पॉपकॉर्न, बेबीकॉर्न किंवा स्वीटकॉर्न आणि मराठमोळं कणीस
Category:
खाद्ययात्रामक्याशी(कॉर्नशी) आपली पहिली ओळख पॉपकॉर्नमुळे किंवा पावसाळी हवेतल्या भाजलेल्या गरमागरम कणसामुळे झालेली असते. बेबीकॉर्न किंवा स्वीटकॉर्न ही तशी अलीकडची ओळख. पंजाब, हिमाचलातील मक्कई की रोटी आणि सरसोंका साग भेटतात, कुठल्या तरी हिंदी सिनेमात. मक्याचं मूळ सापडतं अमेरिकेत. आजही अमेरिकेच्या जवळजवळ प्रत्येक राज्यात मका पेरला जातो. मक्याची पहिली नोंद ५ नोव्हेंबर १४९२मध्ये सापडते. ख्रिस्तोफर कोलंबसच्या जगाच्या सफरीमध्ये त्याचे स्पेनमधील दोन प्रतिनिधी क्युबाच्या अंतर्भागात पोहोचले. तेव्हा त्यांनी चवदार मका चाखला. मक्याच्या पदार्थाचा उल्लेख त्यांच्या नोंदवहीत सापडतो. अमेरिकेप्रमाणेच कॅनडा आणि चिलीमध्येही मक्याचं अस्तित्व दिसलं. त्यात िफ्लट कॉर्न, फ्लोअर कॉर्न, पॉप कॉर्न या प्रकारांसारख्याच इतरही काही जाती सापडल्या. मक्याच्या शेतीने आíथक स्थर्य मिळाल्यामुळे सांस्कृतिक विकासाकडे लक्ष वळलं व नागरी जनजीवन सुखावलं.