(User Level: User is not logged in.)

इ-पुस्तके-ललित-वैचारिक

ललित साहित्य, कवितासंग्रह, वैचारिक लेखनाची पुस्तके येथे वाचा.

Sort By:

  • इन्स्पेक्टर सावंत…. क्राईम ब्रॅंच बोलतोय

  • गमती देशोदेशीच्या

    जगातील सर्वात उंचावरून म्हणजे १६००० फूटांवरून धावणाऱ्या आगगाडीचा प्रवास’. तिबेट हा देश तसा भेट देण्यासाठी अवघड असल्याने खूपच वेगळे काहीतरी वाचल्याचा अनुभव येईल. नाझकाच्या अगम्य रेषा शाळेत शिकलेल्या भूगोलाची आठवण करून देतील. तर ‘इजिप्तमधले पिरॅमिडस व नाईलच प्रवास’, ‘उरोसची तरंगती बेटे’, ‘जपानचा साकुरा’, ‘स्वित्झर्लंडचे झरमॅट’, ‘दक्षिण आफ्रिकेतील ‘माबुला लॉज’ची वर्णने तिथे जाण्याची इच्छा मनात निर्माण करतील. दुबईसारख्या वाळवंटी प्रदेशातील बागा बघायला जाण्याचा नक्कीच मोह पाडतील व तिथे गेल्यावर ‘कशासाठी पोटासाठी’ मध्ये वर्णन केलेल्या कॉर्निशला भेट देण्याची आठवण नक्कीच येईल. ‘तांबोपाटा’ मधील व ‘वाईटामो केव्हज’ मधील वर्णन आपल्याला पुनःप्रत्ययाचा आनंद देईल. चिनी लोकांची मुखवटा बदलण्याची कला खूपच वेगळी वाटण्याजोगी आहे. हा प्रवास कसा सुरू झाला, त्यातली ‘अडथळ्यांची शर्यत’ कशी संपली याचे वर्णन वाचून प्रत्येकाला आपल्या पहिल्या प्रवासाची आठवण आल्याखेरीज राहाणार नाही. सिंगापूरला गेल्यावर पहिले काही दिवस कसे गेले, तिथे रुळायला काय काय करावे लागले हेही ‘सिंगापूरच्या आठवणी’ वाचल्यावर काहीजणांना त्यांच्या बदल्यांमुळे आलेले अनुभव आठवायला लावतील.

    या पुस्तकातील लेख हे कोणत्याही देशाच्या स्थळाच्या वा प्रवासाच्या वेळेला अनुसरून लिहिलेले नाहीत. सगळे लेख वेगवेगळे आहेत. त्यामुळे मागचा कोणताही संदर्भ मनात न धरता कधीही कोणताही लेख काढला तर तो नवीन वाटला पाहिजे. आपल्याला तसा तो वाटावा ही अपेक्षा

  • स्वामी विवेकानंद ह्यांचे १०१ विचार

    स्वामी विवेकानंद यांनी मांडलेले अनेक विचार सुप्रसिद्ध आहेत. त्यातील १०१ विचारांचा हा संग्रह.

  • जगले ते लिहिले

  • पॅनोरमा

  • झांझिबार डायरी

    जागतिक बॅंकेचे परिवहन विषयातील सल्लागार असलेले अरुण मोकाशी झांझीबारमध्ये विश्व बॅंकेमार्फत “परिवहन विशेषज्ज्ञ” म्हणून दोन वर्षासाठी गेले असतांना त्यांनी लिहिलेली ही झांझीबार डायरी. त्यात त्यांनी वर्णिला आहे – आफ्रिकन लग्न सोहोळा आणि लगीनघाई, आफ्रिकन लोकांचे बिअर सेवन, सेरेगेटीतील प्राण्यांचे टान्झानिया-केनिया-टान्झानियाचे अदभूत स्थलांतर, बेटावर रहाणारा पण हवेत उडणारा कोल्हा, व्हिक्टोरिया नदीच्या पात्रातल्या आता निर्वंश होत चाललेल्या मासोळ्या, एक बलाढ्य कासव, जंगलातले जिराफ, आफ्रिकेत रहाणार्‍या भारतीयांचे गृहजीवन, समुद्रात बुडालेली एक अविस्मरणीय नौकाडुबी – अशा पंचवीस चित्तथरारक कथा !

  • आय. सी. ८१४

    आय. सी. ८१४ विमानाचं अपहरण झालं, तेव्हा ‘एन्टेबी’सारखी कारवाई केली जाईल, असं अनेकांना वाटत होतं. गुप्तचरांच्या आघाडीवर तशी तयारी होती, पण माशी कुठे शिंकली ?

    अमृतसरच्या राजा सांसी विमानतळावर कमांडोजचं पथक पोहोचलं, पण दरम्यान ‘इंडियन एअरलाइन्सच्या विमानानं लाहोरच्या दिशेनं उड्डाण केलं होतं.

    त्या कारवाईत विघ्न आणणारे कोण होते ? तो खोटा फोन कोणाचा होता ?

    या आणि अशा बऱ्याच खळबळजनक माहितीवर आधारित काल्पनिक आणि वास्तव यांचा हा सुरेख ‘कल्पास्तव’.

    अरविंद व्यं. गोखले यांची थरारक कादंबरी

  • पासबुक आनंदाचे – दिवाळी अंक 2022

    व्यास प्रकाशनाचा हा 2022 चा दिवाळी अंक

  • एकलव्या

  • अनघा – दिवाळी अंक 2016

    अनघा प्रकाशनचा हा 2016 चा दिवाळी अंक संत तुकारामांवर आहे.