मी गांधारी
Category:
साहित्य - ललितआज पुन्हा चिडचिड झाली. मोबाईल जागेवर नव्हता. कारण शुल्लक होते. कळत होते. पण वळत नव्हते. हे हल्ली नेहमीचच झालय. बुद्धीने विचार करण्याच्या वेळी, भावनेच्या आहारी जातो. मग मूड जातो, मग डिप्रेशन येते, मग स्वतः ला दोष, पुन्हा चिडचिड!
या वर मी एक उपाय शोधलाय. उपयुक्त आहे. असा मूड ऑफ झाला कि, मी माझे सारे पेंटिंगज् जमिनीवर पसरून ठेवतो अन मध्यभागी फतकल मारून बसतो! एक एक चित्र त्याची जन्म कथा ऐकवते. हे समोरच निष्पर्ण वृक्षाचे चित्र पाहून, जे. डी. म्हणाला होता, ‘तू हे अशी बोडखी झाड का काढतोस ?’ हल्ली जे. डीचा संपर्क कमी झालाय. फोन केला पहिजे. समोरचे खडकाचे चित्र, माझे सध्याचे फेवरेट, जमता जमेना, खूप कागद,वेळ ,रंग, मेहनत वाया गेली. हवा तो दगडाचा पोत साधत नव्हता. रागा, रागा कागदाचा वेडा -वाकडा बोळा केला, बशीतल्या काळ्या शाईत बुचकळला,अन drawing पेपरवर करकचून दाबला, सुकल्यावर फाईन tuning केल, शेजारी एक वाळक झाड काढल. मस्त इफेक्ट साधला.!