Month: July 2010
असंच आपलं इकडलं तिकडलं
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका साहित्य - ललितएक होता राजा… त्याची काय मजा… त्यानं खाल्ला काऊ.. पोटात झाला बाऊ
गोवा
Category:
साहित्य - ललितगोव्याला आमच्या श्री. शांतादुर्गा देवीचं देऊळ आहे. श्री. शांतादुर्गादेवी ही आमची कुलदेवता. कोकणातल्या गावातला गणपती उत्सव साजरा करुन मुंबईला परतण्याआधी गोव्याला जाऊन देवीचं दर्शन घेणं हा रिवाज आम्ही अनेक वर्षे पाळतो आहोत. गंमत अशी की दरवर्षी आणखी एका कामानिमित्त गोव्याला जावंच लागतं. थोडक्यात गोव्याच्या दरवर्षी दोन फेर्या ठरलेल्या. एखाद्या वर्षी तीनवेळा सुद्धा जाणं होतं. फेरी कितवीही असो, गोव्याला जायचं म्हणजे अंगात उत्साह संचारतो. हिशेब केला तर आतापर्यंत गोव्याला पंचवीसएक फेर्या सहज झाल्या असतील. पण म्हणून गोव्याला जाण्याचा कंटाळा कधीच घडत नाही. गोवा साद घालतो आणि मी गोव्याला जातो. आतुरतेने, ओढीने. ही ओढ नेमकी गोव्याबाबत का भासते याचं उत्तर देणं कठीण आहे.
९/९ विश्वास निवास
Category:
साहित्य - ललित९/९, विश्वास निवास, परळ, मुंबई – १२ हा आमचा परळच्या घराचा पत्ता. आयुष्यातील पंचवीस वर्षे मी परळला काढली. जन्मल्यापासून म्हणजेच १९४९ सालापासून ते १९७४ पर्यंत. थोडक्यात माझं सर्व बालपण परळला गेलं. बालपण आणि तरुणपणातील काही सुरुवातीची वर्ष. आज साठीच्या दाराशी घुटमळत असतानाही मनात बालपणीच्या आठवणी टवटवीत आहेत. परळ ओलांडून पुढे जाताना या सर्व आठवणी जागृत होतात. परळचा रस्तान् रस्ता, तिथल्या इमारती, तिथली गजबज सारं काही पुन्हा आठवतं. क्षणार्धात काळ तीसएक वर्ष मागे झेपावतो. मी पुन्हा परळचा होऊन जातो आणि परळ माझं.