मुगाच्या डाळीचा शिरा

moog-dal-sheera

हल्ली लग्नसमारंभाच्या जेवणात या मुगाच्या डाळीच्या शिर्‍याला महत्त्व आलेले आहे…



साहित्य :

एक वाटी मुगाची डाळ, एक वाटी साखर, एक वाटी सायीसकट दूध, ३ – ४ वेलदोडे, अर्धी वाटी तूप, बेदाणे, १ टेबलस्पून मिल्क पावडर.

कृती :

मुगाची डाळ भिजत घालावी. नंतर उपसून वाटावी.

नंतर तुपावर वाटलेली डाळ चांगली परतून घ्यावी. नंतर त्यावर दूध घालून हलवावे व साखर घालावी. मिश्रण घट्ट होत आले की त्यात वेलची पूड व बेदाणे घालावे.

मिल्क पावडरमध्ये थोडे दूध घालून कालवावे व ते शिऱ्यामध्ये घालून ढवळून ध्यावे व उतरवावे

सजवून खायला द्यावा…

Author