(User Level: User is not logged in.)

खाद्ययात्रा

Sort By:

  • वॉटरमेलन कुल

    कलिंगड स्वच्छ धुऊन पुसून घ्या. कापून साली व त्यातील बिया काढा. गर काढा. नंतर सर्व पदार्थ मिक्सरमधून काढा. भांड्यात ओता. ग्लास भरा. वरुन बर्फाचा चुरा घाला. फ्रिज असेल तर थंड करुन प्यायला द्या.

  • आमरस घालून शेवयाचा शिरा

    पाण्याला उकळी आली की त्यात शेवया टाकून जरा उकळू द्यावे. शेवया शिजल्या की लगेच चाळणीवर ओताव्या व वरून गार पाणी घालावे.

  • कोथिंबीर वडी

    कोथिंबीर निवडून घ्या. लहान, कोवळी देठे पण घ्या. कोथिंबीर धुवा आणि चाळणीत ठेऊन निथळून घ्या. पाणी निथळल्यावर कोथिंबीर चिरून घ्यावी. तेल आणि पाणी वगळता कोथिंबीर आणि सर्व साहित्य परातीत एकत्र करा. चांगले मिक्स करावे. १ टेबलस्पून तेल गरम करून मिश्रणात ओतावे. चमच्याने मिक्स करावे. थोडे थोडे पाणी घालावे आणि छान एकत्र मळून गोळा बनवा. त्याचे २ भाग करून लंबगोल आकाराचे गोळे/उंडे करा. भांड्याला आतून थोडे तेल लाऊन घ्या, त्यात ते गोळे ठेवा.

  • सुरणाचे लोणचे

    सुरणाच्या फोडी कराव्यात. हिरव्या मिरच्या उभ्या अर्धवट कापून कोरड्या ठेवाव्यात. पातेलीत लिंबाचा रस, मीठ, मोहरीची पावडर, हळद यांचे मिश्रण चांगले ढवळाचे.

  • कोथिंबिरीचे समोसे

    मैद्यात गरम तेलाचे मोहन घालून, चवी नुसार मीठ टाकावे व मैदा भिजवावा. थोडा वेळ मुरु द्यावा, कोथिंबीर स्वच्छ पाण्याने धुवून निवडून बारीक चिरून घ्यावी. कढईत अर्धा डाव तेल घालून गरम करून मोहरी, हिंग, हळदीची फोडणी करावी. त्यात चिरलेली कोथिंबीर घालून थोडी वाफ आणून शिजू द्यावी. त्यात तिखट, चारोळी, चवी नुसार मीठ, गरम मसाला , डाळीचे पीठ, घालून भाजी प्रमाणे परतावे. नंतर झाल्यावर त्या लिंबाचा रस घालून थंड करावे. मैद्याच्या दोन सारख्या लाट्या करून गोलाकार करून एक एक साईड ने तेलाचा हात लावुन दोन्ही लाट्या एकावर एक ठेऊन पोळी लाटावी. ती पोळी तव्यावर हलकी भाजून घ्यावी नंतर त्या पोळीच्या तीन लांबट पट्या कापाव्यात.

  • क्रिस्पी चिली बेबी कॉर्न

    प्रथम बेबीकॉर्न शिजवून घ्या. मैद्यामध्ये पाणी आणि मीठ मिसळून मिश्रण तयार करा. बेबी कॉर्नचे दोन तुकडे करून मैद्याच्या मिश्रणात बुडवा आणि तेलात तळून घ्या. कढईत एक चमचा तेल गरम करून उभी कापलेली हिरवी मिरची घालून परतून घ्या. यात सर्व भाज्या, मीठ, अजिनोमोटो व शेजवान सॉस घालून चांगले परतून घ्या.

  • चकली

    सर्व सामग्री मिसळा. पाणी कालवून गरम कणके सारखे मळा. चकलीच्या साच्यात मिश्रण भरून गोल आकारात पिळून गरम तेलात तळा. हवा बंद डब्यात बरेच दिवस साठवून ठेवता येते.

  • बेबी कॉर्न इन ग्रीन ग्रेव्ही

    पालकाची पाने शिजवून त्याची पेस्ट करा. कढईत तेल गरम करून त्यात पालकाची पेस्ट, दूध, मीठ आणि काजू पेस्ट घालून शिजवून घ्या. आता यात शिजवलेली भाजी, मक्यागचे दाणे, सिमला मिरची, हिरवी मिरची, बेबी कॉर्न, काळी मिरेपूड, लवंगपूड घालून व्यवस्थित परतून घट्ट होईपर्यंत शिजवा. गरमागरम पराठ्यासह सर्व्ह करा.

  • कोथिंबीरीचे वडे

    कोथिंबीर स्वच्छ निवडून बारीक चिरून धुवून कपड्यावर कोरडी करायला थोडा वेळ पसरा. एका परातीत कोरडी झालेली कोथिंबीर, १ वाटीभर डाळीचे पीठ, मिरची, आले, लसूण वाटलेली गोळी, मीठ व रवा, चिमूटभर सोडा टाकून कालवा. कढईत तेल तापवून तयार पिठाचे चपटे वडे करून खरपूस तळा.

  • पॉपकॉर्न, बेबीकॉर्न किंवा स्वीटकॉर्न आणि मराठमोळं कणीस

    मक्याशी(कॉर्नशी) आपली पहिली ओळख पॉपकॉर्नमुळे किंवा पावसाळी हवेतल्या भाजलेल्या गरमागरम कणसामुळे झालेली असते. बेबीकॉर्न किंवा स्वीटकॉर्न ही तशी अलीकडची ओळख. पंजाब, हिमाचलातील मक्कई की रोटी आणि सरसोंका साग भेटतात, कुठल्या तरी हिंदी सिनेमात. मक्याचं मूळ सापडतं अमेरिकेत. आजही अमेरिकेच्या जवळजवळ प्रत्येक राज्यात मका पेरला जातो. मक्याची पहिली नोंद ५ नोव्हेंबर १४९२मध्ये सापडते. ख्रिस्तोफर कोलंबसच्या जगाच्या सफरीमध्ये त्याचे स्पेनमधील दोन प्रतिनिधी क्युबाच्या अंतर्भागात पोहोचले. तेव्हा त्यांनी चवदार मका चाखला. मक्याच्या पदार्थाचा उल्लेख त्यांच्या नोंदवहीत सापडतो. अमेरिकेप्रमाणेच कॅनडा आणि चिलीमध्येही मक्याचं अस्तित्व दिसलं. त्यात िफ्लट कॉर्न, फ्लोअर कॉर्न, पॉप कॉर्न या प्रकारांसारख्याच इतरही काही जाती सापडल्या. मक्याच्या शेतीने आíथक स्थर्य मिळाल्यामुळे सांस्कृतिक विकासाकडे लक्ष वळलं व नागरी जनजीवन सुखावलं.