apd-f
व्यवस्थेचे गुलाम
Category:
कथा साहित्य - ललितकर्नल सावंत निवृत्त होणार होते. आतापर्यंत त्यांनी कधी निवृत्तीचा व विशेषत: निवृत्तीनंतर कुठे रहायचं, याचा विचारच केला नव्हता.
सीमेवर देशाची सेवा करतांना प्राण पणाला लावणाऱ्या सैनिकाला निवृत्तीचे बेत आंखायला वेळ नसतो. सीमेवर तीक्ष्ण नजरेने पहाणारा सैनिक आपल्या भविष्याकडे कधीच नजर लावून बसत नाही. कर्नल सावंत याला अपवाद नव्हते. अतुलनीय पराक्रमाबद्दल मिळालेली पदके छातीवर अभिमानाने लावायची, मान ताठ ठेवायची व देशरक्षणासाठी सज्ज रहायचे एवढेच त्यांना ठाऊक होते. त्यांच्या बदल्या झाल्या व ते कुटुंबासह एका शहरांतून दुसऱ्या शहरांत चार वेळा गेले पण त्यांना नवीन ठीकाणी रहाण्यांत विशेष अडचणी आल्या नाहीत कारण आर्मी पाठीशी असे. रहायला चांगले घर व इतर सर्व सोयीही बघितल्या जात.
राणीसाहेंबाचे गुपित
Category:
कथा साहित्य - ललितयशवंत आरामखुर्चीत रेलले होते. चंदू लॅपटॅापवर काहींतरी पहात होता. आत्याबाई चहाचा ट्रे घेऊन आल्या आणि दरवाजाची बेल वाजली. आत्याबाईंनी दार उघडले. बाहेर एक बुरखाधारी स्त्री उभी होती. “मला डिटेक्टीव्ह यशवंतना भेटायचं आहे.” ती स्वच्छ मराठीत म्हणाली. आत्याबाई म्हणाल्या, “या, आंत येऊन बसा. साहेब येतील आता. तुम्ही चहा घेणार कां?” ती स्त्री सोफ्यावर ऐटीत बसली.
हॅास्पिटलमधून बाळ गायब
Category:
कथा साहित्य - ललितगेले चार दिवस मुंबईतील कमलाबेन हॅास्पिटल चुकीच्या कारणासाठी पेपरांत गाजत होतं. हॅास्पिटलच्या प्रसूती विभागातून तीन दिवसांच बाळ गायब झालं होतं. तिथल्या नर्स, मेट्रन, डॅाक्टर, ह्या त्याबद्दल कांहीच सांगू शकत नव्हत्या. हॅास्पिटल मोठ्या उद्योगपतीचे असल्यामुळे प्रथम त्यांनी ही बातमी दाबून टाकण्याचा प्रयत्न केला गेल्याचा आरोपही हॅास्पिटल मॅनेजमेंटवर होत होता.
शास्त्रीबुवा
Category:
कथा साहित्य - ललितएका गृहस्थांना त्यांनी नोकरी करू नकोस, कांही धंदा कर त्यात तुला नक्की यश मिळेल असं सांगितलं होतं व त्याने त्याप्रमाणे आलेल्या चांगल्या नोकऱ्या लाथाडून धंदा केला होता व कांही वर्षांतच तो लखपती झाला होता. तेव्हां श्रीमंताला लखपती म्हणत, आतांसारखं करोडपती नाही. त्यांनी पत्रिका जुळवल्यामुळे कोणा कोणाचे विवाह यशस्वी झाले होते. कुणाला त्यांनी भविष्य वर्तवल्याप्रमाणे कन्या झाली होती तर कोणी परदेशीही गेले होते. त्यामुळे शास्त्रीबुवांकडची गर्दी हटत नव्हती. एखाद दुसऱ्याचं भविष्य बरोबर नव्हतं आलं पण अशी माणसे स्वत:ला दोष देत गप्प बसत असत.
एका वृध्दाची आत्महत्त्या
Category:
कथा साहित्य - ललितयशवंत आणि चंदू ह्यांच्यासमोर एक चाळीशीचा तरूण बसला होता.
कपड्यांवरून तो परदेशांतून आला असावा, असे वाटत होते.
यशवंतांची त्याने रितसर फोनवर वेळ घेतली होती आणि तो आला होता.
एवढ्या उमद्या सुस्थितींतील तरूणाची समस्या काय असावी, ह्याचा यशवंत अंदाज घेत होते.
अशोक मनोहर हें नांव त्यांनी अलिकडेच पेपरमध्ये वाचलं होतं.
तो म्हणाला, “मी आपल्याला माझे नांव फोनवर सांगितलेच आहे.
सैनिकाच्या मुलाची दिवाळी
Category:
कथा साहित्य - ललितदिवाळी जवळ आली होती. शकुंतला हॅास्पिटलमधील नित्याची कामे पटापट करत होती. संवयीने बिनचूक करत होती पण आज तिच्या मनांत मुलाची काळजी होती. मुलगा राजस आता नऊ वर्षांचा झाला होता. घरी एकटाच होता. वर्षांपूर्वी आजी गेली आणि तो खरंच एकटा पडला. आजी गेली तेव्हां बाबा येऊन लगेच परत गेले. जास्त रजा नव्हती त्यांना. आता परत कधी येतील, कुणास ठाऊक? सैनिकाचा काय भरोसा? त्याचे सुखरूप येणे हेच महत्वाचे! यंदा दिवाळीला फक्त दोघंच असणार होती घरी, ती आणि राजस. दिवाळीची कांहीच तयारी तिला करतां आली नव्हती. बऱ्याच सहकारी नर्सेस रजेवर होत्या. तिला रजा तर मिळत नव्हतीच पण अधून मधून डबल ड्यूटी करावी लागत होती. दोन दिवसांवर दिवाळी आली होती. विशेष खरेदी तर सोडाच पण निदान फराळासाठी लागणारं सामान आणि राजस साठी थोडे कपडे घ्यायला हवे होते ना! ह्यांतल कांही तिला करतां येत नव्हतं. तिला मदत करायलाही कुणी नव्हतं. राजस घरी एकटाच असायचा. शेजारी चांगले होते पण ते सतत कसे पहाणार. कितीही चांगल्या ठीकाणी राजस रहायला तयार नव्हता. तो आता पाळणाघरांत रहायला काय लहान होता काय?
काकड आरती
Category:
कथा साहित्य - ललितरामदास काकांनं लाऊड स्पीकरात हळी देली आण मंग मलं लय आनंद झाला. तसं पाह्यलं तं काकड आरतीचा काकडा आण परसाद याच्यासाठी गावातल्या बऱ्याच जणायची चढावढं लागायची, म्या बी मांघल्ल्या पाच-सात दिसापसनं परयत्नात व्हतो. आखरच्यान आज कुठं मव्हा नंबर लागला व्हता. मव्ह नाव पहाटं पहाटं लावूड स्पीकरात वाजलं व्हत त्यामुळ मल लय भरून आलतं.
केशवा
Category:
कथा साहित्य - ललितमी म्हणाले. तसा घाबरत घुबरत सुकेश माझ्याजवळ आला.माझ्या पुढच्या खुर्चीवर पाय उकड ठेऊन बसला.तो फार घाबरलेला दिसत होता.त्याच्या मनात काहीतरी गुंतागुंत चालली होती.त्याचा चेहरा घाबरून पांढराफटक पडलेला दिसत होता.मला त्याचं हे बावळट रूप पाहुण कसतरीच वाटलं.सुकेश माझ्या बाजुलाच रहायचा.विस पंचवीशीचा तरून असावा मात्र जख्ख म्हातारा दिसायचा.शरीरयष्टीने तो एकदम हडकुळा दिसत होता.शरीरात मांस असाव की नाही ईतपत संशय घेण्याजोगे त्याचे शरीर होते.अंगाची चामडी हडांवर घट्ट चिकटलेली वाटायची.तोंडाचं बोळकं झालेलं तर डोळ्याच्या खोबनितुन त्याचे पिवळट पांढरट डोळे लुकलुकत रहायचे.डोळ्यांच्या वर नाममात्र भुवया होत्या.तर असो.
प्रवास
Category:
कथा साहित्य - ललितनेमकाच ग्रॅजुयट झाल्यानं मलं पोस्ष्ट ग्रॅजुएशनसाठी औरंगाबादलं जायाच व्हतं.तिथल्या कॉलेजात मव्हा नंबर लागला व्हता.पहाटं नवची एष्टी व्हती.नवनंतर एष्टी नसल्यानं म्या पाहाटं लवकरच गडबडीनं आटपुण निंघायची तयारी केली.निघंतानी पुन्हा एकदा कागदपत्र निट तपासले.