No Picture
लेखसंग्रह

लक्षवेधी सूचना…

Category:

 

कुठल्याही कार्यालयात मग ते सरकारी असो की खाजगी असो कामाच्या वेळात काम हे केलेच पाहिजे म्हणजे ज्याचा आपण काम करून मोबदला घेतो तो चोख आणि प्रामाणिकपणे करणे आपले कर्तव्य आहे. पण काही वेळा स्मार्टफोनमुळे कामात टंगळमंगळ केली जाते मोबाईल वरील मेसेज वाचण्यात आणि ते पुढे पाठविण्यात आणि च्याटींग करण्यात बराचसा वेळ फुकट जातो पण हे कर्मचार्यांच्या लक्षात येत नाही आणि जबाबदार वरिष्ठ अधिकार्यांना नाईलाजाने लक्षवेधी सुचनेसारखे नियम आस्थापनांत लागू करावे लागतात हा नियम कर्मचार्यांसकट जनतेसाठीही लागू होतो आणि मग दोघांचीही मने शासन, अस्थापन आणि अधिकार्यांप्रती दुषित होतात.

No Picture
लेखसंग्रह

मुंबई शहरातील वाहतूक कोंडी

Category:

 

आज प्रमुख शहरांमधील रोज वाढणारी दुचाकी आणि चारचाकी वाहनांची संख्या आणि पर्यायी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था लक्षात घेता ती तोकडी पडते की काय असे चित्र बघावयास मिळते किंवा शहरातील नागरिकांस सर्व दृष्टीने सोयीची नाही असे स्पष्ट होते. तरी बरं मुंबईतील बहुसंख्य नागरिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा उपयोग करून घेतात, नाही तर…! आजच्या घडीला शहरात वाहनांची एवढी कोंडी होते की एखाद्या ठराविक स्थानापर्यंत पोहचण्यास विलंब होतो.

No Picture
लेखसंग्रह

कबुतरखान्यांच्या निमित्ताने…

Category:

 

मुंबई आणि आसपासच्या परिसरात आढळणाऱ्या कबुतरांची गणना बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी करणार आहे. पहिल्या टप्प्यात कबुतरांची संख्या मोजली जाईल. दुसऱ्या टप्प्यात कबुतरखाने, कबुतरांचे राहणीमान, त्याचे लोकांवरील परिणाम आणि तिसऱ्या टप्प्यात विविध डॉक्टरांशी चर्चा करून, कबुतरांचे आरोग्य आणि कबुतरांचे नागरिकांच्या आरोग्यावर होणारे परिणाम या विषयी माहिती मिळविली जाईल. मुंबईत कबुतरांसाठी दाण्यांची, राहण्याची आणि सुरक्षेची सोय सहज होते. अशा अनेक कारणांमुळे मुंबईत कबुतरांची संख्या येत्या काळात अधिक वाढणार आहे, असे बीएनएचएसचे म्हणणे आहे.

No Picture
लेखसंग्रह

एल निनो आणि त्याचे परिणाम !

Category:

 

दरवर्षी जून महिन्याच्या सुरवातीला देशात पावसाच्या आगमनाला सुरुवात होत असते. वेधशाळेच्या अंदाजानुसार त्याआधी सगळ्या प्रिंट मिडिया आणि वृत्तवाहिन्यांतून पावसाच्या आगमनाचे अंदाज वर्तवण्यात येत असतात. पण असे लक्षात येऊ लागले की अंदाज कुठेतरी चुकत आहेत! या सगळ्याला कुठलेतरी वातावरणातील बदल जबाबदार आहेत किंवा दैनंदिन जीवनात आपल्या हातून घडण्याऱ्या चुकीच्या कृतींचे पडसाद असतील. उदा. झाडे तोडणे त्या जागी नवीन झाडे न लागणे, त्यांचे संवर्धन न करणे, कारखान्यांतून आणि इतर गोष्टींतून वातावरणात प्रदुषित आणि विषारी वायूचे उत्सर्जन प्रमाणाच्या बाहेर होणे इत्यादी. काही प्रमाणत एल निनोचाही यात सहभाग असतो.

No Picture
लेखसंग्रह

बेस्ट बिफोर…..!

Category:

 

२४ डिसेंबर १९८६ रोजी राष्ट्रपतींनी “ग्राहक संरक्षण कायदा – १९८६” वर स्वाक्षरी केली. या निमित्ताने आपण दरवर्षी २४ डिसेंबर हा दिवस भारतात राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा करतो. पण एक जागरूक ग्राहक म्हणून आपण त्याचा किती उपयोग करतो?