गिनी
Category:
शहरे आणि गावेगिनी हा पश्चिम आफ्रिकेतील एक देश आहे. इ.स. १८९४ ते १९५८ दरम्यान गिनी ही एक फ्रेंच वसाहत होती व फ्रेंच गिनी ह्या नावाने ओळखली जात असे. गिनीच्या पश्चिमेस अटलांटिक महासागर तर इतर दिशांना गिनी-बिसाउ, सेनेगाल, माली, सियेरा लिओन, लायबेरिया व आयव्हरी कोस्ट हे देश आहेत. कोनाक्री ही गिनीची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. आफ्रिकेतील गिनी हा शब्द वापरणाऱ्या गिनी-बिसाउ व इक्वेटोरियल गिनी ह्या देशांपासून वेगळा ओळखला जाण्यासाठी गिनीला अनेकदा गिनी-कोनाक्री असे संबोधले जाते.