No Picture
कथा

एक परीस स्पर्श… ( भाग -२८ )

Category:

 

साधू त्यांना एक जादुई घोडा, काटी आणि झोळी देतो आणि त्यांच्या कानात एक मंत्र सांगतो. हा घोडा तुम्हाला तुमच्या इच्छित स्थळी घेऊन जाईल..ही  झोळी तुम्हाला हव्या त्या वस्तू देईल…आणि ही काटी तुमच्या शत्रूंचा नाश करेल…आणि ते साधू स्वर्गात प्रयाण करतात. ते दोघे बहीण भाऊ घोड्यावर बसतात आणि मंत्र म्हणून घोड्याला आदेश देतात आमचे आईवडील ज्या राज्यात असतील तेथे आम्हाला घेऊन चल…क्षणात ते घोड्यासह आटपाट नगरात पोहचतात…तेथे पोहचल्यावर ते झोळीतून मंत्राच्या साह्याने मोहरा निर्माण करतात आणि एक वाडा विकत घेतात…आपल्या राज्यात कोणी श्रीमंत बहीण भाऊ राहायला आल्याची बातमी राजदरबारात पोहचते… दृष्ट राणीला त्यांना भेटण्याची उत्सुकता निर्माण होते…

No Picture
कथा

एक परीस स्पर्श ( भाग – २७ )

Category:

 

विजयच्या वाचण्यात एक सर्वेक्षण आले हल्ली जास्त पैसे कमावणारे जास्त आंनदी असतात.आणि विजयला त्याच्या दुःखी असण्याचे कारण उमगले.चांगुलपणा म्हणून विजय केलेल्या कामाच्या पैशाचा फार विचार करत नसे.त्यामुळेच तो आयुष्यात आर्थिक दृष्ट्या यशस्वी होऊ शकला नाही. त्याने केलेल्या प्रत्येक कामाचा जर त्याने योग्य मोबदला घेतला असता तर आज तो आनंदी असता. आज त्याला स्वतःच्या सर्व आर्थिक गरजा भागवताना नाके नऊ आले नसते.

 

No Picture
कथा

एक परीस स्पर्श ( भाग – २६ )

Category:

 

या जगात कोणतीही घटना विनाकारण घडत नाही. घडणाऱ्या प्रत्येक घटनेला एक अर्थ असतो. घडणाऱ्या प्रत्येक घटनेला भविष्यात घडणाऱ्या एकातरी घटनेचा संदर्भ असतोच.असे विजयला वाटते. इतकेच नव्हे तर विजयचा पाय दुखणे हे ही विनाकारण नसावे त्यामागेही नियतीची काहीतरी योजना नक्कीच असावी. विजय  पाय धरून जरी घरी बसला असला तरी त्याचे डोके कधीच गप्प बसत नाही त्या डोक्यात सतत काही ना काही सुरू असतेच.

No Picture
कथा

एक परीस स्पर्श ( भाग – २५ )

Category:

 

विजयला बुटाचे आकर्षण लहानपणापासून होते. विजय कमवायला लागल्यावर त्याने कधी स्लीपर फार घातली नाही.मग ती कितीही महागातली का असेना ? गोव्यावरून विजयने आणलेली स्लीपर त्याने कारखान्यात काम करताना वापरली.

No Picture
कथा

एक परीस स्पर्श (भाग – २४)

Category:

 

याबाबतीत मात्र विजय पूर्वीही बदनाम होता आणि आज ही कितीही सुंदर आणि गोड आवाज असणाऱ्या तरुणीने त्याला फोन केला तरी तो तिच्याशी अधिकचा एक शब्दही बोलत नाही.  पण एखादी समोरा – समोर भेटली आणि तिची बोलण्याची इच्छा असेल तर तो थांबतही नाही.

No Picture
कथा

एक परीस स्पर्श (भाग – २३)

Category:

 

आज विजयचा पाय प्रचंड दुखत होता. त्यात मरणाच्या थंडीमुळे अधिकच त्रास होत होता. पायात थोडी सुजही होती. शरीरातील सर्व सांध्यात थोड्या थोड्या वेदना जाणवत होत्या. कशामुळे काय दुखतंय तेच कळत नव्हतं. त्यामुळे विजय लांब पाय करून खुर्चीत बसला होता.

No Picture
कथा

एक परीस स्पर्श ( भाग – २१ )

Category:

 

आज विजय बस स्टॉपवर उभा होता. तोच त्याची नजर रस्त्याच्या कडेला नारळाच्या झावळ्यांपासून झाडू बनविणाऱ्या स्त्री पुरुष आणि लहान मुलांकडे गेले. तर एक मुलगी तीन दगडांच्या चुलीवर चहा बनवत होती. चहा बनविण्यात ती खूपच एकाग्र झाली होती. ते पाहून विजयला त्याचे बालपणीचे दिवस आठवले! त्याची आई अशीच चुलीवर चहा बनवत असे आणि विजय बटर घेऊन तिच्या बाजूला बसलेला असे.

No Picture
कथा

एक परीस स्पर्श ( भाग – २० )

Category:

 

आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेचे विजय सूक्ष्म निरीक्षण करत असल्यामुळे त्याला कळले की बऱ्याचदा त्याच्या आयुष्यात अचानक काही गोष्टी घडतात आणि त्याच्यावर येणारे संकट टळते. कारण आपल्या आयुष्यात घडणाऱ्या वाईट गोष्टींसाठी देवाला नाही तर आपल्या प्रारब्धाला गृहीत धरले. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टी विनाकारण घडत नाहीत यावर विजयचा आजही विश्वास आहे म्हणूनच तो कोणत्याही परिस्थिती स्थिर असतो.

No Picture
कथा

एक परीस स्पर्श… ( भाग – १९ )

Category:

 

दिव्या आणि विजयची भेट एका पतपेढीत झाली होती. आणि ती विजयच्या बाबांच्या ओळखीची होती. विजयच्या आयुष्यात आलेली ती सर्वात बिनधास्त मुलगी होती. म्हणजे कोणा मुलासोबत बोलताना आपल्याला कोणी पाहिलं तर वगैरेची तिला अजिबात चिंता नव्हती.