वेगवेगळ्या विषयांवरील इ-पुस्तके आपण येथे वाचूया….



मी कोण आहे ‘ ह्याचा शोध घेताना माझ्यातला मी, माझ्याशी किती एकाग्र आहे हे पण बघणे आवश्यक आहे. एकाग्रता अत्यंत महत्वाची आहे.
तुमच्या मेंदू मधील कचरा जो तुम्हला सतत त्रास देत असतो तो डिलीट करता आला पाहिजे. पण तुम्ही हा कचरा साफ करताना आपण काय डिलीट करत आहोत याचेही भान हवे. कारण हे पण बघितले पाहिजे. आपण एखाद्या मानसिक आजारास निमंत्रण देत आहात का, ह्याबद्दलही विचार करणे आवश्यक आहे

गुजरातमधल्या गणदेवी गावातील संत श्री जानकी आई म्हणजेच श्री बायजी यांच्या जीवनचरित्रावर आधारित पोथी.
श्री जानकी आईचे जीवनसार “सावली” या पोथीत पद्यरुपाने आपण नेहमीच वाचतो. श्री मधुकर गजानन सुळे यांनी लिहिलेल्या “सावली” या पोथीच्या आतापर्यंत ७ आवृत्ती निघाल्या.
हीच “सावली” पोथी आता दृक-श्राव्य माध्यमातून सादर आहे.



‘कॉमन मॅन’ म्हटलं की तात्काळआपल्या डोळ्यासमोर झुपकेदार मिशी असलेला, चौकडी जॅकेट परिधान केलेला, कमी उंचीचा, धोतर नेसलेला, सारं काही चूपचाप दुरून न्याहाळणारा व्यंगचित्रातील आर. के. लक्ष्मण यांचा सामान्य माणूस तरळतो!
पण आज हा कॉमन मॅन दुरून पाहत नाहीये. तो व्यक्त झालाय… शब्दांनी. विविध प्रसंगावरील त्याचे टपोरे शब्द सरस्वतीच्या प्रांगणात टपटप सांडलेत. हेच आहे ‘कॉमन मॅन’मधील ‘अनकॉमन’! या शब्दांनी व्यक्त झालेल्या शंभराहून अधिक छोटेखानी लेखांचा संग्रह म्हणजे ‘कॉमन मॅन’


‘मराठीसृष्टी‘च्या माध्यमातून ‘महाराष्ट्रातील औषधी वनस्पती’ हे डॉ. दिलिप कुलकर्णी यांनी लिहिलेले इ-पुस्तक. याच विषयावरील त्यांची लेखमालिका वाचकांच्या पसंतीस उतरली.
विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद पुंड यांच्या लेखणीतून साकारलेले गणपतीच्या स्तोत्रांचे हे विशेष ई-पुस्तक…
Copyright © 2025 | Marathisrushti