लग्नाची बेडी – Part 1
Category:
साहित्य - ललित“कसले? अरे लग्नाचे आणि कसले? तू तिकडे लांब एकटा, परदेशात, आता शिक्षणही पुरे झाले, चांगला जॉब आहे, घर आहे. चांगला सेटल झाला आहेस मग आता लग्नाचे कधी मनावर घेणार आहेस? अरे सगळ्या गोष्टी कशा वेळच्या वेळी झाल्या म्हणजे बरं. आम्हाला इकडे खूप काळजी वाटते, बरं. चटकन येता पण येत नाही. आता एकाला दुसरा जोडीदार हवाच, शिवाय परका मुलूख म्हणून म्हणते. आपलं माणूस हवं.खाण्यापिण्याचेही खूप हाल होत असतील.”