वेगवेगळ्या विषयांवरील इ-पुस्तके आपण येथे वाचूया….
प्रज्ञावंत, प्रतिभावंत आणि सर्जनशील कलावंत खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्या दैदीप्यमान कलाजीवनासंबंधी त्यांच्यासमवेत रंगवलेल्या गप्पा. हा संवाद साधलाय धनश्री प्रधान दामले यांनी.




विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद पुंड यांच्या लेखणीतून साकारलेली ही विशेष ई-पुस्तके… आता वाचा इ-पुस्तक स्वरुपात


मराठीसृष्टीचे लेखक श्री सुमंत परचुरे यांची ही खिळवून ठेवणारी कादंबरी.
श्री विष्णू सहस्त्रनाम….


जागतिक बॅंकेचे परिवहन विषयातील सल्लागार असलेले अरुण मोकाशी झांझीबारमध्ये विश्व बॅंकेमार्फत “परिवहन विशेषज्ज्ञ” म्हणून दोन वर्षासाठी गेले असतांना त्यांनी लिहिलेली ही झांझीबार डायरी. त्यात त्यांनी वर्णिला आहे – आफ्रिकन लग्न सोहोळा आणि लगीनघाई, आफ्रिकन लोकांचे बिअर सेवन, सेरेगेटीतील प्राण्यांचे टान्झानिया-केनिया-टान्झानियाचे अदभूत स्थलांतर, बेटावर रहाणारा पण हवेत उडणारा कोल्हा, व्हिक्टोरिया नदीच्या पात्रातल्या आता निर्वंश होत चाललेल्या मासोळ्या, एक बलाढ्य कासव, जंगलातले जिराफ, आफ्रिकेत रहाणार्या भारतीयांचे गृहजीवन, समुद्रात बुडालेली एक अविस्मरणीय नौकाडुबी – अशा पंचवीस चित्तथरारक कथा !
हल्लीच्या डिजिटल युगात अनेकांचे आध्यात्मिक वाचन मोबाईलवरच होते. मात्र PDF स्वरुपातील पुस्तके वाचताना काही अडचणी येतात. त्यामुळे अनेक धार्मिक पुस्तके इ-बुक स्वरुपात आणण्याच्या मराठीसृष्टीच्या प्रयत्नांचा हा एक भाग !
अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांचे हे स्तोत्र – महात्म्य..



Copyright © 2025 | Marathisrushti