No Picture
साहित्य - ललित

मंचकमहात्म्य – बारक्या

Category:

 

सकाळच्या रामप्रहरी अंड्याच्या दोन पोळ्या , दोन शिळ्या भाकरी ,बचकभर जवसाची चटणी, त्यावर कच्चं तेल आणि चार पातीचे कांदे, असा ‘अल्प ‘ नाश्त्याचा मुडदा पाडून ,मंचकराव पोकळ मुठीने आपल्या भरघोस मिश्या गोंजारत चौपस बंगईवर मंद झोके घेत बसले होते . अंगणात कोवळ्या उन्हाचे कवडसे बिचकत बिचकत डोकावत होते . मधेच पायाचा हलक्यासा रेटा देऊन मंचकराव झोपाळ्याची गती कायम ठेवीत . अश्या रम्य वातावरणात आणि भरल्या पोटी डोळे जडावणे साहजिकच होते.

No Picture
साहित्य - ललित

टॅक्सी !

Category:

 

शंकर मुडकेचा बेचव चहा आणि तिखटजाळ सामोसा खाल्ल्याशिवाय आमच्या ऑफिसात कोणीच कामाला सुरवात करत नाही . तसा तो खाऊन आम्ही रोजच्या प्रमाणे आजही सुरवात केली . पण आज काहीसा वेगळाच दिवस होता .

No Picture
साहित्य - ललित

गोष्ट वाईट मुलाची आणि गोष्टीतला वाईट मुलगा

Category:

 

तो एक वाईट मुलगा होता . ‘आदर्श कथा ‘ मधल्या वाईट मुलाच्या गोष्टीतल्या सारखाच . गोष्टीतल्या मुलाचे नाव राम असते ,पण याचे नाव शाम होते . गोष्टीतल्या गोष्टी सारखी याची परिस्थिती कधीच नव्हती . म्हणजे गोष्टीतल्या रामाची आई , म्हातारी , थकलेली , अंथरुणाला खिळलेली . ‘ आता माझ मरण जवळ आलंय ! माझ्या माघारी तुझं कस होणार ?तुला कोण पहाणार ? तुझे लाड कोण करणार ? तू शाळेतून आल्यावर तुला -गाजर का हलवा -कोण करून देणार ? तुला झोपताना अंगाई कोण म्हणणार ? ‘असं म्हणून घळाघळा रडणारी असते . ( तशी ती लवकर मरत नाही म्हणा ! )

No Picture
साहित्य - ललित

शॉक

Category:

 

साला वैताग आहे ! आज पुन्हा निर्मलेने कडकड केली ! आमच्या लग्नाला आता या चोवीस मेला पाच वर्ष होतील .अजून तिच्या स्वभावात काही फरक पडत नाही . तशी ती भांडकुदळ नाही , पण भडक माथ्याची मात्र आहे . कधी कधी फारच लावून धरते , लहान मुलांसारखं . हल्ली तिला भडकायला कसलंही कारण चालत , इतकंच काय ती विनाकारण पण भडकते !पण मला त्याचे खरे कारण माहित आहे ! माझी आई ! आई माझ्या सोबत रहाते , ते तिला नको आहे ! आता मला सांगा , या उतार वयात तिने कोठे जावे आणि का ? डोळे ,कान आदू झालेत , चकरा येतात , बी. पी. ,डायबिटीज सारखे जन्माचे सोबती आहेत ! येथे शहरात डॉक्टर दवाखाना हाकेच्या अंतरावर आहेत . मी निर्मलला परोपरीने सांगून पहिले . पण समजून घेत नाही .

No Picture
साहित्य - ललित

सावज

Category:

 

सन सेट ‘पाहण्यासाठी साक्षी रिसोर्ट मधून निघाली तेव्हा संध्याकाळचे पाच वाजले होते . रिसॉर्ट पासून समुद्र किनारा फक्त दोन किलोमीटर होता . संध्याकाळच्या थंड वातावरणात बहुतेक पर्यटक पायीच समुद्रा पर्यंत जात . रिसॉर्ट समोरचा छोटासा रस्ता थेट समुद्राला जाऊन भिडत होता . मध्ये खूप झाडी होती पण रात्री सात -आठ पर्यंत माणसांची वर्दळ चालू असे . पाचव्या मजल्यावरून साक्षी ग्राउंड फ्लोअरला अली तेव्हा तिच्या लक्षात आले कि मोबाईल रूम मधेच विसरलाय . ती परत लिफ्ट कडे गेली तर लिफ्ट बंद होती . लाईट गुल झाले होते ! . आता पुन्हा पाच मजले चढायचे आणि उतरायचे तिच्या जीवावर आले .’ तासा दीड तासांचा तर प्रश्न होता . साडे सहाला जरी परत निघालोतरी सात सव्वासात पर्यंत रिसॉर्टला परतु . मग निवांत ग्यालरीत बसून कोल्डकॉफी एन्जॉय करू . इथली कॉफी मात्र भन्नाट असते !’ असा काहीसा विचार करत साक्षी झाडीच्या रस्त्याला लागली .

No Picture
साहित्य - ललित

तबला आणि मी

Category:

 

तबला हे खरेच एक तालेवार प्रकरण असते . हे महाराज कधी खाली भुईवर बसत नाहीत . याना स्वतंत्र बैठक लागते ! तबल्याला आणि डग्ग्याला वेगवेगळी ! गिटारी सारखे हे गळ्यात पडत नाहीत कि लाडे – लाडे त्या गिटारी सारखे खांद्यावर चढत नाहीत , कि ‘माऊथ ऑर्गन ‘सारखा मुका घेत नाहीत ! तबला म्हणजे एकदम खानदानी काम हो !

No Picture
साहित्य - ललित

मंचकमहात्म्य – शेजार-प्रेम

Category:

 

मागील अध्यायात आपण मंचकरावच्या लग्नाचा कथा भाग पहिला होता . आता पुढे काय होते ते पाहू .

No Picture
साहित्य - ललित

मद्यानंद

Category:

 

साडेतीन मोहर्तातला पहिला गटारी अमावस्या , दुसरा शिमगा , तिसरा एकतीस डिसेम्बर आणि अर्धा एक जानेवारी . या मोहर्तावर थोडी का होईना घ्यावी असे ‘पिता मह दत्तू मामा ‘ यांची आज्ञा आहे . तसेच या प्रसंगी एखाद्यास तरी त्याची ‘दीक्षा ‘ जरूर देऊन हा ‘सम्प्रदाय ‘ वाढवण्यास साहाय्य भूत ठरावे , असेहि त्यांनी प्रतिपादन केले आहे . ‘दीक्षांताचा ‘ विधी पण त्यांनी आपल्या ‘मद्यानंद ‘ ग्रंथात लिहून ठेवला आहे . तो येणे प्रमाणे .

No Picture
साहित्य - ललित

मंचकमहात्म्य

Category:

 

मंचकरावांनी डाव्या हाताची पालथी मूठ आपल्या भरघोस मिशांवरून फिरवली . अशी मूठ फिरवली के ते विचारमग्न आहेत असे समजावे . ‘हे मंचकराव ‘कोण ? असा प्रश्न विचारणारा आमच्यागावात नवा असावा किंवा मंचकराव जेथे आहेत ते गावतरी नवीन असावे ! त्यांची आई ते जन्मल्यापासून त्यांना ‘मंचकराव ‘च म्हणत असे , म्हणून ते लहान पणापासूनच ‘राव ‘ झाले . तेव्हात्यांच्या ‘राव ‘ असण्यास ज्ञानाचा , अनुभवाचा , वा वयाचा काही एक संबंध नाही !

No Picture
साहित्य - ललित

फास

Category:

 

श्री शांतपणे सोफ्यावर कॉफीचा मग घेऊन बसला होता . ‘मानसी इंडस्ट्री’चा मालक श्रीकांत, हजारो नसली तरी शेकडो कोटीची उलाढाल असलेली स्टील इंडस्ट्री . वय फक्त सत्तावीस ! स्वप्नांच्या मागे धावणारा एक वेडा , अशी त्याच्या मित्रात त्याची ओळख होती .