शुभ दीपावली !

वर्षा मागून वर्षे गेली त्याबरोबर सण आणि उत्सवांनी त्या काळाला धरून आपले मार्ग चोखाळले आणि त्याला प्रतिसाद देत तर कधी वेगवेगळी करणे सांगून त्यातून रीतीरिवाज, रूढी परंपरा बदलत गेल्या या छोट्याश्या कवितेतून ते मांडण्याचा प्रयत्न करत आहे.



क्वचित चाळीत हल्ली

शेव, चकली, चिवडा आणि लाडूचा

घमघमीत सुगंध सर्वत्र दरवळतो,

आणि दिवाळी जवळ आल्याचा भास होतो !

रात्रीची जेवणं झाल्यावर

चाळीच्या मधल्या पॅसेजमध्ये

नेहमी प्रमाणे गप्पांनी जोर धरला

!

थोर मोठ्यांच्या कोमेंट्स सुरु झाल्या !

आपल्या वेळी असे नव्हते !

एकाने विचारले असे म्हणजे कसे?

सुगंधी उटण्याची जागा साबणाने घेतली,

पहाटे लौकर उठून अंघोळीची घाई सरली !

रांगोळीने तर कातच टाकली

कसलेसे स्टिकर्स आली !

ठिपक्यांची रांगोळी विसरल्या ललना,

रत्यावरील झाकण्यानेही जमेना !

मुले कंदील करण्याचे विसरून गेली,

बाजारातून विकत आणू लागली !

आयांना हल्ली कुठे वेळा असतो,

दिवाळीचा फराळ मॉलमधून आणायचा असतो !

मातीचे किल्ले बनविण्यातून कळत होता

श्री.शिवछत्रपतींवरील दृढ विश्वास आणि निष्ठा,

आणि मावळ्यांचा शूर पराक्रम,

नकळत अंगीबाणत होते तरुणांत देश प्रेम !

सगळ्यांचे फराळ एकाच मॉलमधले

फराळाला एकमेकांकडे जाणे थांबले !

नवीन पँट-शर्ट घालून मिरवणे

कधीच इतिहास जमा झाले !

फुलबाजा, हातचक्र, भुईचक्र, अनार

यांचे नाही मुलांना प्रेम !

कर्णकर्कश विविध फटाक्यांचे

लय भारी प्रेम !

मोठया आवाजाच्या फटक्यांनी

होतय ध्वनी आणि वायू प्रदूषण !

पण त्याचे आम्हांला नसेत भान,

जीवावर बेतले की फुटतो घाम !

एकाने म्हंटले

तरी मला आशा आहे या तरुण पिढीवर,

भरकटले असतील आत्ता

पण येतील भविष्यात ठिकाणावर !

जगदीश पटवर्धन, बोरीवली (प)

— जगदीश पटवर्धन

Author