कल्हईवाला – जुनी आठवण
Category:
साहित्य - ललितस्टीलच्या, हिंडालियमच्या भांड्यांची चलती असली तरी या जमान्यात पितळी भांडीसुद्धा वापरली जातात. साहजिकच कल्हई करणे आले. दारी येणारा कल्हईवाला तात्काळ सेवा देणारा असतो.
Category:
साहित्य - ललितस्टीलच्या, हिंडालियमच्या भांड्यांची चलती असली तरी या जमान्यात पितळी भांडीसुद्धा वापरली जातात. साहजिकच कल्हई करणे आले. दारी येणारा कल्हईवाला तात्काळ सेवा देणारा असतो.
Category:
लेखसंग्रहभारतात गाजणारा एक विषय आहे तो म्हणजे नामांतराचा, जे नाव सध्या आहे ते बदलण्याच्या मागणीचा. हे नाव कशाचेही असू शकते. रस्ता, चौक, बाग, शहर, जिल्हा, राज्य यांचे वा बस स्टँड, रेल्वे स्टेशन, विमानतळ यांचे वा विद्यापीठ, आस्थापना यांचे. स्वतःचे नाव बदलणारांची दखल बाकीच्यांनी घ्यायची गरज नसते. पण या सार्वजनिक ठिकाणांची नावे बदलण्यासाठी जनमताचा कौल घ्यावा लागतो. नाव बदलण्याचा आग्रह धरणारे ‘नावात काय नाही’ ची वाट धरणारे असतात.
Category:
लेखसंग्रह‘ही शर्यत रे अपुली’, ससा आणि कासवाच्या शर्यतीवरील गीतातली ही ओळ आहे. शिक्षण, व्यवसाय, क्रीडा वगैरे क्षेत्रात स्पर्धा, शर्यत असते. लढाया जिंकत जिंकत अंतिमतः युद्धात बाजी मारणे हे युद्धाचे उद्दिष्ट असते. शर्यतीत प्रतिस्पर्ध्यावर मात करावी लागते. हिटलरला युरोप जिंकून साम्राज्य वाढवायचे होते. हिटलरचे प्रतिस्पर्धीं त्याला थोपवायचा प्रयत्न करीत होते. या मित्र पक्षांचा गट बनला होता. युद्धात न उतरलेला एक देश मित्रपक्षांचा सोबती होता.
जर्मनीत 1920 मधे नाझी पक्षाचा उदय होत होता. आर्य हे श्रेष्ठ आहेत, त्यांचेच वर्चस्व असायला हवे, अशी हिटलरची समजूत होती. ज्यूंचा नाश करण्याच्या नाझी पक्षाच्या निर्धारामुळे, जर्मनीतूनच काय इतर युरोपीय देशातूनही ज्यू परागंदा होऊ लागले. नामवंत ज्यू शास्त्रज्ञ, कलावंत, व्यावसायिक यांना असुरक्षित वाटू लागले. अमेरिका, पॅलेस्टाईन, ग्रेट ब्रिटन, मध्य व दक्षिण अमेरिका या देशात ते आश्रयास जाऊ लागले. हिटलर सत्तेत येताच राज्यातील सर्व आस्थापनांमधून ज्यूंची हकालपट्टी केली गेली. हिटलरने 1938 पर्यंत जर्मनीवरच लक्ष केंद्रित केलं होतं. दुसरे महायुद्ध 1939 मधे सुरू होण्यापूर्वी अनेक शास्त्रज्ञ अमेरिकेत पोचले होते. वर्नर हायसेनबर्ग सारखे काही शास्त्रज्ञ देशप्रेमापोटी जर्मनीत राहिले.
Copyright © 2025 | Marathisrushti