संध्यासमय येताच पक्षी

संध्यासमय येताच पक्षी, घरट्याकडे सारे निघाले,
किती दूर, किती योजने,
लांबवरी फार उडाले,--||१||

किलबिलाट करत पिल्ले,
असतील वाट पाहत,
सय येता त्यांची एकदम,
पंखात जसे बळ शिरत,--||२||

आपुले घरटे नजरेस पडतां,
जीव भांड्यात कसा पडे,
पिल्ले सुरक्षित पाहता,
आनंदओसंडे चहूकडे,--!!||३||

धोका किती कोवळ्या जिवांना, सोडून जायचे निराधार,
नाग साप मांजरांचा ,
डोळाच असता त्यांच्यावर,-!!||४||

नित्य कामास जाणे,
पक्षीगणांना असते अटळ,
आपल्यावाचून कोण भरवे,
घास मायेने पिल्लांना, निव्वळ,!!||५||
संगोपन त्यांचे करणे,
कर्तव्यच आहे आमुचे ,
आमची छोटी छोटी रुपे,
प्रेमाची इवली प्रतीके,--!!||६||

हळूहळू शिकवायाचे त्यांना, विशाल गगना तोंड देणे,
निर्भय होऊन उडायचे,
ऊन -- पावसात राहणे,--!!||७||

संकटे आली किती जरी,
शांत आणि स्थिरच राहणे, कर्तव्यपरायण राहून आपुले,
सारे जीवन व्यतीत करणे,--!!||८||

हिमगौरी कर्वे©



संध्यासमय येताच पक्षी, घरट्याकडे सारे निघाले,
किती दूर, किती योजने,
लांबवरी फार उडाले,–||१||

किलबिलाट करत पिल्ले,
असतील वाट पाहत,
सय येता त्यांची एकदम,
पंखात जसे बळ शिरत,–||२||

आपुले घरटे नजरेस पडतां,
जीव भांड्यात कसा पडे,
पिल्ले सुरक्षित पाहता,
आनंदओसंडे चहूकडे,–!!||३||

धोका किती कोवळ्या जिवांना, सोडून जायचे निराधार,
नाग साप मांजरांचा ,
डोळाच असता त्यांच्यावर,-!!||४||

नित्य कामास जाणे,
पक्षीगणांना असते अटळ,
आपल्यावाचून कोण भरवे,
घास मायेने पिल्लांना, निव्वळ,!!||५||
संगोपन त्यांचे करणे,
कर्तव्यच आहे आमुचे ,
आमची छोटी छोटी रुपे,
प्रेमाची इवली प्रतीके,–!!||६||

हळूहळू शिकवायाचे त्यांना, विशाल गगना तोंड देणे,
निर्भय होऊन उडायचे,
ऊन — पावसात राहणे,–!!||७||

संकटे आली किती जरी,
शांत आणि स्थिरच राहणे, कर्तव्यपरायण राहून आपुले,
सारे जीवन व्यतीत करणे,–!!||८||

हिमगौरी कर्वे©

Author