No Picture
लेखसंग्रह

आजी आजोबांचे आरोग्य – भाग ६

Category:

 

जगात एकूण लोकसंख्येपैकी फक्त १० टक्के लोक शाकाहारी आहेत. हे प्रमाण खरोखर आश्चर्यकारक आहे. भारतात सुमारे ३९% शाकाहारी आणि ८१% मांसाहारी आहेत. वार्धक्याचा विचार करता, धातूंचा क्षय अधिक असतो म्हणून त्यांना पोषक प्रथिनांची गरज तुलनेने जास्त असते.

No Picture
लेखसंग्रह

आजी आजोबांचे आरोग्य – भाग ५

Category:

 

मानसिक असंतुलन अनेक कारणांमुळे बिघडते. शारीरिक व्याधी, परावलंबित्व, आर्थिक विवंचना, अहंकार, एकटेपणा, आपल्याकडे दुर्लक्ष होत असल्याची जाणीव अशा कित्येक गोष्टींमुळे मानसिक संतुलन बिघडते. तरुण वयात परिवरासाठी आपण घेतलेले कष्ट, त्याग, मुलाबाळांच्या संगोपानासाठी साठी घेतलेले परिश्रम यांची कुणालाच जाणीव नाही अशी काहीशी मनस्थिती या वयात होते.

No Picture
लेखसंग्रह

आजी आजोबांचे आरोग्य – भाग ४

Category:

 

तोंडात अन्न घेतल्याबरोबर लगेचच लाळ येऊन पचनाची पहिली प्रक्रिया सुरू होते. वार्धक्यात कधीकधी लालाग्रंथींमधून पुरेशा प्रमाणात लाळ निर्माण होत नाही. याची अनेक कारणे असू शकतात. काही औषधांचे दुष्परिणाम, विशिष्ट आजारांचे लक्षण, केमो किंवा रेडिएशनचे दुष्परिणाम, लालाग्रंथींच्या नलिकांमध्ये खडा होणे, उलट्या होणे, तळलेले पदार्थ अधिक सेवन करणे, रक्तस्राव होणे, सिगारेट व तंबाखू सेवन करणे अशी मुख्य कारणे आहेत.

No Picture
लेखसंग्रह

आजी आजोबांचे आरोग्य – भाग २

Category:

 

मोठे शहर असो वा लहान गांव, अस्वच्छतेमुळे डास सर्वत्र आढळतात. डासांपासून संरक्षण करण्यासाठी अनेक प्रकारची उपकरणे बाजारात उपलब्ध आहेत. त्यातून निर्माण होणाऱ्या धुरामुळे किंवा विशिष्ट वायूमुळे डास मारून जातात किंवा खोलीच्या बाहेर जातात. कालांतराने अशा धुराचा/ वायूचा परिणाम आपल्या फुप्फुसांवर होतो. त्यातून पुढे खोकला, दमा, घसा दुखणे असे आजार होऊ शकतात.

No Picture
लेखसंग्रह

आजी आजोबांचे आरोग्य – भाग १

Category:

 

आयुर्वेदानुसार वयाचे तीन गट पडतात. बालवय, तारुण्य आणि वार्धक्य. बाल वयात कफ, तरुण वयात पित्त आणि वार्धक्यात वात दोषाचे प्राबल्य असते त्यामुळे उतार वयात वातरोग होण्याची शक्यता जास्त असते.

No Picture
लेखसंग्रह

अस्वच्छतेला जबाबदार कोण?

Category:

 

शासन कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी सज्ज आहे पण कचरा एकत्रितपणे ठेवण्याची जबाबदारी मात्र नक्कीच नागरिकांची आहे. सरकार कुठे पुरे पाडणार? शाळेत मुलाला स्कूटरने सोडायला जातांना वडीलच पचकन रस्त्यात थुंकतात मग मुलगाही तेच अनुकरण करणार. आपण पृथ्वीला धरणीमाता म्हणतो, मग तिच्यावर थुंकायचं धाडस तरी कसं होतं?

No Picture
लेखसंग्रह

कशासाठी – डोक्यासाठी, मेंदूच्या वाढीसाठी

Category:

 

हाडे ठिसूळ होऊ लागली की आपण लगेच कॅल्शियमच्या गोळ्या घेऊ लागतो, कारण हाडांमधील ९०% हिस्सा कॅल्शियमने बनलेला असतो. रक्तातील लोह (हिमोग्लोबिन) कमी झालेले दिसले की लगेच आयर्नच्या गोळ्या घेतो. पण मेंदूचे स्वास्थ्य उत्तम राहण्यासाठी आपण अशी काहीच काळजी घेत नाही. वास्तविक हाडे किंवा रक्तातील लोहापेक्षा कईक पटीने आपला मेंदू अधिक महत्वाचा आहे.