एक पाऊल ओल्या वाळूंत – भाग २
Category:
कथा साहित्य - ललितया गोष्टीचा पुढचा भाग….
“Veg or Non-veg ?” कोणीतरी विचारत होतं. त्याबरोबर सुरेशने वर्तमान पत्र बाजूला सारून पाहिंलं. एक एयर होस्टेस विचारत होती.
“veg !” त्याने उत्तर दिलं. त्या हवाई सुंदरीने शाकाहारी खाद्यपदार्थाचं पाकीट ढकलगाडीतून डाव्या हाताने काढून सुरेशच्या सीटसमोर असलेल्या मेक शिफ्ट टेबलावर ठेवलं. ढकलगाडी पुढे रेटत ती निघून गेली. कांही काळ सुरेश विचारांत पडला. त्याच्या डोक्यात लख्खकन वीज चमकली. तिने आपल्या डाव्या हाताने खाण्याचं पाकीट दिलं होतं. डावखुरी ! खाऊन झाल्यावर तो विमानाच्या मागल्या भागात गेला. ती तिथे इतर होस्टेस बरोबर कामात होती.