No Picture
शहरे आणि गावे - temp

नायका खाण

Category:

 

मेक्सिकोमधील नायका येथे जिप्समच्या खाणीत जिप्सच्या कांड्या असलेली गुहा आढळते. अशाप्रकारची ती जगातील एकमेव गुहा आहे.

No Picture
शहरे आणि गावे

थायलंड

Category:

 

थायलंडचे (थाई: ราชอาณาจักรไทย, राच्च आनाचक थाय, अर्थ: राज्य आज्ञाचक्र थाय) म्हणजेच सयाम हा आग्नेय आशियातील एक देश आहे. या देशाच्या पूर्वेस लाओस व कंबोडिया, दक्षिणेस थायलंडचे आखात व मलेशिया तर पश्चिमेस अंदमानचा समुद्र व ब्रह्मदेश आहेत. बँकॉक ही या देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. थायलंडमध्ये घटनात्मक राजेशाही असली तरीही प्रशासकीय कारभार संसदीय लोकशाही पद्धतीने चालतो.

No Picture
शहरे आणि गावे

लिबिया

Category:

 

लिबिया हा उत्तर आफ्रिका खंडातील भूमध्य समुद्रकिनाऱ्यावरील एक देश आहे. लिबियाच्या पूर्वेला इजिप्त, पश्चिमेला ट्युनिसिया व अल्जीरिया, दक्षिणेला चाड व नायजर तर आग्नेय दिशेला सुदान हे देश आहेत. लिबियाच्या उत्तरेला भूमध्य समुद्र आहे. त्रिपोली ही लिबियाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.

No Picture
शहरे आणि गावे

लायबेरिया

Category:

 

लायबेरिया पश्चिम आफ्रिकेतील एक देश आहे. सियेरा लिओन, कोत द’ईवोआर व गिनी हे लायबेरियाचे शेजारी देश आहेत. लायबेरियाच्या पश्चिम व दक्षिणेला अटलांटिक महासागर आहे. मोनरोव्हिया ही लायबेरियाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. हा एक अविकसीत देश असून गरिबी, रोगराई, बेरोजगारी या समस्यांने पछाडलेला आहे. सध्या इबोला या जिवघेण्या रोगाने या देशात थैमान घातले याहे.

No Picture
शहरे आणि गावे

लिथुएनिया

Category:

 

लिथुएनिया हा उत्तर युरोपामधील एक बाल्टिक देश आहे. लिथुएनिया हा भूतपूर्व सोव्हियेत संघाच्या घटक देशांपैकी एक आहे.

No Picture
शहरे आणि गावे

जपानमध्ये इमारतीच्या आतून गेलाय एक्सप्रेसवे

Category:

 

जपानमध्ये चक्क इमारतीच्या आतून गेलाय एक्सप्रेसवे. फोटोत दिसणारा रस्ता चक्क एका इमारतीतून जातोय. आता हा रस्ता आधी बनला की इमारत?

No Picture
शहरे आणि गावे

घाना

Category:

 

घाना हा पश्चिम आफ्रिकेतील एक देश आहे. घानाच्या पश्चिमेला कोट दि आईव्होर, उत्तरेला बर्किना फासो व पूर्वेला टोगो हे देश तर दक्षिणेला गिनीचे आखात आहे. आक्रा ही घानाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.

No Picture
शहरे आणि गावे

जॉर्जिया

Category:

 

जॉर्जिया हा पश्चिम आशिया व पूर्व युरोपमधील एक देश आहे. कॉकासस भौगोलिक प्रदेशामध्ये वसलेल्या जॉर्जियाच्या उत्तरेला रशिया, दक्षिणेला तुर्कस्तान आणि आर्मेनिया, पूर्वेला व आग्नेय दिशेला अझरबैजान हे देश तर पश्चिमेला काळा समुद्र आहेत. त्बिलिसी ही जॉर्जियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

No Picture
शहरे आणि गावे

गॅबन

Category:

 

गॅबनचे प्रजासत्ताक हा पश्चिम मध्य आफ्रिकेतील एक देश आहे. गॅबनच्या पूर्व व दक्षिणेला काँगोचे प्रजासत्ताक, ईशान्येला इक्वेटोरियल गिनी व उत्तरेला कामेरून हे देश, तर पश्चिमेला अटलांटिक महासागराचा गिनीचे आखात हा उपसमुद्र आहे. लिब्रेव्हिल ही गॅबनची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.