No Picture
साहित्य - ललित

ज्युबिली वास्तु

Category:

 

बैजु बावरा’ चित्रपटाचा कधी उल्लेख झाला की, त्यातील शांत व निर्विकार चेहऱ्याचा नायक, भारत भूषण सर्वांना आठवतोच… या नशीबवान भारत भूषणला, मधुबाला व मीना कुमारी सारख्या सुंदर नायिका मिळाल्या.. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी वांद्रे येथील कार्टर रोडवरील समुद्रकिनारी एक बंगला खरेदी केला. पुढे हाच बंगला राजेंद्र कुमार यांनी भारत भूषण यांचेकडून अवघ्या साठ हजार रुपयांत खरेदी केला व त्याला नाव दिले, ‘डिंपल’!!

No Picture
साहित्य - ललित

वारसा…

Category:

 

आरतीचं ताम्हन धरायला जड जाईल असा विचार करणाऱ्या बाबांना आज चार आरत्या पूर्ण होईपर्यंत सलग उभं राहणं देखील जड जाऊ लागलंय. त्यांचा तो जोर वाढत्या वयामुळे कधी ओसरला ते कळलंच नाही.

No Picture
साहित्य - ललित

रेशमी’ गोणपाट…

Category:

 

तिच्या डोळ्यासमोर लहानपणापासूनची क्षणचित्रे एकापाठोपाठ एक येऊ लागतात. आंध्रमधील एका गरीब कुटुंबात तिचा जन्म झाला. रामल्लू व सरसम्माच्या पोटी नको असताना जन्माला आलेलं हे अपत्य. घरच्या गरीबीनं तिला चौथीच्या पुढे शिक्षण घेऊ दिलं नाही. शाळा सुटली. ती आईला घरकामात मदत करु लागली.

No Picture
साहित्य - ललित

चिरयौवना..

Category:

 

समोरचा माणूस गप्प असताना त्याच्याबद्दल काहीच कळत नाही, तो बोलू लागला की, ‘कळू’ लागतो ते त्याच्या बोलण्यातून. सवयीनुसार प्रत्येकाचे बोलणे बदलत जाते. काहींना शिवीचा वापर केल्याशिवाय बोलताच येत नाही. त्याउलट संस्कारी माणूस कितीही चिडला तरी अपशब्द बोलूच शकत नाही, त्याऐवजी तो गप्प राहणेच पसंत करतो.

No Picture
साहित्य - ललित

अनमोल ‘रतन’

Category:

 

पूर्वी घरटी दिसणारी, कुठेही पटकन जाण्यासाठी उपयोगी पडणारी, दुरुस्तीचा वारंवार खर्च न काढणारी सायकल कुटुंबाची एक भागीदार असायची. रविवारी प्रत्येकजण तिला धुवून साफसफाई करायचा. दसऱ्याला तिला फुलांची माळ लावली जायची. सायकल चालवताना कोणी समोर आलं की, हॅण्डलवरची घंटी वाजवताना आनंद व्हायचा. जुन्या फिलीप्स, अॅटलास, हिरो कंपनीच्या सायकली आता इतिहासजमा झालेल्या आहेत.

No Picture
साहित्य - ललित

दलाल पर्व’

Category:

 

गोव्यामधील मडगाव हे छोटंसं निसर्गसुंदर गाव. गावातील एकमेव शाळेतील पाचवीचा वर्ग. वर्गावरचे मास्तर रजेवर असल्याने मुख्याध्यापक वर्गात आले. त्यांनी मुलांच्या मनोरंजनासाठी गोष्ट सांगण्यास सुरुवात केली. पहिल्या बाकावरील एक मुलगा गोष्ट ऐकता ऐकता मुख्याध्यापकांचे पेन्सिलीने वहीमध्ये चित्र रेखाटत होता.

No Picture
साहित्य - ललित

चल चला चल…

Category:

 

चाळीशीनंतर पायांची काळजी घेणे आवश्यक आहे. कारण पायाचे स्नायू भक्कम असतील तर ते दीर्घायुष्याचं लक्षण आहे. जर दोनच आठवडे तुम्ही पायांची हालचाल नाही केली तर तुमच्या पायांची मजबूती दहा वर्षांनी कमी होते.

No Picture
साहित्य - ललित

आठवणीतले अण्णा..

Category:

 

जेव्हा नाटक चित्रपटांची डिझाईन करु लागलो तेव्हा अण्णांचे फोटो काढून डिझाईन करण्याची संधी मिळाली. भक्ती बर्वेच्या ‘डबल गेम’ नाटकाची डिझाईन करीत होतो. तेव्हा सर्व कलाकारांचे फोटो काढून अनेक डिझाईन्स केली. तेव्हा अण्णांशी खूप जवळून संपर्क आला. नाटक तुफान गाजले. दरवेळी मी नाटक पहात होतो, अण्णांच्या संवादफेकीत मला कधी सुईचाही फरक जाणवला नाही, त्यांचं टायमिंग आणि बेअरिंग हे प्रत्येकवेळी अचूकच असायचं.

No Picture
साहित्य - ललित

लेट व्हॅलेंटाईन

Category:

 

बाबा, दरवर्षी आम्हाला या दिवशी वेगळं काहीतरी करावंच लागतं. पत्नीवर आपलं ‘प्रेम’ आहे, हे पुन्हा पुन्हा सिद्ध करावं लागतं. व्यक्त व्हावं लागतं. तुम्हाला हे नाही कळणार, कारण तुम्हाला खात्री होती की, आई तुम्हाला सोडून कधीही कुठे जाणार नाही. कधीतरी ती थकलेली दिसली की, तुम्ही कोपऱ्यावर जाऊन चटकदार ओली भेळ सर्वांसाठी घेऊन यायचा. तेवढ्यानेच ती खुश होऊन जायची. तुम्ही कधी तिला ‘आय लव्ह यू’ म्हटलं होतं का? की तुमच्या भावना न बोलताच तिच्यापर्यंत पोहचत होत्या?