(User Level: User is not logged in.)

कथा

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा

Sort By:

  • अनामिक

    सराईत गुन्हेगारानाही टेलिफोन ही एक पर्वणीच आहे. प्रत्यक्ष न भेटता गुन्हेगारी करता येते. लोकाना धमकावता येते. खंडणी वसूल करता येते. पोलिसांकडे नसेल इतकी अत्याधुनिक टेलिफोन यंत्रणा या गुन्हेगारांकडे आहे. त्यावर कॉन्फरन्स सेवेपासून रिमोट कंट्रोलपर्यंत सर्वच सोय आहे.

  • कुस्करलेली कळी – उमललेले फुल – २१

    IC131 दिल्ली मुंबई विमान सांताक्रूझ विमानतळा वर उतरत होते. संगीता, आजी, व विजय स्वागत कक्षातून विमानातून बाहेर पडणाऱ्या प्रयेक प्रवाशाकडे आतुरतेने पाहात होते.

  • ऋणानुबंध (कथा)

    आधीच रविवारचा सुटीचा दिवस. त्यातही अमर पार्टी हॉल निमंत्रकांनी भरलेला होता. राजू-राणीचे मित्रमैत्रिणी डॉ. शरदचे हॉस्पिटलमधील कर्मचारी, आदी संबंधितांनी बाळ संदेशच्या वाढदिवसाला फार शोभा आणली होती. राणी त्याच हॉस्पिटलमध्ये बरीच वर्षे परिचारिकेचे काम करीत होती. साहाजिकच साऱ्यांची ती लाडकी होती. राजेंद्र म्हणजे राजू हा तर डॉ. शरद यांचा अगदी जवळचा, मग काय विचारता? परकेपणा कुठेच नव्हता. कडक, शिस्तीची पण प्रेमळ व कामसू राणीने साऱ्यांचीच मने जिंकली होती. राजू-राणीच्या बाळाचा वाढदिवस म्हणजे जणू घरचाच कार्यक्रम.

  • नवरात्र .. माळ सातवी

    उत्तर कर्नाटकामधल्या एका लहानशा खेडेगावात आपल्या आजी आजोबांबरोवर रहाणारी ती दहा बारा वर्षाची छोटी परकरी पोर ….

    तिचे आजोबा निवृत्त शाळा शिक्षक .. घरी पुस्तकंच पुस्तकं आणि आजोबां प्रचंड व्यासंगी !मग काय … रोज रात्री जेवण झाल्यावर अंगणात बसून आकाशातल्या लुकलुकणाऱ्या ताऱ्यांच्या साथीनं ती आजोबांकडून गोष्टी ऐकत असे . कधी रामायण ,महाभारत , इसापनिती कथासरितसागर , पंचतंत्र तर कधी अरेबियन नाईट्स … कधी परदेशात घडलेल्या काही प्रसंगांच आजोबा गोष्टीत रुपांतर करून तिला सांगत …

    कधी तिला गावातल्या छोटया वाचनालयात घेऊन जात आणि मग ती काळ वेळेचं भान विसरून तिथे पुस्तकात रमून जाई …

  • एक परीस स्पर्श (भाग – २४)

    याबाबतीत मात्र विजय पूर्वीही बदनाम होता आणि आज ही कितीही सुंदर आणि गोड आवाज असणाऱ्या तरुणीने त्याला फोन केला तरी तो तिच्याशी अधिकचा एक शब्दही बोलत नाही.  पण एखादी समोरा – समोर भेटली आणि तिची बोलण्याची इच्छा असेल तर तो थांबतही नाही.

  • वाघीण भाग 2

    तिच्या मानात विचारांचे काहूर माजले होते, ती अचानक थांबली, तिला वाटले, पुन्हा जर असाच हमला झाला आणि माझा जीव गेला तर माझ्या मुलाकडे आणि नवऱ्याकडे कोण लक्ष देईल?, त्यांचा सांभाळ कोण करेल?. या विचाराने ती खूप घाबरली.

  • निस्सीम प्रेम

    नेहमीप्रमाणे प्राध्यापक अविनाश सरांच्या लेक्चरला क्लास पूर्ण भरलेला होता. अविनाश संस्कृत विषय शिकवत. सगळे विद्यार्थी तल्लीन होऊन ऐकत असत अविनाश सरांच संस्कृतवर प्रभुत्व होतंच पण त्याचं विवरण ते इंग्रजीतही फार सुंदर करत. अगदी सर्वांना समजेल अशा सोप्या इंग्रजीत. मेघदूत हे काव्य, शाकुंतल हे नाटक शिकवतांना तर ते नेहेमीच्या जीवनातील उदाहरणं देऊन आणि रंगवून सांगत. त्यामुळे त्यांच्या तासाला कोणी दांडी मारत नसे.

  • ठिगळ (कथा)

    आपल्या सभोवताली वेगवेगळ्या ठिकाणी , वेगवेगळ्या संदर्भातील आजुबाजूला घडणाऱ्या घटना किंवा आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर अशा अनेक अर्धवट,अपूर्ण राहिलेल्या गोष्टी असतात मग त्या “चांगल्या किंवा कधीकधी वाईट” ही असतात पण त्यांना पूर्णत्वास न्यायला लावावंच लागतं ……..असंच एखादं ….”ठिगळ”

  • अजब न्याय नियतीचा – भाग १२

    नदीच्या वरच्या बाजूला एक छोटीशी टेकडी होती. टेकडीवर एक आंबामातेचे मंदीर होते. मंदिराकडे जायला डांबरी रास्ता होता आणि नदीच्या कडेने वर जाण्यासाठी पायऱ्या पण बांधलेल्या होत्या. खालून टेकडीकडे पाहताना हिरव्यागार डोंगरातून दिसणारा वर पर्यंत जाणारा नागमोडी रस्ता आणि ठिकठिकाणी बांधलेल्या कमानीतून वर जाणाऱ्या पायऱ्या यांचे खूपच मनोहारी दृष्य दिसत होते. मग सगळ्यांनी गाडी पायथ्याशी लावून पायऱ्या चढूनच मंदिरात जायचे ठरवले. थोड्याच वेळात ते मंदिरात पोहोचले. मंदिराच्या गाभाऱ्यात सुबक अशी आंबामातेची मूर्ती होती. मंदिरातील वातावरण आणि देवीची मूर्ती पाहून त्यांचे मन प्रसन्न झाले.

  • हॉटेलातल्या सूक्ष्म कथा

    एक
    प्रवासाने थकलेल्या आईला सांगितले. आई मी बाहेरुन Do not disturb चा बोर्ड लावतो तू रूममध्ये निवांत विश्रांती घे.
    आईला क्षणभर वाटले घरच्या बेडरुमला असा बोर्ड लावता आला तर किती बरे झाले असते.

    दोन
    हॉटेलात रुम सर्व्हिसला चहा ऑर्डर केला. 15 मिनिटे वाट पाहिल्यावर. एका किटलीत दिमाखात चहा आला. किटली छान होती पण चहा मेला गार गुट्ट. बाईंच्या मनात विचार आला 15 मिनिटात 25 माणसांना गरमगरम चहा पाजून कपबश्या विसळून जाग्यावर ठेवल्या असत्या.