काव्यातील गुरु

एकलव्यापरीं शिकलो विद्या, गुरुद्रोणा विना ।
काव्यामधल्या जाणून घेतल्या, साऱ्या खाणाखुणा ।।१।।

शोधू लागलो प्रथम गुरुला, पद्य रचनेसाठीं ।
कुणी न शिकवी कला श्रेष्ठ ही, राहून माझे पाठी ।।२।।

उठत होती भाव तरंगे, अन आकाशी भिडती ।
शब्दांनी परि पकड न येता, निष्टूनी ती जाती ।।३।।

मार्गदर्शक तो भेटत नाही, खंत लागे मना आता ।
व्याकूळ झाला जीव बघूनी, मनाची ही दुर्बलता ।।४।।

गोविंदाग्रज नि केशवसूत, आणिक ग.दि.मा. ।
तांबे- बोरकर- यशवंत, सर्वजण आले कामा ।।५।।

ग्रंथ तयांचे सारे जमवूनीं, एकत्र ठेवियले ।
शब्द भावना यांची सांगड, मन घालू लागले ।।६।।

द्रोण मूर्तिपरी भासूं लागली, त्यांची ग्रंथ संपदा ।
काव्यामधली स्फूर्ति मिळूनी, आनंदी झालो सदा ।।७।।

-- डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

— डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

Author