No Picture
कथा

सार्वजनिक वाचनालयांतील एक पुस्तक

Category:

 

मुंबईच्या XXXX उपनगरापैकी एकात दीड महिन्याच्या कालावधीत तिघांनी आत्महत्या केली होती.
तीनही प्रकरणात ती आत्महत्या होती की खून होता, हे सांगता येत नव्हते.

No Picture
कथा

देवीच्या दागिन्यांची चोरी

Category:

 

गणपती विसर्जन झालं होतं. आतां सर्व नवरात्रीची वाट पहात होते. देवीचे पूजन अनेक ठिकाणी घट बसवून होई.
देवीची मंदिरे तर देवीचा महोत्सवच करतात. अशा वेळेला यशवंतांकडे एका देवीच्या मंदीराचे विश्वस्त (Trustee) आले होते. ते चौघे होते.

No Picture
साहित्य - ललित

संस्कृत साहित्यातील कथा – क़मांक १ – अभिज्ञानशाकुंतलम्

Category:

 

नवीन मालिकेत संस्कृत साहित्यातील काही नाटकांच्या, काव्यातील किंवा गद्यातील कथा सांगणार आहे. ह्यापूर्वी मी मृच्छकटिक नाटकाची कथा आपल्याला सादर केली होती. संस्कृत साहित्य म्हटल्यावर नेहमीच पहिले नांव कालिदासाचे येते. “पुरा कविनां गणनाप्रसंगे कनिष्ठीकाधिष्टीत कालिदास:। ततस्तत्तुल्यकवेर्भावात् अनामिका सार्थवती बभूव॥ पूर्वी श्रेष्ठ कवींची गणना करतांना करंगळीवर प्रथम कालिदासाचे नांव घेतले.

No Picture
साहित्य - ललित

ध्यानी, मनी ते स्वप्नी.

Category:

 

माणसाला स्वप्ने पडत असल्याची नोंद ५००० वर्षांची तरी आहे. आधीही पडत होतीच असतील. जंगलात रहाणाऱ्या माणसालाही स्वप्ने पडत होतीच असतील की. कारण स्वप्न माणसाला आपोआप पडतात. कांही करावचं लागत नाही. अर्थात किमान झोपावं लागतेच म्हणा. तर ह्या आपोआप पडणाऱ्या स्वप्नांना तो आदिमानव कसा सामोरा गेला असेल ? घाबरला असेल ? त्याची स्वप्ने कशी असतील ?

No Picture
कथा

तोतयाचे कांड

Category:

 

मुंबईत डावऱ्यादादा नांवाचा एक गुंड कांही वर्षांपूर्वी खूप गाजला होता. शेवटी पोलिसांनी त्याला एनकाऊंटरमध्ये मारला होता.

No Picture
साहित्य - ललित

महाराज

Category:

 

महाराज म्हटल्यानंतर मराठी माणसाच्या मनांत आठवतात, ते छत्रपती शिवाजी महाराज. त्यांच्याबद्दल लिहायला सुध्दा पात्रता लागते, ती मी मिळवलेली नाही. पण महाराज हे विशेषण इतरही कांही जणांसाठी वापरलं जात. विशिष्ट प्रकारचा मसाल्याचा चहा आणि बरोबर फाफडा बनवून विकणा-यांनाही महाराज म्हणतात. गुजरात मारवाडमधे स्वयंपाक्यांनाही महाराज म्हणतात.

No Picture
साहित्य - ललित

सैनिकाच्या मुलाची दिवाळी

Category:

 

दिवाळी जवळ आली होती. शकुंतला हॅास्पिटलमधील नित्याची कामे पटापट करत होती. संवयीने बिनचूक करत होती पण आज तिच्या मनांत मुलाची काळजी होती. मुलगा राजस आता नऊ वर्षांचा झाला होता. घरी एकटाच होता. वर्षांपूर्वी आजी गेली आणि तो खरंच एकटा पडला. आजी गेली तेव्हां बाबा येऊन लगेच परत गेले. जास्त रजा नव्हती त्यांना. आता परत कधी येतील, कुणास ठाऊक? सैनिकाचा काय भरोसा? त्याचे सुखरूप येणे हेच महत्वाचे! यंदा दिवाळीला फक्त दोघंच असणार होती घरी, ती आणि राजस. दिवाळीची कांहीच तयारी तिला करतां आली नव्हती. बऱ्याच सहकारी नर्सेस रजेवर होत्या. तिला रजा तर मिळत नव्हतीच पण अधून मधून डबल ड्यूटी करावी लागत होती. दोन दिवसांवर दिवाळी आली होती. विशेष खरेदी तर सोडाच पण निदान फराळासाठी लागणारं सामान आणि राजस साठी थोडे कपडे घ्यायला हवे होते ना! ह्यांतल कांही तिला करतां येत नव्हतं. तिला मदत करायलाही कुणी नव्हतं. राजस घरी एकटाच असायचा. शेजारी चांगले होते पण ते सतत कसे पहाणार. कितीही चांगल्या ठीकाणी राजस रहायला तयार नव्हता. तो आता पाळणाघरांत रहायला काय लहान होता काय?

No Picture
साहित्य - ललित

पेट्रोल-चोर

Category:

 

दुपारची वेळ होती. सोसायटीत थोडी सामसूमच होती. सौभाग्यवती स्वयंपाकघरात कामात होती. अमित संगणकावर कांही काम करत होता. मीही पेपर वाचत होतो. माझ्या लाडक्या संपादकाचा अग्रलेख वाचण्यात मग्न होतो. त्यांनी धनदांडग्या उद्योगपतींवर चांगलं झणझणीत लिहिलं होतं.

No Picture
साहित्य - ललित

शास्त्रीबुवा

Category:

 

झिरमिळ्यांची पगडी घालून शास्त्रीबुवा आणखीच उंच वाटत. पावणे सहा फुट उंच, साठीनंतरही प्रकृती ठणठणीत असणारे, लांब, काळ्या बटणांचा पांढरा डगला घालणारे, कपाळावर गंध लावणारे, काळा चष्मा घातलेले, शास्त्रीबुवा नेहमी धीर गंभीर वाटत.
त्यांचे खरे आडनाव काय होते, ते तिथे कोणालाच ठाऊक नव्हते. लोक त्यांना शास्त्रीबुवा म्हणूनच ओळखत. त्यांचे शिक्षण कुठे झाले होते, शास्त्री हे त्यांचे नाव होते की पदवी होती.

हे कांही कुणाला माहीत नव्हते. वाड्यांतील एका छोट्या खोलीत ते रहात पण नेहमी ते ह्याच वेशांत लोकांना दिसत. शास्त्रीबुवांच्या दरवाजावर “इथे जन्मकुंडली, हस्तरेषा, चेहरा, यांवरून भविष्य सांगितले जाईल.” घरावर अशी छोटी पाटी असली तरी मोठ्या रस्त्यावर एका छानशा दुकानांत शास्त्रीबुवांच ‘ॲाफीस’ होतं.

No Picture
साहित्य - ललित

माझा वाढदिवस

Category:

 

आज मी ७८ वर्षांचा झालो. म्हणजे ७९वे वर्ष सुरू झालं. ज्येष्ठ की वृध्द की जरठ म्हणायचं स्वतःला? पूर्वी म्हातारा पाहिला की शारदा नाटकांतल पद आठवायचं! ‘म्हातारा इतुका न अवघे पाऊणशे वयमान.’ त्यांत दिलेला सर्व विनोदी तपशील नाही तरी कांही वर्णन तर आता या वयात लागू पडतंच.