महत्वाचा गुणधर्म. त्यांनी त्यांच्या संगीतदिग्दर्शनात केलेले प्रयोग लोकांनाही खूप आवडले. उदा. मैलाचा दगड ठरलेल्या कट्यार काळजात घुसली या नाटकाची सुरुवात त्यांनी भैरवीने केली होती. तर १९६६ साली रंगभूमीवर आलेल्या लेकुरे उदंड झाली या नाटकात मुक्तछंदातल्या संवादांना आणि छंदाला प्राधान्य असलेल्या गोव्यातल्या किरिस्तावांच्या तियात्राया नाट्यप्रकारातल्या संगीताचा बाज त्यांनी वापरला.