मी आणि WhatsApp

मला WhatsApp वापरायला लागून वर्ष झाले तरी ...

मी 'लाइक' केला नाही, मी 'ईमोजी' निवडली नाही,

मी एकही साधा मेसेज 'फॉर्वर्ड' केला नाही ||1||

मी उपदेश केला नाही, मी सुवचन धाडले नाही,

मी आजवर विनोदी चुटका रवाना केला नाही ||2||

मी 'दैनिक शुभेच्छा' चालवले नाही, मी भविष्य कथिले नाही,

मी ‘नेट'वरची रंगीत फुले पाठविण्यात रंगलो नाही ||3||

मी सेल्फी काढला नाही, तो डीपीत टाकला नाही,

मी वर्षभरात माझा स्टेटस बदलला नाही ||4||

मी साहित्यिक धुंडाळला नाही, मी बातमी प्रसारली नाही,

मी राजकरण्यांच्या करणीत कधीच डोकावलो नाही ||5||

मी केक वितरला नाही, मी बुकेही बांधला नाही,

मी वाढदिवशी कोणावरही ‘Wish’ प्रयोग केला नाही ||6||

मी 'HBD' केला नाही, मी 'वा.दि.हा.शु.' ही केला नाही,

मी 'वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा' करायला मात्र चुकलो नाही ||7||

मी काहीच केले नाही, मी तरीही निर्दोष नाही,

मी आलेले मेसेज डिलीट करण्याच्या शापातुन मुक्त नाही ||8||

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

श्री. संदीप खरे यांच्या काव्य रचनेशी साधर्म्य राखून लिहिले आहे.

-- रविंद्रनाथ गांगल

मला WhatsApp वापरायला लागून वर्ष झाले तरी …

मी ‘लाइक’ केला नाही, मी ‘ईमोजी’ निवडली नाही,

मी एकही साधा मेसेज ‘फॉर्वर्ड’ केला नाही ||1||

मी उपदेश केला नाही, मी सुवचन धाडले नाही,

मी आजवर विनोदी चुटका रवाना केला नाही ||2||

मी ‘दैनिक शुभेच्छा’ चालवले नाही, मी भविष्य कथिले नाही,

मी ‘नेट’वरची रंगीत फुले पाठविण्यात रंगलो नाही ||3||

मी सेल्फी काढला नाही, तो डीपीत टाकला नाही,

मी वर्षभरात माझा स्टेटस बदलला नाही ||4||

मी साहित्यिक धुंडाळला नाही, मी बातमी प्रसारली नाही,

मी राजकरण्यांच्या करणीत कधीच डोकावलो नाही ||5||

मी केक वितरला नाही, मी बुकेही बांधला नाही,

मी वाढदिवशी कोणावरही ‘Wish’ प्रयोग केला नाही ||6||

मी ‘HBD’ केला नाही, मी ‘वा.दि.हा.शु.’ ही केला नाही,

मी ‘वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा’ करायला मात्र चुकलो नाही ||7||

मी काहीच केले नाही, मी तरीही निर्दोष नाही,

मी आलेले मेसेज डिलीट करण्याच्या शापातुन मुक्त नाही ||8||

– – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – –

श्री. संदीप खरे यांच्या काव्य रचनेशी साधर्म्य राखून लिहिले आहे.

— रविंद्रनाथ गांगल

Author