सत्संगाने चोर सुधारले
Category:
साहित्य - ललितप्राचीन काळातील गोष्ट. विंध्यच्या एका गावात चार चोर राहात होते. त्या गावाबाहेरच्या जंगलात एक साधू राहात होता. साधू गावाजवळच्या शिवालयात पूजा करायला जात असे व तेथील प्रसादावर आपली उपजीविका करीत असे. चोर साधुकडे जात असत आणि आपल्या कुकर्माबद्दल पश्चात्ताप व्यक्त करून गरिबीमुळेच आपण चोरी करतो असे साधूला सांगत असत.
