C-अरविंद आत्माराम खानोलकर
माझा लेखन प्रवास (आठवणींची मिसळ – भाग ६)
Category:
साहित्य - ललितअंधेरी लोकल बोर्डाच्या चौथीच्या परीक्षेत मला “हिरवळ” हा अनंत काणेकरांचा ललितलेखांचा संग्रह बक्षिस मिळाला.तो वाचल्यानंतर मला लेखनातले वेगवेगळे प्रकार कळायला लागले.ते पुस्तक माझ्या पांचवीच्या वर्गशिक्षकांनी वाचायला मागून घेतले, ते मला परत मिळालेच नाही.कांही वर्षानी मी दुसरी प्रत विकत घेतली.त्याच वर्गशिक्षकांनी मला लिहिण्याचे उत्तेजन दिले.
ज्ञानदेवाचे भिंताड (आठवणींची मिसळ – भाग ५)
Category:
साहित्य - ललितवेसाव्याला जाणाऱ्या त्या रस्त्याला तिथे दोन फाटे फुटायचे. एका फाट्यावर कांही टुमदार एक मजली बंगले होते तर दुसरा रस्ता स्मशानाकडे जायचा. त्याच्या वाटेतल्या दोन गल्ल्या अंधेरी जवळच्या छोट्या आंबोली गांवाकडे जायच्या. तिथेही थोडे बैठे बंगले होते. दोन्ही फाटे परत एक झाले आणि अर्धा किलोमीटर चाललो की डाव्या बाजूला एक जुनं पडकं बांधकाम दिसायचं. बांधकाम कसलं तो एक भग्नावस्थेतला चौथरा होता फक्त. त्या पडक्या भग्नावस्थेतील चौथऱ्यालाच आम्ही ‘ज्ञानदेवाचं भिंताड’ म्हणत असू.
बचावाचे निवेदन (संक्षिप्त रूपांतरीत कथा ३५)
Category:
कथा साहित्य - ललितशेरलॉक होम्स ह्या खाजगी गुप्त हेराच नांव ऐकलं नाही असा वाचक नसेल. तो इतका प्रसिध्द झाला की लंडनमधे बेकर स्ट्रीटवर त्याचा पुतळा उभारण्यात आला आहे. खरं तर शेरलॉक होम्स हे ॲार्थर कॉनन डायल ह्या लेखकाने निर्माण केलेलं एक पात्र आहे, जे लेखकापेक्षा प्रसिध्द झालं. आजची कथा ही ॲार्थर कॉनन डायल यांनीच सुरूवातीला लिहिलेली कथा आहे. संपूर्ण कथा हे एका आरोपीने ज्यूरीला केलेलं बचावाचं निवेदन आहे. कृपया वाचकांनी स्वत:ला ज्यूरीचा सदस्य समजून कथा वाचावी व निर्णय द्यावा.
नरेंद्र शांताराम चित्रे (आठवणींची मिसळ ४)
Category:
साहित्य - ललितनरेनची पहिली जाणवणारी गोष्ट म्हणजे त्याचा उत्साह. नरेनने ट्रेनिंगमधेही उत्साहाने रस घेतला आणि ट्रेनिंग दरम्यान होणा-या इतर कार्यक्रमांत सुध्दा. कोणताही बेत करा हा पुढे असायचा. क्लासमधे अगदी पहिल्या बाकावर नरेन बसायचा. मी मात्र अगदी शेवटच्या बाकावर बसायचो. दादा साळवी, शरद लिखिते आणि मी. तिघे तिथे बसत असूं. नरेन प्रत्येक लेक्चरमध्ये इंटरेस्ट घेत असे. तर आम्ही फक्त ट्रेनिंग सेंटरच्या फॕकल्टीला मान देत असू.
खरा तो प्रेमा ना धरी लोभ मनी (आठवणींची मिसळ ३)
Category:
साहित्य - ललितज्योतिष, पत्रिका, ग्रह ह्या सगळ्या अंधश्रध्दा आहेत असं तर्काधारे कितीही समजवून दिलं तरी माणसाच्या मनांत भविष्यात काय घडणार याचं कुतूहल असतचं. त्याचा गैरफायदा घेतला जातो.पण कांही कांहीच्या बाबतीत घडणाऱ्या गोष्टींचा विचार केला तर वाटतं की खरंच असं कांही नसेल?
चिकमावगा (ॲम्ब्रोज बिअर्स याची एक कथा)
Category:
कथा साहित्य - ललिततरूण असतांना त्याचा बाप सैनिक म्हणून पाशवी जमातींशी लढला होता व त्याने देशाचा झेंडा दूरवर फडकवला होता. मळ्यावरच्या शांत जीवनांतही त्याच्यातल्या सैनिकाची धग जिवंत होती कारण एकदा पेटलेला तो अंगार कधीच विझत नाही. त्याला युध्दाची चित्रे असलेली पुस्तक आवडत आणि ती पाहून मुलालाही इतकी समज आली होती की त्याने लाकडी फळीची तलवार केली होती; अर्थात वडिलांना कदाचित ती तलवार वाटली नसती. आता तो मुलगा त्याच्या शूर जमातीला शोभेशा धीटाईने ती तलवार हातात धरून थांबत, हवेत फिरवत, पवित्रे घेत चालला होता. त्याला सहजतेने ह्या अदृश्य शत्रुंवर विजय मिळत होता. त्यामुळे त्याने शत्रुचा पाठलाग करत पुढे पुढेच जात रहाण्याची, सर्व सेनांनीकडून नेहमीच घडणारी, चूक केली आणि तो एका उथळ ओढ्याच्या कांठावर येऊन पोहोचला; त्याच्या कल्पित शत्रुने तो ओढा सहज वाऱ्याच्या गतीने पार केला होता. समुद्र पार करणाऱ्या त्याच्या जमातीची विजिगीषु वृती त्याच्याही लहानशा हृदयात धडधडत होती. त्याने त्यात मोठे दगड वगैरे शोधून काढून त्यांच्या आधाराने धडपडत तो ओढा ओलांडला व परत शत्रुचा पाठलाग सुरू केला.
बाबल्याची गोष्ट – भाग २ (आठवणींची मिसळ २)
Category:
साहित्य - ललितएव्हाना मी कथा लिहायला लागलो होतो.अनेकांनी मला बाबल्यावर कथा लिही म्हणून सांगितलं.मीही त्या घटनांचा अनेक अंगानी विचार केला.पण वरील दोन प्रश्न समाधानकारक रित्या सुटल्याशिवाय बाबल्याची गोष्ट पुरी होऊ शकत नाही हे माझ्या लक्षांत आलं.मी लहानपणी ऐकलेल्या, पाहिलेल्या गोष्टींचे दुवे वेगवेगळ्या प्रकारे जुळवून पाहिले.बाबल्या आणि त्याच्या वयाच्या, म्हणजे पंधरा ते सतराच्या, मुलांना नको त्या अवस्थेत पाहिलं होतं.पौगंडावस्थेतील मुलांची लैंगिक सुखासाठी चाललेली धडपड (विकृत, कुणास ठाऊक ?) माझ्या दोन तीनदा दृष्टीस पडली होती.मी तेव्हां लहान होतो.पण त्याचा अर्थ नंतर चांगला कळून आला होता.मग बाबल्याच्या आईच्या जीव देण्याचा संबंध त्या मानसिकतेशी होता काय ?बाबल्या आणि त्याची आई यांच्या संबंधात बाबल्याच्या हातून अशी कांही लाजीरवाणी गोष्ट घडली होती काय ?थोड्या रासवट, थोराड, भोळसर बाबल्याने अनावर लैंगिक वासनेपायी एकाच खोलीत झोपणाऱ्या आईला लाजीरवाणं वाटाव असा अतिप्रसंग तर केला नसेल ना ?