(User Level: User is not logged in.)

कथा

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा

Sort By:

  • पोलिस खात्यातील पहिला अविस्मरणीय दिवस

    सांगली जिल्ह्यातील बिसुर या खेडेगावात माझा जन्म झाला. घरची परिस्थिती अगदी बेताची, वडील सुतगिरणीमध्ये काम करुन उर्वरित वेळेत बिघा – दोन बिघा शेतजमिनीत जमेल तेवढं काम करत होते. आई आमचा सांभाळ करायची. जवळ जवळ सर्व शेती निसर्गावर अवलंबून होती. त्यामुळे शेतीचे उत्पन्न वर्षभर जिकिरीनं पुरवावं लागत होतं. मोठ्या दोन बहिणींची लग्न होवून त्या सासरी गेलेल्या होत्या.

  • पेशन्स इज द की.. (‘मी आणि ती ‘)

    पेशन्स इज द की….

    तिचे वडील मला भेटले म्हणाले तू काहीतरी कर तिच्यासाठी . तिची अवस्था गेले वर्षभर तशीच होती. चांगले लग्न ठरले होते ,
  • एक परीस स्पर्श – भाग २

    त्या पूजेच्या होमातील अंगारा दिला होता गुरुजींनी तीन महिने नित्य नियमाने लावायला. विजयनेही तो नित्य नियमाने लावला. पण विजयच्या मनात काही लग्नाचा विचार येत नव्हता कारण विजय कोणाच्यातरी प्रेमात पडलेला होता !

  • एटीएमची चोरी – (कथाकुंज क्रमांक ८)

    बाळू शिंदे, हुसेन आणि मटकर हे त्रिकूट पोलिसांच्या दफ्तरात नोंदलेलं होतं.
    तिघेही लहान सहान गुन्ह्यांसाठी तुरुंगवास भोगून आले होते.
    तिथेच त्यांची दोस्ती झाली होती.
    त्रिकूट आता मोठे दरवडे घालायला मागेपुढे पहात नसे.
    मटकर हा खरं तर इलेक्ट्राॅनिक्स इंजिनीअर.
    तो आपल्या ज्ञानाचा उपयोग ह्या चोऱ्यांची आंखणी आणि अंमलबजावणी दोन्हीसाठी करत असे.
    तिघे बाईकवरून फिरत असत.

  • अजब न्याय नियतीचा – भाग १०

    नील आणि आरू दीचे निरीक्षण करत होते…. तिचा चेहेरा थोडा ओढल्यासारखा दिसत होता. कालचा विषय कसा काढावा याचा ते विचार करत होते. शेवटी काल रात्री नक्की काय झालं ते दीनं सांगितल्याशिवाय त्यांना कळणारच नव्हते. दी शांतपणे पेपर वाचत चहा पीत होती. जरा वेळाने दीचे दोघांकडे लक्ष गेले…. दी हसून म्हणाली, “अरे, तुम्ही दोघे असे काय बघताय माझ्याकडे? माझ्या तोंडाला काही लागले आहे का?”

  • गुप्तहेर गोमु – भाग १ (गोमुच्या गोष्टी – भाग १३)

    गुप्तहेर (डीटेक्टीव्ह) ही कल्पना तशी जुनीच. गुप्तहेर हे ही कांही आपल्याला नवीन नाहीत. मध्ययुगापासून ते तहत दोन्ही महायुध्दांपर्यंत गुप्तहेर होतेच. पुराणांमध्येही कचाने देवांतर्फे हेरगिरी केलीच होती. आधुनिक युगांत खाजगी गुप्तहेरांची मराठी लोकांना, विशेषतः मराठी वाचकांना, ओळख करून दिली ती कै. लेखक बाबूराव अर्नाळकर यांनी.

  • प्रायश्चित्त – जितका अपराध मोठा, तितके प्रायश्चित्तही मोठेच !

    आपल्याला “शिक्षा ” होणार नसली तरीही “प्रायश्चित्त ” तरी आपण घ्यायला हवे. आणि ते सोपे आहे- हात जोडून त्यांची साऱ्यांच्या वतीने माफी मागायची. मगच आपण आपल्या दैनंदिन जीवनात परतू शकू. जितका अपराध मोठा,तितके प्रायश्चित्तही मोठेच !

  • संधिप्रकाशातील सावल्या – १ : भेटीची आवडी । उतावीळ मन

    आम्ही वृद्ध झालोत, पण टाकाऊ नाही झालोत. हा संधिप्रकाश दिसतोय ना तो आमचा ऊर्जास्रोत आहे. सूर्य मावळल्यानंतर आणि अंधार पडायच्या आधी जो प्रकाश असतो ना, त्याला संधिप्रकाश म्हणतात. आमची सावली संधिप्रकाशातसुद्धा दिसते. ती अनुभवानं समृद्ध असते. त्या सावलीत बसून तुम्ही स्वतःचा शोध घेऊ शकाल. जीवन कसं जगायचं हे आम्हाला, आमच्या सावलीला विचारा. सकारात्मक आयुष्य मिळेल तुम्हाला. आनंदी जीवनाचे धडे गिरवायचे असतील तर संधिप्रकाशातील सावलीत बसण्याखेरीज पर्याय नाही. बघ, तूच ठरव, म्हातारीचं ऐकायचं की आपलाच हेका चालवून आपलं अस्तित्व धोक्यात घालायचं ? “

  • मधल्या मधे

    आम्हीच माघार घेतली पाहिजे बरोबर आहे घर त्यांच राज्यही त्यांचेच आम्ही आश्रीत तेंव्हा बोलायचे नाही गप्प गुमान बंद करा आणि बसा शांत. आता नानांची पण काही चूक नाही. आर्थिक परिस्थिती मुळे सिनेमा नाटक सहली काहीही जमले नाही व्यवसाय. कामाचा व्याप मुलांच्या शिक्षणासाठी व लग्नासाठी पैसा व वेळ गेला. आत्ता कुठे सगळे स्थिरस्थावर झाले आहे.

  • भय (अलक)

    दार उघडले आणि थंड गार वाऱ्याचा झोत अंगावर आला. शहारून गेलो, केस ताठरले. माझ्यासाठी दार उघडून, कांही तरी पुटपुटत, मोकळे केस सोडलेली, आई देवघराकड़े जात होती.