वेगवेगळ्या विषयांवरील इ-पुस्तके आपण येथे वाचूया….


‘मराठीसृष्टी’च्या माध्यमातून ‘हिंदू धर्मातील प्राचीन पौराणिक वृक्ष’ हे डॉ. दिलिप कुलकर्णी यांनी लिहिलेले इ-पुस्तक. याच विषयावरील त्यांची लेखमालिका वाचकांच्या पसंतीस उतरली.
व्यास प्रकाशनाचा हा 2022 चा दिवाळी अंक



कोणत्याही मंगल कार्याचा आरंभ मंगलमूर्तीच्या नामोच्चाराशिवाय होतच नाही. श्री गणेशांना यथार्थ रीतीने समजून घ्यायचे असेल तर दोन पुराणांचा आधार घेता येतो. त्यापैकी त्यांच्या सगुण साकार स्वरूपाला आपल्यासमोर ठेवणारा ग्रंथ म्हणजे श्री गणेश पुराण.
माघ शुद्ध चतुर्थी भगवान श्री गणेशांच्या विनायक अवताराचा जन्मोत्सव. यानिमित्ताने श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टसाठी तयार करण्यात आलेल्या विद्यावाचस्पती स्वानंद गजानन पुंड यांच्या मधुर वाणीतील ‘श्री गणेश पुराण’ या प्रवचन मालिकेचे ‘मराठीसृष्टी’ निर्मित हे व्हिडिओ पुस्तक.
मराठीसृष्टीचा हा आरती संग्रह ज्यामध्ये आहेत १०० पेक्षा जास्त आरत्या. काही दुर्मीळ आरत्यासुद्धा…. त्याचबरोबर दररोज म्हटल्या जाणाऱ्या आरत्यांचा खास विभाग….
विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद पुंड यांच्या लेखणीतून साकारलेला मुद्गलपुराणाचा हा मराठी अनुवाद.


‘कॉमन मॅन’ म्हटलं की तात्काळआपल्या डोळ्यासमोर झुपकेदार मिशी असलेला, चौकडी जॅकेट परिधान केलेला, कमी उंचीचा, धोतर नेसलेला, सारं काही चूपचाप दुरून न्याहाळणारा व्यंगचित्रातील आर. के. लक्ष्मण यांचा सामान्य माणूस तरळतो!
पण आज हा कॉमन मॅन दुरून पाहत नाहीये. तो व्यक्त झालाय… शब्दांनी. विविध प्रसंगावरील त्याचे टपोरे शब्द सरस्वतीच्या प्रांगणात टपटप सांडलेत. हेच आहे ‘कॉमन मॅन’मधील ‘अनकॉमन’! या शब्दांनी व्यक्त झालेल्या शंभराहून अधिक छोटेखानी लेखांचा संग्रह म्हणजे ‘कॉमन मॅन’


हल्लीच्या डिजिटल युगात अनेकांचे आध्यात्मिक वाचन मोबाईलवरच होते. मात्र PDF स्वरुपातील पुस्तके वाचताना काही अडचणी येतात. त्यामुळे अनेक धार्मिक पुस्तके इ-बुक स्वरुपात आणण्याच्या मराठीसृष्टीच्या प्रयत्नांचा हा एक भाग
Copyright © 2025 | Marathisrushti