C-सागर जोशी
लाईफ लाईन
Category:
साहित्य - ललितएकतीस डिसेंबर ची रात्र, नवी दिल्ली मधल्या ग्रीन पार्क भागातील त्या क्लब मध्ये तरुणाईचा उत्साह आणि धुंद शिगेला पोहोचली होती, संगीताच्या तालावर आणि मदिरेच्या डोलावर थिरकणारी पावलं नववर्षाच्या स्वागताला प्रचंड उत्सुक होती, घड्याळाच्या काट्यांनी बारा ची वेळ दाखवताच हा उत्साह आणि जल्लोष आता परमोच्च बिंदू वर पोहोचला … अजून एक तासभर असाच जल्लोष झाल्यावर कुलदीप ने बाकी चौघांना हातातील घड्याळ दाखवत ” चला! आता निघण्याची वेळ झाली ” असा इशारा केला आणि मोठ्या निरेच्छेने तोंड वेडीवाकडी करीत बाकी चौघे म्हणजेच संदीप, कुणाल, रणजित आणि बंटी त्या क्लब मधून बाहेर पडले,
मृगजळ
Category:
साहित्य - ललितएका अर्थाने ते खरं ही होतं म्हणा, कारण रोज सकाळी सहा वाजता तिचा दिवस सुरू व्हायचा तोच मुळी दोन्ही मुलांच्या म्हणजे श्रुती आणि शिरीष यांच्या अनुक्रमे कॉलेज आणि शाळेच्या डब्या च्या तयारी ने, राकेश एम आय डी सी मध्ये एका ऑटोमोबाईल कंपनीत होता त्यामुळे त्याला वेग वेगळ्या शिफ्टस प्रमाणे जावं लागायचं, तेव्हा त्याचा डबा वेगळा, आर्थिक परिस्थिती यथा तथा च असल्याने सर्व घर काम तिच्यावरच होती, त्यामुळे रात्री अंथरुणाला पाठ टेके पर्यंत तिचा कामाचा सपाटा सुरूच असायचा .
टॅक्सी नंबर
Category:
साहित्य - ललितसमर चे वडील म्हणजेच किशोरीलाल पाठक हे शिस्तीचे दुसरं नाव होतं. भरतपूर मधल्या सरिता आश्रम आणि त्या आश्रमाच्या शाळे साठी त्यांनी आपलं उभ आयुष्य वेचलं होतं. शाळेत गणित आणि शास्त्र हे विषय शिकवताना त्यांनी केवळ अभ्यास एके अभ्यास आणि शिस्त हेच दोन मार्ग अवलंबले होते.. अर्थात शाळेच्या ह्या शिस्ती मध्ये घरात देखील एकुलत्या एक समर साठी कसली ही सवलत नसायची , जो अभ्यास आणि शिकवण शाळेतील इतर मुलांसाठी होती तीच समर साठी असायची .
भाऊबीज
Category:
साहित्य - ललितडोळ्यासमोर घड्याळातील काटे ‘आठ पंचवीस ‘ची वेळ दाखवत होते आणि डोक्यामध्ये ” आता ही नोकरी जर नाही मिळाली तर परत घरात पाऊल टाकू नकोस, तिकडेच तोंड काळं कर ” हे आप्पांचे शब्द घुमत होते, अश्या परिस्थितीत साडे आठची मुंबई ला जाणारी उद्यान एक्स्प्रेस पकडण्यासाठी जीवाच्या आकांताने संजीव प्लॅटफॉर्म क्रमांक दोन कडे पळत सुटला होता… तेव्हढ्यात ट्रेन चा भोंगा वाजला अन ट्रेन हलली, हातातली बॅग सांभाळत त्याने समोर दिसलेल्या दरवाज्यातून अक्षरशः स्वतःला आत झोकून दिलं.
होळी
Category:
साहित्य - ललितघड्याळात साडे आठ वाजलेले पाहून जयश्री ताईंनी दोन्ही मुलांना झोपेतून उठवायला सुरुवात केली ” मनिष…..अरे बाळा उठा आता, बघ जरा घड्याळात .. साडे आठ झाले …मृण्मयी ..चला उठा …आज होळी साठी जायचंय ना तुम्हाला तयारी करायला? चौकात सगळी मुलं आली बरं का ! ” शेवटच्या वाक्याची मात्रा मात्र लगेच लागू पडली आणि दोघं ही ताडकन उठून बसली …
मेरिट
Category:
साहित्य - ललितपण गीता ला मात्र अश्या प्रसंगांची अगदी लहानपणा पासूनच सवय होती , नीता आणि गीता या सुलभा ताई आणि श्रीधर राव यांच्या संसार वेलीवर दोन वर्षांच्या अंतराने उमललेल्या कळ्या..पण आत्ता पर्यंतच्या आयुष्यात नियतीचे फासे मात्र दोघींसाठी काही एकसारखे पडले नव्हते , नीता मोठी म्हणून लाडाची या न्यायाने प्रत्येक गोष्ट तिला न मागता विनासायास … मिळत गेली , नवीन सायकल असो वा कपडे किंवा वह्या पुस्तकं नीताला सगळं नवीन मिळायच , आणि ” चांगलेच तर आहेत की , कुठं खराब झालेत ? ” अश्या पालुपदांनी मात्र नीताचे वापरून झालेले कपडे व पुस्तकं गीताच्या वाट्याला यायची , आणि ती ही सगळं हसतमुखाने , विना तक्रार स्वीकारायची .
गेट टुगेदर
Category:
साहित्य - ललितवॉट्सअप मेसेज च नोटिफिकेशन वाजलं आणि रोहन ने झटकन मोबाईल उचलून मेसेज चेक केला. पण त्याला अपेक्षित असलेले मेसेज नव्हते … फोन बाजूला ठेवून त्याने पुन्हा लॅपटॉप मध्ये लक्ष केंद्रित केलं, थोड्या वेळानं पुन्हा एकदा मेसेज ची टोन वाजली आणि ते मेसेज पाहताना नकळत त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटलं .
विश लिस्ट
Category:
साहित्य - ललितमध्ये मध्ये बाकीच्या नर्स, वॉर्ड बॉय यांना सूचना देत होत्या, पेशंटस् ची विचारपूस करीत होत्या …! आणि मग चार वाजल्या पासूनच ..त्या खास वॉर्ड मध्ये सजावट सुरू झाली, फुगे …रिबिनी लावण्यात आल्या काही उत्साही मंडळींनी बर्थ डे पार्टीच्या त्रिकोणी टोप्या आणल्या होत्या … कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराशी निकराची लढाई करणाऱ्या या सगळ्या वीरांच्या… नेहमी सुतकी आणि गंभीर वातावरण असलेल्या या ” कॅन्सर वॉर्ड” मध्ये आज वेगळंच चैतन्य निर्माण झालं होतं, एक निराळा उत्साह जाणवत होता ..आणि त्याचं कारण ही सर्वांना ठाऊक होतं. वयाने सर्वात ज्येष्ठ, पण मनाने चिरतरुण असलेल्या सदा हसतमुख.. अंजली ने ‘ लाफिंग बुद्ध ‘ असं नाव पाडलेल्या ” मनोहर काकांचा ” वाढदिवस !! पाच वाजता तर तिथला उत्साह, ते चैतन्य अगदी शिगेला पोहोचलं होतं..
बोनस
Category:
साहित्य - ललितमधल्या सुटीची घंटा वाजली तसं चौघे म्हणजे रोहन, मनोज, अजित आणि दीपक म्हणजेच दिपू… वर्गातून पळत सुटले ते सायकल स्टँड कडे …. त्या पैकी रोहन ला दोन दिवसा पूर्वीच त्याच्या वाढदिवसाची भेट म्हणून नवीन सायकल मिळाली होती…आणि ती सायकल पाहण्यासाठी हे बाकीचे तिघे उत्सुक होते… आणि खरोखरच भानामती झाल्या प्रमाणे हे तिघे रोहनची नवीन सायकल पहात होते.. एटलास कंपनीची ….लाल चुटुक रंगाची सायकल, ” च्यायला काय भारी आहे रे सायकल? ” …. ” कितीला पडली? ” …आणि ” हे वायरचे ब्रेक आहेत का? ? ” अश्या उद्गारांसहित तिघे सायकल न्याहाळू लागले. ..सायकल ही फक्त काळया रंगाचीच असते … लोखंडी …अवजड !! अशी समजूत असल्याने .. ही नवीन सायकल म्हणजे या तीघां च्या दृष्टीने ” अद्भुत ” होती ..आणि सायकलचं कौतुक ऐकुन रोहन च्या अंगावर मात्र मुठभर मास चढत होतं… ” साडे सातशे ची आहे सायकल, नवीनच मॉडेल आलंय हे …” रोहन ने छाती बाहेर काढत उत्तर दिलं..
