C-निलेश बामणे
ओळख…
Category:
कथा साहित्य - ललितरमेश विजयची वाट पाहात हॉटेलात एका टेबलावर बसलाय…वेटर जवळ येऊन मेनू कार्ड देतो विजय तो तसाच समोर ठेवत एक चहा आणायला सांगतो, चहा पिता – पिता रमेश समोर च्या टेबलावर बसलेल्या सुंदर तरुणीकडे पाहात असतो ती तरूणीही मधे – मधे चोरून त्याच्याकडे पाहात असते इतक्यात रमेश समोरून येताना दिसतो त्याला पाहून विजय जागेवर उटून उभा राहतो तो जवळ येताच त्याला प्रेमाने अलिंगन देतो आणि समोरच्या खुर्चीवर बसायला सांगतो.
चूक
Category:
कथा साहित्य - ललितविजय कोणत्यातरी कामात व्यस्थ होता इतक्यात त्याचा फोन खणखणला, पलिकडून त्याच्या एका ओळखीच्या गृहस्थाने जो स्वतःला त्याचा मित्र म्ह्णवून घ्यायचा पण विजयने ज्याला आपला मित्र कधीच मानला नव्हता, खंर म्ह्णजे ! विजयची जी मैत्रीची व्याख्या होती त्या व्याख्येत तो दूरपर्यंत कोठेही बसत नव्हता.
कथा माझ्या अपयशाची…
Category:
कथा साहित्य - ललितमी शाळेत असताना मला माझ्या समवयस्क मित्रांसोबत पैंजा लावून त्या जिंकण्याची वाईट सवय होती. एकदा चक्क मी माझ्या एका मित्रासोबत नववीला असताना एका मुलीला पटविण्याची पैंज लावली.
नाद
Category:
कथा साहित्य - ललितआता कळ्तय त्याच्या भोवती भिरभिरणार्याो त्या फुलपाखरांच रहस्य ! प्रतिभाला स्वतःचाच अधिका अधिक राग येत होता. पण ! आता तिचा अहंकार अभिमान थोडा- थोडा दूर होऊ लागला होता. विजयच्या वेळेची किंमत प्रतिभाला कळू लागली होती. विजयने तिच्यासाठी जो वेळ खर्च केला होता त्या वेळेत तो कित्येकांच्या वेदनेला वाचा फोडू शकत होता. त्यांच्य वेदना जगापर्यत पोहचवू शकत होता. त्यांच्या वेदनेवर औषध शोधू शकत होता. तिच्यासाठी त्याने खर्च केलेल्या वेळेची किंमत अमूल्य होती हे तिच्या लक्षात आल होत आणि आता तर तिला खरोखरच त्याचा नाद लागला होता.
मैत्रिण
Category:
कथा साहित्य - ललितपंचवीस एक वर्षापूर्वी विजय एका सरकारी शाळेत तिसर्या इयत्तेत शिकत होता. त्यावेळ्चा प्रसंग आठवून विजयला आजही स्वतःवरच ह्सू येत. त्या शाळेपासून पंदरा मिनिटाच्या अंतरावर असणार्या झोपडपट्टीत विजय त्यावेळी रहात होता. पण झोपडपट्टीत रहात असतानाही त्यावेळी विजयच्या वडिलांची आर्थिक स्थिती उत्तम होती. त्यामुळे विजय शाळेत जाताना इतर मुलांच्या तुलनेत जरा जास्तच रूबाबात जात असे त्याचा तो रूबाब आजही कमी झालेला नाही म्ह्णजे त्याने तो कधीच कमी होऊ दिला नाही. पहिली – दुसरीला तो ज्या शाळेत शिकत होता त्या शाळेच्या मुख्याध्यापिकाच त्याच्या वडिलांच्या खास परिचयाच्या होत्या आणि त्याकाळी त्या शाळेची शिस्त फारच कडक होती. पण ती शाळेत जाण्यासाठी बसने प्रवास करावा लागत असे तो टाळण्यासाठी नाईलाजाने त्याने या नवीन शाळेत प्रवेश घेतला होता. विजयला वर्गात शांत आणि शिस्तीत राहण्याची जणू सवयच जडलेली होती. पण तो कितीही शांत दिसत असला तरी स्वभावता शांत अजिबातच नव्हता. या नवीन शाळेत बहूतेक मुल खोडकर होती. त्यामुळे त्या मुलांच्या तुलनेत विजय किंचित वेगळाच होता.
हट्ट
Category:
कथा साहित्य - ललितविजयने त्याच्या लहानपणी ही कधी कोणाशी कोणत्याच गोष्टीसाठी हट्ट केला नव्ह्ता. किशोर अवस्थेतही केला नाही आणि तरूणपणी तर नाहीच नाही.
मुंबईतील बसचा प्रवास
Category:
साहित्य - ललित